मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत महानिर्मितीचे ७.५६ मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित..! -नागेवाडी ४.२० मेगावाट, वालेखिंडी ३.३६ मेगावाट -८ गावांतील २२०० कृषी वीज ग्राहकांना योजनेचा लाभ -१०.६ मेगावाटचे तीन सौर ऊर्जा प्रकल्प अंतिम टप्प्यात

Follow Us on :

 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत महानिर्मितीचे ७.५६ मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित..!-नागेवाडी ४.२० मेगावाट, वालेखिंडी ३.३६ मेगावाट…..-८ गावांतील २२०० कृषी वीज ग्राहकांना योजनेचा लाभ ….-१०.६ मेगावाटचे तीन सौर ऊर्जा प्रकल्प अंतिम टप्प्यात

नागपूर ७ मे २०२३ : रात्री सिंचन करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते त्यामुळे शेतीसाठी दिवसा भरवशाचा वीज पुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाने जून २०१७ मध्ये  महत्वाकांक्षी “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली. त्यात ७.५६ मेगावाटचे दोन सौर ऊर्जा प्रकल्प ५ मे २०२३ रोजी कार्यान्वित करण्यात महानिर्मितीला यश आले आहे.

नागेवाडी – स्थापित क्षमता ४.२ मेगावाट 
नागेवाडी तालुका तासगांव जिल्हा सांगली या सौर प्रकल्पामुळे नजीकच्या चार गावांना नागेवाडी, अंजनी, वडगांव आणि लोकरेवाडी या गावातील सुमारे १२०० ते १३०० वीज ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. सदर प्रकल्प महावितरणच्या ३३/११ के.व्ही. अंजनी नागेवाडी उपकेंद्राला जोडण्यात आला आहे. सुमारे १० हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून, प्रकल्प उभारणीचा खर्च १५ कोटी आहे. महानिर्मिती, मेसर्स ई.ई.एस.एल.(विकासक), मेसर्स टाटा (सब व्हेंडर) आहेत.

वालेखिंडी – स्थापित क्षमता ३.३६ मेगावाट :
वालेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली या सौर प्रकल्पामुळे नजीकच्या चार गावांना वालेखिंडी, बेवनूर, सिंदेवाडी आणि नवलेवाडी या गावांतील सुमारे एक हजार कृषी वीज ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. सुमारे ८ हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून, प्रकल्प उभारणीचा खर्च १२ कोटी आहे. महानिर्मिती, मेसर्स ई.ई.एस.एल.(विकासक), मेसर्स टाटा (सब व्हेंडर) आहेत. नजीकच्या महावितरणच्या ३३/११ के.व्ही. वालेखिंडी उपकेंद्राला सदर प्रकल्प जोडण्यात आला आहे.

या दोन सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे स्थानिक पातळीवर प्रत्येकी १० ते १५ व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. सौर ऊर्जेद्वारे मिळणारी वीज सुमारे रु.३.३० प्रती युनिट दराने मिळणार असून महावितरण समवेत वीज खरेदी करार करण्यात आला आहे.

आगामी काही महिन्यात महानिर्मितीचे बोर्गी(जिल्हा-सांगली) २ मेगावाट, कुंभोज(जिल्हा-कोल्हापूर) ४.४ मेगावाट, सोनगाव(जिल्हा-सातारा) ४.२ मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत.

आजघडीला महानिर्मितीच्या एकूण ३६७.४२ मेगावाट स्थापित क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज उत्पादन होत आहे.

मा.उप मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांचे निर्देशानुसार तसेच महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी. अनबलगन यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच १०० मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी विकासकाला इरादा पत्र देण्यात आले आहे तसेच आर्थिक वर्ष २०२३-२०२४ करिता सुमारे १ हजार मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्पांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून संचालक(प्रकल्प) आणि संपूर्ण सौर प्रकल्प चमू यासाठी परिश्रम घेत आहेत.

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए