जागतिक रेडक्रॉस दिवसाच्या निमित्ताने…. रक्तदान करून आपदग्रस्तांना मदत करा…! जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल रुडे यांचे आवाहन.

Follow Us on :

जागतिक रेडक्रॉस दिवसाच्या निमित्ताने…. रक्तदान करून आपदग्रस्तांना मदत करा…! जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल रुडे यांचे आवाहन.

गडचिरोली (चक्रधर मेश्राम )
आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट चळवळीची तत्त्वे लक्षात ठेवण्यासाठी जागतिक रेड क्रॉस दिन साजरा केला जातो. असहाय्य आणि जखमी सैनिक आणि नागरिकांचे संरक्षण करणे हा जागतिक रेड क्रॉस दिनाचा मुख्य उद्देश आहे. रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांच्या जयंतीनिमित्त मानवतावादी संस्थेला आणि मानवतेच्या मदतीसाठी केलेल्या अभूतपूर्व योगदानाच्या स्मरणार्थ हा दिन साजरा केला.

रेड क्रॉस ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेडक्रॉस आणि अनेक राष्ट्रीय संस्था मिळून ही संस्था चालविली जाते. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कोविड-19 च्या महामारीमध्ये रेडक्रॉस चळवळीचे महत्त्व समर्पक योगदान आहे.
लोकांचा कोणताही भेदभाव न करता सर्वांना मदत करणे हा रेड क्रॉसचा महत्त्वाचा उद्देश असुन कोणत्याही प्रकारची महामारी, नैसर्गिक आपत्ती आणि युद्धाच्या वेळी लोकांना मदत करणाऱ्या रेड क्रॉस या संस्थेशी जगभरातील करोडो लोक जुडलेले आहेत.

स्विस उद्योगपती जीन हेन्री ड्युनंट यांनी 1859 मध्ये इटलीमधील सॉल्फेरिनोची लढाई पाहिली. ज्यामध्ये मोठ्या संख्येने सैनिक मरण पावले आणि जखमी झाले. जखमी सैनिकांची काळजी घेण्यासाठी कोणत्याही सैन्याकडे क्लिनिकल सेटिंग नव्हती. ड्युनंटने स्वयंसेवकांचा एक गट तयार करून युद्धात जखमी झालेल्या सैनिकांसाठी अन्न आणि पाणी आणले. एवढेच नाही तर या गटाने त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना पत्रेही लिहिली. या घटनेनंतर तीन वर्षांनी हेन्रीने आपला अनुभव ‘अ मेमरी ऑफ सॉल्फेरिनो’ या पुस्तकातून प्रकाशित केला.

पुस्तकात त्यांनी कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय समाज स्थापन करण्याची सूचना दिली . युद्धात जखमी झालेल्यांवर उपचार करू शकणारा समाज जो कोणत्याही देशाच्या नागरिकत्वाच्या आधारावर नाही तर मानवतावादी आधारावर लोकांसाठी काम करतो. त्यांच्या सूचनेची अंमलबजावणी फारच लवकर झाली. कोरोना महामारी, रशिया, युक्रेन देशामधील युद्धात मानवतेच्या रक्षणासाठी काम केले आहे. असे कार्य करण्यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन आपदग्रस्तांना मदत करण्यासाठी रक्तदान, भोजनदान, वस्त्रदान करून सहकार्य करावे असे आवाहन गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल रुडे यांनी केले आहे.

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए