मातृसेवा संघ महिला व बालकांसाठी आजही निस्पृहपणे सेवाव्रत -देवेंन्द्र फडणवीस -105 वा वर्धापन दिन सोहळयाचा शुभारंभ -शताब्दी वर्षातील परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे अनावरण -मातृसेवा संघाच्या प्रस्तावित इमारतीसाठी संपूर्ण मदत

Follow Us on :

मातृसेवा संघ महिला व बालकांसाठी आजही निस्पृहपणे सेवाव्रत
-देवेंन्द्र फडणवीस
-105 वा वर्धापन दिन सोहळयाचा शुभारंभ
-शताब्दी वर्षातील परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे अनावरण
-मातृसेवा संघाच्या प्रस्तावित इमारतीसाठी संपूर्ण मदत
नागपूर, WH NEWS :- मातृसेवा संघ शताब्दी महोत्सव साजरा करत असतांना सर्वसामान्य जनतेला आपल्या हक्कांचे आरोग्य केंद्र म्हणून असलेली ओळख अत्यंत परिश्रमाने जपली आहे. शताब्दी महोत्सवानिमित्त मातृसेवासंघातर्फे जनसेवेच्या सर्व प्रकल्पांना तसेच नूतन महिला वसतिगृहाच्या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी आज दिली.


सीताबर्डी परिसरातील मातृसेवा संघाच्या रंजन सभागृहात संस्थेचा 105 वा वर्धापन दिन सोहळा तसेच सुधारित परिचारीका प्रसविका प्रशिक्षण केंद्राच्या अनावरण फलकाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्या उपस्थिती आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, संस्थेच्या अध्यक्षा डॉ.अरुणा बाभूळकर, सचिव डॉ.लता देशमुख, उपाध्यक्ष श्रीमती रश्मी भावे आदी उपस्थित होते.

पद्मश्री कमलाताई होस्पेट व वेणुताई नेने यांनी स्वातंत्र्यांपुर्वी मातृसेवासंघाची स्थापना केली. याकाळात केवळ डफरीन येथे इंग्रज कुटुंबांच्या महिलांसाठीच प्रसुतीची व्यवस्था होती. सामान्य भगिनींनाही प्रसुतीची व्यवस्था व्हावी यासाठी मातृसेवा संघाच्या माध्यमातुन अशा सुविधा निर्माण करतांना गरिब रुग्णांसाठी निशुल्क सेवा दिली. या संस्थेच्या माध्यमातुन सेवा भाव करतांनाच सेस्थेचे व्यावसायिकरण होऊ दिले नाही आणि आजही सेवा भाव जपला जात असल्याचा गौरवपुर्ण उल्लेख करतांना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी महिलांच्या आरोग्या सोबतच बाल आरोग्य व बालमृत्यु थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच सुतिकागृच्या माध्यमातुन सामान्य माणुस संस्थेसोबत आजही जुळला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शतक महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसोबतच महिला वसतिगृहाच्या इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. संकल्प चित्रानुसार इमारतीच्या बांधकामामध्ये जी मदत करता येईल ती निश्चितपणे करण्यात येईल. सुरक्षित मातृत्वासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंन्द्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ व सुरक्षित मातृत्वाचा संकल्प केला आहे. त्यानुसारच मातृसेवासंघांची वाटचाल सुरु असल्याचे सांगतांना श्री.फडणवीस म्हणाले की, याक्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थाचा चांगलाच सहभाग आहे. अशा संस्था आदीवासी व अतिदुर्गम भागातही कुपोषणासह महिला व बालकांच्या आरोग्य सेवेमध्ये चांगले काम करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

शतक महोत्सवी अभिनव वृक्षारोपण
शतक महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमासोबतच वृक्षारोपण मोहीम सुरु करण्यात आली असुन या मोहीमेचा शुभारंभ मुख्यंमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते व्यासपीठावर अभिनव पध्द्तीने लिंबांचे वृक्ष लावून करण्यात आले. मुख्यंमत्र्यांनी एका कुडींत वृक्ष लावून शतक महोत्सवी वृक्ष म्हणून संवर्धन व संगोपण करण्याची जबाबदारी मातृसेवा संघाने स्विकारावी अशी सूचना यावेळी केली.
महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या अक्षध्या डॉ.अरुणा बाभूळकर यांनी स्वागत केले तर सचिव श्रीमती लता देशमुख यांनी प्रास्ताविकात मातृसेवा संघाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आभार व कार्यक्रमांचे संचलन श्रीमती जयश्री वाघ यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधिक्षीका डॉ.पुष्पा भावे तसेच संस्थेचे पदाधिकारी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए