गिरीश बापट अनंतात विलीन…!-बापट साहेबांची पाठीवरील थाप विसरणार नाही -प्रशांत
मुम्बई – मुंबईत माझ्या पत्रकारितेच्या सुरुवातीलाच २०१४ मध्ये प्रथमच भाजपा सरकार स्थापन झालं आणि मला २०१४ चा राज्य शासनाचा पुरस्कार घोषित झाला. त्यानिमित्ताने मुंबईतल्या शासनाच्या कार्यक्रमात आलो. तेव्हा पहिल्यांदा श्री.गिरीश बापट साहेबांशी माझी भेट झाली. माझ्या सोबत माझे गावचे मित्र,ज्येष्ठ बंधू असलेले दोन सहकारी होते. त्यांनी सांगितलं की अरे बापट साहेब आपल्या चांदूररेल्वे आहे. तर मग जाऊन ओळख परिचय दिला. तर त्यांनी कवेत घेऊन शाब्बासकीची थाप दिली.
थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू झाला. माझं नाव पुकारण्यात आल. मी स्टेजवर गेलो. तेव्हाचे भाजपाचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांना श्री. बापट साहेब सांगायला लागलेत. देवेंद्रजी, प्रशांत माझ्या गावचा आहे बर का ? आणि फडणवीस यांनी सुद्धा त्यांना रिप्लाय देत माझ्यावर डबल शाबासकीची थाप दिली. बापट साहेबांची ती आपुलकी मी कधीच विसरू शकणार नाही.
त्यानंतर ते मंत्री झालेत. मी मुंबईत येण्यापूर्वी ग्रामीण पत्रकारिता करायचो, टिनाच्या पत्र्याचे संपर्क कार्यालय उभारले होते. माझ्या आग्रहास्तव माझ्या पच्छात त्यांनी इतर ग्रामीण पत्रकारांच्या उपस्थितीत माझ्या कार्यालयाचे लोकार्पण सुद्धा केले. त्यानंतर श्री. बापट साहेब जेव्हा कधी गावी यायचे भेटी व्हायच्या. अशा अनेक त्यांच्या आठवणी आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला जरी पुण्यातून सुरू झाली असली तरी, त्यांचे मूळ चांदुर रेल्वे तालुक्यात आहे. त्यामुळे श्री.गिरीश बापट यांच्या निधनाची बातमी माझ्यासाठी फारच वेदनादायी आहे.
त्याच्या आत्म्यास शांती मिळो.प्रशांत कांबळे पत्रकार मुम्बई
