रोहयो अंतर्गत बांधलेल्या विहिरीच्या बांधकामाच्या पैशांसाठी अडीच तास ठिय्या आंदोलन  -तिवसा तालुक्यातील 90 शेतकऱ्यांचे सुमारे 3 कोटी शासनावर थकीत! -शेतकरी 3 वर्षांपासून रोहयो अंतर्गत विहीर बांधकामाचे देयकेपासून वंचित!

Follow Us on :

रोहयो अंतर्गत बांधलेल्या विहिरीच्या बांधकामाच्या पैशांसाठी अडीच तास ठिय्या आंदोलन 
-तिवसा तालुक्यातील 90 शेतकऱ्यांचे सुमारे 3 कोटी शासनावर थकीत!
-शेतकरी 3 वर्षांपासून रोहयो अंतर्गत विहीर बांधकामाचे देयकेपासून वंचित!

तिवसा WH NEWS: अस्मानी आणि सुलतानी संकटातून कोरड्या दुष्काळाचा सामना करतांना शेतकऱ्यांना सरकारच्या चुकीच्या धोरणांचा सुद्धा सामना करावा लागतो आहे. तब्बल 3 वर्षांपासून एकट्या तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रोहयो अंतर्गत उभारण्यात आलेल्या विहिरीच्या बांधकामाचे तब्बल 3 कोटी शासनाकडे थकीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आधीच कोरड्या दुष्काळाचा झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागत असतांना आता, उसनवारी, कर्जबाजारी आणि सोनं नान विकून अन्नधान्य विकून उभारण्यात आलेल्या विहिरीच्या बांधकामाचे पैसे निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांच्या कॅबिनपुढे अडीच तास ठिय्या आंदोलन केले आहे.

तिवसा तालुक्यातील असे 90 शेतकरी असून, त्यामध्ये विहिरीसह गुरांचे गोठे बांधकाम करणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांच्या समावेश आहे.यामध्ये वर्ष 2024 -25 मधील 4 लाख 47 हजार, वर्ष 2025 – 26 मधील 1कोटी 87लाख 10हजार, वर्ष 2026 – 27 मधील 67लाख 56हजार यामध्ये पंचायत समिती स्तरावरील तब्बल 1 कोटी 31लाख 75 हजार 144 रुपये शासनाकडे प्रलंबित असल्याचे माहिती यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी दिली आहे. यासंदर्भात रोहयो उपजिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी अमरावती, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती, उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक रोहयो यांना पंचायत समिती कार्यालयाकडून निधीच्या विनंतीचे पत्र पाठवण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.

मात्र, येत्या 8 दिवसात तालुक्यातील 90 शेतकऱ्यांना रोहयो अंतर्गत विहिरी, गुरांचे गोठे किंवा इतरही योजनेतील बांधकामाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही. तर, सरकार आणि प्रशासन यांना झोपेतून जागे करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करणार असल्याचा इशारा यावेळी प्रशांत कांबळे यांनी दिला आहे. त्याशिवाय, शेतकऱ्यांना त्यांच्या सहकुटुंब घेऊन पंचायत समिती आवारातच येत्याकाळात दसरा आणि दिवाळी साजरी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी अमोल मरसकोल्हे, उषा घोम, नथुजी बेलसरे, पन्नालाल कोचर. ज्योती गावंडे, शंकर उईके, सुनील टापरे, रामदास निस्ताने, प्रमोद बंड, अशोक कुरळकर, दिलीप तिखे, अनिल बेलसरे, शिवम तिथे, गजानन जाधव, दिलीप वाघ, हर्षा वनवे, विठ्ठल डमके, संदीप वानखडे, रवी काकडे, जगदीश साबळे, उत्तमराव येरणे, महेश ढेंगे, माया वाघ, विजय कुरळकर, कैलास पुरी, भूषण गाठे, प्रभाकर भोयर, बाबाराव राऊत, शफिक शहा, दिनेश वानखडे, दिनेश मनवर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थितीती होती.

काय म्हणाले प्रशांत कांबळे “
शेतकऱ्यांच्या कष्टाचे घामाचे पैसे सुद्धा देत नाही. रोहयो अंतर्गत विहिरी खोदायला लावल्या शेतकऱ्यांनी जवळ होत नव्हतं सगळे विकून, उसनवारी आणि कर्जबाजारी होऊन विहिरीला पैसे लावले मात्र, आता योजनेचे पैसेच मिळत नाही. पालकमंत्र्यांनी तिवसा येथील सोयाबीन पाहणी दरम्यान नरेगा आयुक्तांना फोन केला. तातडीने पैसे मिळतील असे आश्वासनही मिळाले मात्र, ते आश्वासन शेतकऱ्यांनी आत्महत्या पुर्ण केल्यावर होणार का ? त्यामुळे सरकारला जरातरी लाज वाटली पाहिजे.
– प्रशांत कांबळे,सामाजिक कार्यकर्ते 

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए