शिरजगाव मोझरीत भीमजयंतीचा जल्लोष समता सैनिक दलाच्या महिलांच्या शिस्तीने वेधले लक्ष

Follow Us on :

शिरजगाव मोझरीत भीमजयंतीचा जल्लोष
समता सैनिक दलाच्या महिलांच्या शिस्तीने वेधले लक्ष
शिरजगाव मोझरी WH NEWS : येथील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे सजवलेले रथ आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरले.

यावर्षीच्या रॅलीचे खास वैशिष्ट्य म्हणजे समता सैनिक दलाच्या महिलांचा सहभाग ठरला. निळ्या काठ पदराची पांढरी साडी आणि निळी टोपी अशा शिस्तबद्ध वेशभूषेत या महिला रॅलीत सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीने रॅलीची शोभा अधिकच वाढली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिरजगाव मोझरीत क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि त्यांचे शिष्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा आगळावेगळा संगम पाहायला मिळाला. रॅली दरम्यान ‘जय भीम’च्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते. हातात निळे आणि पंचशील झेंडे घेऊन भीम अनुयायांसह गावातील सर्व नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली, तर महिला आणि पुरुषांनी महापुरुषांच्या जीवनावरील गायनाची साजसंगत केली. बाजार चौकातून निघालेली ही रॅली गावातील मुख्य मार्गावरून फिरली. प्रत्येक चौकात विविध मंडळांनी महापुरुषांना अभिवादन करून रॅलीचे स्वागत केले. रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांसाठी ठिकठिकाणी नाश्ता, चहा, पाणी आणि शरबतची चोख व्यवस्था करण्यात आली होती. जयंती उत्सवाचे औचित्य साधून १३ एप्रिल रोजी गावातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हजारो प्रेक्षकांनी उपस्थिती लावली.

रॅलीचा समारोप पुन्हा बाजार चौकात बुद्ध वंदनेने करण्यात आला. यावेळी अक्षय पाचघरे यांनी माता रमाई यांच्या जीवनावर गीत सादर केले. अलेक्स हगवणे, माही मेश्राम, आदर्श ठवरे, हर्षल ढोबळे, दीक्षांत ठवरे आणि वैदवी गणेश या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या संघर्षावर भाषणे केली. या सोहळ्याचे आयोजन पंचशील मंडळ आणि नालंदा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अदिती गणेश यांनी केले.
अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने शिरजगाव मोझरीत सामाजिक एकतेचा संदेश दिला. तर कार्यक्रमाला यशस्वी पार पाडण्यासाठी जयंती उत्सवाचे अध्यक्ष सतीश चवरे, उपाध्यक्ष प्रवीण मेश्राम, सचिव रवी खोब्रागडे, नालंदा बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चिंचखेडे, सुमेध भोगे, विशाल कांबळे, प्रज्वल वावरे, पद्मभूषण मात्रे, वैभव चिंचखेडे, प्रशिक हगवणे, अमोल वावरे, हंसराज चेंडकापुरे, स्वप्नील तुरकाणे, संदीप हगवने, चंदू हगवने, सम्यक खोब्रागडे, स्वप्नील वावरे, विनोद गणेश, प्रदीप मेश्राम, पूरुषोत्तम मेश्राम, सुमित हगवने, हितेश हगवणे, सागर हगवणे

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए