गोंदियात ट्रक ने चिमुकल्याला चिरडले …- आक्रोशीत जमावाकडून ट्रकची जाळपोळ : परिसरात तणाव

Follow Us on :

गोंदियात ट्रक ने चिमुकल्याला चिरडले …- आक्रोशीत जमावाकडून ट्रकची जाळपोळ : परिसरात तणाव

गोंदिया, ब्यूरो ( प्रमोद नागनाथे )

दुकानातून जवळच असलेल्या घरी जाण्याकरिता निघालेल्या चिमुकल्याला विरुद्ध दिशेने येणाऱ्या अनियंत्रित ट्रक ने चिरडल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवार 30 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारा गोंदिया शहरातील बाजपेयी चौकात घडली. राफन अफरोज शेख (वय 9 रा. बाजपाई चौक, गोंदिया) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरातील आक्रोशीत जमावाने ट्रक ला जाळपोळ केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या परिसरातच एफसीआयचे गोदाम असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात राईस मील आहेत. त्यामुळे या मार्गावर नेहमी ट्रक व मोठ्या वाहनांची वर्दळ राहत असून यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. दरम्यान, आजदेखील उत्तर प्रदेश येथील ट्रक धान्य नेण्यासाठी येत असताना चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने दुकानातून घरी जात असलेल्या राफनला ट्रकची धडक बसली. ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळावर नागरिकांनी एकच गर्दी केली.

तर या घटनेमुळे संतापलेल्या जमावाने ट्रकला आग लावली, ज्यामध्ये ट्रक जळून राख झाला. घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांनी आपल्या पथकासोबत घटनास्थळ गाठून गर्दी नियंत्रणात आणली. विशेष म्हणजे, आज, संपूर्ण शहरात रामनवमी उत्सव साजरा होत असताना रमजान महिनाही सुरू आहे.

तेव्हा या घटनेमुळे परिस्थिती चिघडू नये यासाठी परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान, मृत मुलाला उत्तरीय तपासणी करीता शासकीय रुग्णालयात पाठविले असून पुढील तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहे.

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए