नागपुरात नसतांना गुन्हा दाखल केला कसा?
सीताबर्डी पोलिस ठाण्यात दाखल FIR मधून नाव वगळण्याची मागणी; खवसे यांचे मुख्यमंत्री व पोलीस आयुक्तांना निवेदन!
नागपूर WH NEWS : सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्हा क्र. 0610/2026 मध्ये आपले नाव आरोपी क्रमांक 3 म्हणून नमूद करण्यात आले असून, या प्रकरणाशी आपला थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नसल्याचा दावा करत WH NEWS चे संपादक विजय सीताराम खवसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे निष्पक्ष चौकशी करून नाव वगळण्याची मागणी केली आहे.
खवसे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, कथित घटना 15 मे 2025 रोजी दुपारी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान घडल्याचे FIR मध्ये नमूद आहे. मात्र त्या कालावधीत ते नागपूरमध्ये उपस्थित नव्हते, तर पत्रकारितेच्या कामानिमित्त राज्याबाहेर प्रवासात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, 14 मे 2025 रोजी बोधगया येथून प्रयागराजकडे रेल्वेने प्रवास केला. प्रयागराज वरून रात्री प्रवास करीत सकाळी कटनी उतरले व सकाळी कटनी मधुन प्रवास करीत 15 मे रोजी सायंकाळी सुमारे 6 ते 7 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रवासाचे डिजिटल पुरावे म्हणून YouTube व्हिडिओ, स्क्रीनशॉट सादर करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे, 14 मे रोजी रात्री रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करीत त्यांनी रिपोर्टिंग केल्याचा व्हिडिओ आपल्या WH NEWS YouTube चॅनेलवर उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
खवसे यांनी निवेदनात म्हटले आहे की, “चुकीच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या आधारे माझे नाव या प्रकरणात जोडण्यात आले असून माझी भूमिका निष्पक्षपणे तपासण्यात यावी.”या पुढे अश्या खोट्या गुन्ह्यात अडकवू नये.
या प्रकरणामुळे आपली सामाजिक प्रतिमा आणि कुटुंबावर मानसिक परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पोलीस आयुक्तांकडे प्रमुख मागण्या
-प्रकरणाची निष्पक्ष व वस्तुनिष्ठ चौकशी करावी.
-उपलब्ध डिजिटल व प्रवासाच्या पुराव्यांची तपासणी करावी.
-चौकशीत तथ्य आढळल्यास या प्रकरणातून आपले नाव वगळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.जर न्याय मिळाला नाहींL तर खोट्या FIR विरुद्ध कोर्टात पुरावे सादर करणार असल्याचे खवसे यांनी सांगितले.
