स्माईल ट्रेन इंडिया आणि बजाज फिनसर्व CSR च्या वतीने ‘महा स्माईल्स’ चे विदर्भात क्लेफ्ट जनजागृती अभियान सुरू,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्ठी, 90दिवस चालेल उपक्रम

Follow Us on :

स्माईल ट्रेन इंडिया आणि बजाज फिनसर्व CSR च्या वतीने

‘महा स्माईल्स’ चे विदर्भात क्लेफ्ट जनजागृती अभियान सुरू,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्ठी, 90दिवस चालेल उपक्रम

नागपूर WH NEWS ब्युरो –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने समर्थित, चेहयावरील विवर (क्लेफ्ट) व तालु शस्त्रक्रियांसाठी लवकर निदान व उपचाराविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ९० दिवसांचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

देशातील अग्रगण्य क्लेफ्ट-संबंधित स्वयंसेवी संस्था स्माईल ट्रेन इंडिया आणि बजाज फिनसर्व CSR यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील दुर्लक्षित भागांमध्ये उपचारासाठीचा दुवा निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘महा स्माईल्स क्लेफ्ट जनजागृती अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या ९० दिवसांच्या विशेष उपक्रमाचा शुभारंभ आज नागपूर येथील स्माईल ट्रेनचे भागीदार रुग्णालय स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल येथे डॉक्टर्स, सरकारी अधिकारी आणि बजाज फिनसर्व व स्माईल ट्रेनच्या नेतृत्व मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आला.

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमास आपला पाठिंबा दर्शवत, विदर्भातील गरजू मुलांसाठी क्लेफ्ट उपचार सहज उपलब्ध करून देण्याचे आपले व्हिजन शेअर केले.

या कार्यक्रमात एलईडी स्क्रीनने सज्ज अशा तीन व्हॅन्सना झेंडा दाचवण्यात आला, ज्या अकोला, नागपूर व वर्षा विभागातील ग्रामीण भागात फिरणार आहेत. या व्हॅन्समध्ये ऑडिओ-व्हिज्युअल माधने आणि संवादात्मक प्लॅटफॉर्म्स असतील, ज्यामधून स्थानिक समुदायांमध्ये क्लेफ्ट म्हणजे काय आणि त्यावर लवकर हस्तक्षेप व शस्त्रक्रियेद्वारे उपचार शक्य आहे हे समजावून सांगण्यात येईल. याशिवाय, या व्हॅन्समधून परिसरातील मोफत उपचारासाठी टोल फ्री क्रमांक 1800 103 8301 वर संपर्क करण्याचे मार्गदर्शन दिले जाईल.

दक्षिण आशियासाठी स्माईल ट्रेनच्या एरिया डायरेक्टर रेणू मेहता म्हणाल्या, “महा स्माईल्स हा केवळ एक उपक्रम नसून एक समाजाभिमुख चळवळ आहे. प्रत्येक मुलाला आनंदाने हसण्याचा, स्पष्ट बोलण्याचा आणि व्यवस्थित अन्न खाण्याचा हक्क आहे असा आमचा विश्वास आहे. बजाज फिनसर्वच्या मदतीने आम्ही हा संदेश पेट लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. क्लेफ्ट लिप व पॅलेटचे उपचार शक्य आहेत हे त्यांना समजून सांगत आहोत. आमचे उद्दिष्ट म्हणजे गावतळापर्यंत जागरुकता पोहोचवून वेळेवर उपचाराची खात्री करणे. मुख्यमंत्री फडणवीसजींच्या पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत आणि नॅशनल हेल्थ मिशन, महाराष्ट्र यांच्यासोबत औपचारिक सहकार्याची अपेक्षा बाळगत आहोत, जेणेकरून विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक क्लेफ्टग्रस्त मुलापर्यंत पोहोचता येईल.”

बजाज फिनसर्वचे CSR अध्यक्ष कुरुश इराणी म्हणाले, “मुलांचे आरोग्य आणि क्लेफ्ट केअरला प्राधान्य देण्यासाठी आम्ही स्माईल ट्रेनसोबत ‘महा स्माईल्स प्रत्येक मुलासाठी क्लेफ्ट केलर’ हा उपक्रम सुरू केला. यामध्ये वेळेवर

स्माईल ट्रेन

सम्वक्रियेसाठी सवकर रेफरल्स मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आता हा उपक्रन विदर्भात व्हॅत जनजागृती मोहिमेद्वारे विस्तारत असून, स्थानिक उपचार केंद्रांशी पालकांना जोडण्यात येणार आहे. आम्हाला आला आहे की, अधिकाधिक बुटुंबांना लवकर हस्तक्षेपाचे महत्त्व समजेल आणि त्यांच्या मुलांचे आरोग्यपूर्ण, समाधानी जीवन पडेल.”

‘महा स्माईल्स – प्रत्येक मुलासाठी क्लेफ्ट केअर’ हा उपक्रम ऑगस्ट २०२३ मध्ये सुरू झाला असून, २०२६ पर्यंत महाराष्ट्रात पुढील उद्दिष्ट गाठणे अपेक्षित आहेः

संपूर्ण महाराष्ट्रभर ८,००० मोफत क्लेफ्ट शस्त्रक्रिया

२०,००० आशा/आरबीएसके आरोग्य कर्मचायांचे लवकर निदानासाठी प्रशिक्षण

 (यापैकी १६,०००+कर्मचा:यांचे प्रशिक्षण पूर्ण)

२६ वेबिनार सत्रांद्वारे स्त्रीरोगतज्ज्ञांचे प्रशिक्षण (यातील २२ सर्गामध्ये ५,०००+ सहभाग) – AMOGS सहकायन महाराष्ट्रभर रेडिओ, बस, केवल, वृत्तपत्रांद्वारे जनजागृती मोहीम

विदर्भातील या जनजागृती मोहिमेला स्माईल ट्रेनचे भागीदार रुग्णालय व क्लेफ्ट सर्जन्स यांचेही सहकार्य लाभणार आहे. त्यामध्ये डॉ. प्रणाम सदावर्ते (स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल, नागपूर), डॉ. मयूर अग्रवाल (श्रीराम हॉस्पिटल, अकोला), डॉ. नितीन भोला (आचार्य विनोबा भावे, वर्धा), डॉ. मनिंदर जांभूळकर (सहयोग हॉस्पिटल, गोंदिया) यांचा समावेश आहे, जे मोहिमेदरम्यान व त्यानंतरही सुरक्षित आणि वेळेवर शस्त्रक्रियेची सुविधा देतील.

पुढील तीन महिन्यांत या व्हॅन्स विविध बाजारपेठा, आरोग्य शिबिरे आणि स्थानिक मेळावे यामध्ये फिरून समाजात असलेल्या गैरसमज दूर करतील, उपचारासाठी मार्गदर्शन करतील आणि हजारो कुटुंबांना नव्या आशेचा किरण देतील.

स्माईल ट्रेन इंडिया बद्दल

स्माईल ट्रेन स्थानिक वैद्यकीय व्यावसायिकांना प्रशिक्षण, निधी आणि संसाधनांसह सक्षम करते जेणेकरून ते जगभरातील मुलांना मोफत क्लेफ्ट शस्त्रक्रिया आणि व्यापक क्लेफ्ट काळजी प्रदान करू शकतील. आम्ही क्लेफ्ट उपचारांसाठी एक शाश्वत उपाय आणि स्केलेबल जागतिक आरोग्य मॉडेल विकसित करतो, ज्यामुळे मुलांचे जीवन लक्षणीयरीत्या सुधारते, ज्यामध्ये त्यांची खाण्याची, श्वास घेण्याची, बोलण्याची आणि शेवटी भरभराटीची क्षमता समाविष्ट आहे. २००० पासून, स्माईल ट्रेन इंडियाने १३०+ भागीदार रुग्णालयांच्या नेटवर्कद्वारे संपूर्ण भारतात ७,५०,००० हून अधिक मोफत क्लेफ्ट शस्त्रक्रियांना पाठिंबा दिला आहे. स्माईल ट्रेन इंडियाचा शाश्वत दृष्टिकोन कसा आहे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया smiletrainindia.org ला भेट द्या. क्लेफ्ट उपचारांशी संबंधित प्रश्न किंवा समर्थनासाठी, कृपया आमच्या टोल-फ्री हेल्पलाइन नंबरवर कॉल करा: १८०० १०३ ८३०१.

अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क साधा:
अंजली कटोच | akatoch@smiletrain.org

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए