नागपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! – नगरसेवकाच्या घरावर गोळीबाराचा छडा; 7 आरोपी गजाआड! – सीपी नांगरे पाटील यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती 

Follow Us on :

नागपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई!
– नगरसेवकाच्या घरावर गोळीबाराचा छडा; 7 आरोपी गजाआड! – सीपी नांगरे पाटील यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती 

नागपूर WH NEWS : वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्री काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले साहित्य व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.अशी माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवार दिनांक 4-9-2026 ला सीपी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली.


दिलेल्या माहिती नुसार वाठोडा परिसरातील श्रावणनगर येथील घराच्या वरच्या मजल्यावर रात्रीच्या सुमारास इलेक्ट्रिक डीपी ब्लास्ट झाल्यासारखा मोठा आवाज झाला. त्यानंतर सीसीटीव्ही तपासताना दोन व्यक्ती मोपेडवरून येऊन घराच्या गॅलरीवर बंदुकीतून एक गोळी झाडताना दिसून आले. गोळी गॅलरीच्या रेलिंगला लागून घराच्या काचेचे नुकसान झाले.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि इतर तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. आरोपी गुजरात व छत्तीसगडमध्ये पसार झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांच्या पथकांनी तेथून त्यांना ताब्यात घेतले.

हे आरोपी अटक,काही रडार वर!
सदर प्रकरणात अंकुश शंकर तोमस्कर, वय 30 वर्षे,अमित मधुकर ठाकरे, वय 22 वर्षे,रूपम उर्फ छोट्या विशाल नागदेवे, वय 24 वर्षे,सोमेश उर्फ पिल्लू मुनेश्वर वाहणे, वय 25 वर्षे
ऋषभ उर्फ काच्या भगवती पैठण, वय 30 वर्षे,केतन दुर्गाप्रसाद माटे, वय 24 वर्षे,कार्तिक बाबूल तोमस्कर, वय 24 वर्षे सर्व नागपूर निवासी. यांना मोठ्या सीताफिने पोलिसांनी अटक केली असून काही आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगितले. या आरोपीवर मोका लावण्यात येईल अशीही माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी परिषदेत दिली

सदर कार्यवाही पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त निवृत्ती रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल आणि सहायक पोलीस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपासात पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे , पोलीस निरीक्षक नितीन चुलपार, पोलीस निरीक्षक वैभव बारंगे, पोलीस निरीक्षक गणेश कदम, पोलीस निरीक्षक मनोज राऊत, पोलीस निरीक्षक विवेक झिंगरे, पोलीस निरीक्षक चेतन बोराडे, API विशाल सांगोळे यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
गोळीबाराचे नेमके कारण काय? आरोपींनी कोणाच्या सांगण्यावरून गोळीबार केला? याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए