गोमांस तस्करीप्रकरणी दोघांना अटक; 100 किलो मांसासह 95 हजारांचा मुद्देमाल जप्त

Follow Us on :

गोमांस तस्करीप्रकरणी दोघांना अटक; 100 किलो मांसासह 95 हजारांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया WH NEWS | 20 सप्टेंबर:
गोंदियाहून भंडाऱ्याच्या दिशेने गोमांसाची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नाकाबंदी दरम्यान संशयित मोपेडची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे 100 किलो गोमांस आढळून आले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये इरफान रफिक शेख (32), रा. रामनगर, गोंदिया आणि अक्रम खान मिया खान पठाण (40), रा. मांगली, जि. भंडारा यांचा समावेश आहे.

पोलिसांनी 15 हजार रुपये किमतीचे मांस आणि 80 हजार रुपये किमतीची मोपेड, असा एकूण 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलिस अधीक्षक डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुंगले, हवालदार नामुर्ते, अख्तर शेख, मोहित चौधरी, कैलास ठाकरे व इंगले यांनी केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दडस पाटील करीत आहेत.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए