जाणता राजा’ महानाट्याच्या तयारीला वेग -नागपुरात १३, १४ व १५ जानेवारीला तीन दिवस प्रयोग -यशवंत स्टेडियमवर होणार महानाट्य

जाणता राजा’ महानाट्याच्या तयारीला वेग

-नागपुरात १३, १४ व १५ जानेवारीला तीन दिवस प्रयोग

-यशवंत स्टेडियमवर होणार महानाट्य

नागपूर दि. ७ : नागपुरात प्रशासनामार्फत १३, १४ व १५ जानेवारीला जाणता राजा महानाटयाचा प्रयोग होणार आहे. या महानाट्यासाठीच्या तयारीला वेग आला असून स्टेजसह इतर तयारीला सुरुवात झाली आहे.

यशवंत स्टेडियममध्ये महानाट्यासाठी स्टेज, सीसीटीव्ही कॅमेरे, कचरागाड्यांची व्यवस्था, साईड पॅनल अशा तयारीला सुरुवात झाली आहे. इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग यशवंत स्टेडियमवर होणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभर होणाऱ्या महानाट्याची सुरुवात नागपुरातून व्हावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली आहे. त्यानंतर प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे.

350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात महानाट्याचे सादरीकरण करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. या उपक्रमातील पहिला प्रयोग नागपूर येथे होत आहे.

शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंग ‘जाणता राजा ‘ मध्ये दाखविण्यात येणार आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा व महानगरपालिका प्रशासनामार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रवेशिका असेल, मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. दररोज सायंकाळी पाच वाजतानंतर या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट ,घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण कलाकार करणार आहेत.

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts