भारतीय संस्कृतीच्या प्रकारार्थ डॉ . सेठ यांची सायकल यात्र कश्मीर वरुन नागपूर ला येणार

भारतीय संस्कृतीच्या प्रकारार्थ डॉ . सेठ यांची सायकल यात्र कश्मीर वरुन नागपूर ला येणार
नागपुर – भारतीय शास्त्रीय संगीत व संस्कृतीचा युवा वर्गात प्रचार व प्रसार करणारी भारतीय संगीत संस्था स्पिक मॅके चे संस्थापक डॉ . कैरो मीरजा सेठ वयाच्या ७३ व्या वर्षी सद्या काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा करीत आहे त्यांनी १५ ऑगष्ट ला सायकल यात्रा सुरु केली असून १ ९ नोव्हेंबर ला ते नागपूर ला पोहचणार आहे नागपूर भेटीत ते भालेराव कॉलेज सावनेर , आय . एम . टी . कळमेश्वर येथे शिक्षक व विद्याथ्र्यांशी भेट करुन १ ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सेंटर पॉईंट स्कुल , अमरावती बायपास येथे विद्याथ्र्यांशी संवाद साधतील . यानंतर दुपारी दक्षिण मध्य संस्कृतीक केंद्राला भेट देतील व सायंकाळी ५.०० वाजता पत्र परिषद घेतील .

तसेच २० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता व्हि.एन. आय.टी. अभ्यंकर नगर , नागपूर . येथे भेट देतील व येथे त्यांना सत्कार करण्यात येईल . याच ठिकाणी दुपारी २ ते ३ सर्व शालेय प्राचार्य व व्यवस्थापकांशी संवाद साधला जाईल् . यानंतर सायंकाळी ५ वाजता स्पिक मॅके महाराष्ट्रातील कार्यकत्यांनी बैठक होणार आहे . वरील नागपूर भेटी नंतर डॉ . किरण सेठ बुटीबोरी , वर्धा , वरोरा , वणी मार्ग हैद्राबाद कडे रवाना होणार आहे .

ताजा अपडेट