संविधान आमुचा प्राण – कवि सागर 

संविधान आमुचा प्राण – कवि सागर 

धर्मांच्या रंगांची चर्चा इथे जोरदार आहे
सज्ज व्हा गड्यांनो! अस्मिता टोकदार आहे

आम्ही मूलनिवासी इथले, न कुणाचे डर आहे
सात बारा तयांचा खैबरखिंडी पार आहे

ते लादनार आहेत छुपा अजेंडा तरीही
ओळखा डाव तयांचा ते कुटील फार आहे

न धर्म खतऱ्यात, प्राण खुर्चीत आहे
खोक्यात खपलेले स्तंभ लाचार आहे

न वार थांबलेले जखमा अजून ताज्या
घ्या वेध शब्दांनो! अंतिम वार आहे

चळवळ झाली क्षीण, नेतेच फितूर झाले
हातातल्या लेखनीला क्रांतीची धार आहे

संविधान अमुचा प्राण, तो दीपस्तंभ आहे
घ्या झेप पंखांनो, पल्ला लांब फार आहे

-सागर शेषराव गवई (चांदूर रेल्वे,अमरावती महाराष्ट्र)

ताजा अपडेट