जवाहर विद्यार्थीगृह निवडणूक,संताजी विकास पॅनेलच्या विजयाला आमसभेची मंजुरी
Nagpur – जवाहर विद्यार्थीगृहाच्या रविवारी झालेल्या निवडणूकीची मतमोजणी सोमवारी रात्रो उशीरापर्यंत सुरू असल्यामुळे निवडणूकीचा निकाल रात्री 10:00 वाजता संस्थेच्या आमसभेत निवडणूक निर्णय अधिकारी अॅङ श्री. नितीन तेलगोटे यांनी जाहीर करताच आमसभेने या निर्णयाला एकताने मंजुरी प्रदान केली.अशी माहिती शेखर सावरबांधे यांनी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये दिली.
ते पुढे म्हणले कि या जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे अध्यक्षपदासाठी शेखर सावरबांधे यांना 1413 मते मिळाली असुन त्यांनी विद्यमान अध्यक्ष श्री. रमेश गिरडे यांचा 296 मतांनी पराभव केला. उपाध्यक्ष म्हणून श्री. नरेंद्रकुमार दिवटे (1264), मुख्य कार्यवाह पदासाठी श्री. गंगाधर काचोरे (1273), सहकार्यावाहकासाठी श्री. हर्षवर्धन बेले (1360) तर कोषाध्यक्ष पदासाठी (1241) बालाचंद टापरे या संताजी विकास पॅनेलच्या निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना आमसभेने मंजुरी दिली.
कार्यकारी सदस्यांसाठी अॅड. श्री. नितीन तेलगोटे यांनी जी नावे जाहीर केली त्यापैकी सर्वश्री प्रा. रमेश पिसे (1254), प्रविण अंबागडे (1235), विजय मोटघरे (1218), प्रज्ञा बडवाईक (1217), हरिश जयपूरकर (1191), सुखदेव वंजारी (1190), अनिल साखकर (1180), रवि उराडे (1170), लोकनाथ भूरे (1161), कृष्णा घुग्गुसकर (1159), प्रकाश तिळगुळे (1150), हरिश दांडेकर (1150)
या 12 संताजी विकास पॅनेलच्या तर देवेंद्र वाडीभस्मे व चंद्रकांत ढोबळे या दोन पुरोगामी पॅनेलच्या उमेदवारांना आमसभेने विजयी झाल्याची मंजुरी प्रदान केली.
यावेळी बोलतांना नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. शेखर सावरबांधे यांनी सांगितले की, निवडणूक संपली असून आम्ही सर्व आपसी मतभेद विसरालो. संस्था म्हणून ज्यांची ज्यांची मदत लागेल ती घेऊन आम्ही संस्थेच्या हितासाठी व आमच्या जाहीरनाम्यासाठी काम करू. जुन्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत आमचा कोणताही आकस नाही. त्यांच्या हातून चूकीने झालेल्या चूका दुरूस्त करू मात्र त्यांनी जाणीवपूर्वक केलेल्या चुकांच्या पापाचे आम्ही भागीदार होणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जुन्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यभार स्वीकारून लगेच येत्या आठवड्यात कामाला सुरूवात करू असा आत्मविश्वास त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.या निवडणूकीत धर्मराजजी रेवतकर, नितीनजी कुंभलकर, नाना ढगे, अॅड, जगदिश गायधने, अॅड. पुरुषोत्तम घाटाळे, गंपुजी घोटोळे, राम वंजारी, चंद्रकांत तिळगुळे, यशवंत कुंभलकर, किशोर वरंभे, ईश्वर बाळबुधे, जानरावजी शेळके, यादवरावजी देवगडे, यांनी या निवडणूकीतल मार्गदर्शन केले
