उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे नागपूर येथे आगमन..!नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी, एनएडीटीचा ‘प्रणिती’ कार्यक्रमात सहभागी होणार.

Follow Us on :

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे नागपूर येथे आगमन..!नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी, एनएडीटीचा ‘प्रणिती’ कार्यक्रमात सहभागी होणार…नागपुरात प्रथम आगमन, राज्यपाल रमेश बैस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत

नागपूर, दि. ४ : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे शुक्रवारी ४ ऑगस्टला दुपारी ३ वाजता नागपुरात आगमन झाले. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. उपराष्ट्रपती एक दिवसांच्या दौऱ्यावर नागपूरला आले आहेत.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाने आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस,केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअरमार्शल विवेक गर्ग, मेजर जनरल एस. के. विद्यार्थी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे,विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, आदींनी स्वागत केले. उपराष्ट्रपतींसोबत त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सुदेश धनखड यांचेही आगमन झाले.
दुपारी 3.30 वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव सोहळ्यात ते उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी 5.30 वाजता ते राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या वार्षिक प्रणिती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. एनएडीटीमध्ये सायंकाळी 5.30 नंतर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय महसूल सेवेचे प्रशिक्षण केंद्र असणाऱ्या या प्रबोधिनीमध्ये ते जवळपास तीन तास असतील. रात्री 9.20 वाजता ते दिल्लीकडे प्रयाण करतील. सुमारे सहा तास उपराष्ट्रपती नागपूरात असणार आहेत.

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए