हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या माध्यमातून समाजात प्रेमभावना वाढवा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  शहरातील विविध दहीहंडी कार्यक्रमाना भेट

spot_img

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या माध्यमातून समाजात प्रेमभावना वाढवा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 शहरातील विविध दहीहंडी कार्यक्रमाना भेट

नागपूर  : ‘हाथी-घोडा-पालखी… जय कन्हैयालाल की…’ या जयघोषात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरातील विविध दहीहंडी कार्यक्रमांना हजेरी लावली. श्रीकृष्णाच्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी एकोप्याने राहत दहीहंडीतील प्रेमाचा गोपालकाला वाटून समाजात प्रेमभावना वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.

Advertisements

श्री. फडणवीस यांनी अवस्थी नगर, कमाल चौक, कोतवाली तसेच शारदा चौक येथील दहीहंडी कार्यक्रमांना भेट दिली. यावेळी त्यांनी मंचकावरील दहीहंडी श्रीफळाने फोडून श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आनंदाने साजरा करण्याचे तसेच गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे रचतांना सुरक्षेची योग्य काळजी घेण्याचे आवाहनही केले. आमदार प्रवीण दटके व संबंधित मंडळाचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.