बाजारगाव परिसरात वाघिणीचा मृत्यू…हिंगणा वन परिक्षेत्र,अंतर्गत घटना घात पात असल्याची परिसरात उलट सुलट चर्चा वनविभाग पोहचले घटनास्थळी

Follow Us on :

बाजारगाव परिसरात वाघिणीचा मृत्यू…हिंगणा वन परिक्षेत्र,अंतर्गत घटना
घात पात असल्याची परिसरात उलट सुलट चर्चा
वनविभाग पोहचले घटनास्थळी

बाज़ारगाव ,नागपुर (गजेंद्र डोंगरे) – येथून जवळच असलेल्या चनकापूर (माळेगाव) शिवारात काल सकाळी गावातील सुरेश गेडाम हे सकाळी शौचास गेले असता त्यांना नदीपात्रात वाघ पडून असल्याचे दिसले. तो हालचाल करीत नसल्याने संशय आला व मरण पावला असल्याचे लक्षात येताच गावातील पोलीस पाटील व सरपंच यांना माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच वन विभागाला कळविण्यात आले वनविभागाची चमू सायंकाळी ४ वाजता पोहचल्या मुळे पंचनामा होवू शकला नाही.
उपक्षेत्र उमरी (वाघ) नियत क्षेत्रं नेरी मानकर, कक्ष क्रमांक 151PF, पासून 1किमी चनकापुर माळेगाव बुजुर्ग प ह न क्र 51 येथील महसुल चे नाल्यामध्ये 3-4 वर्ष वयाची वाघीण मृत असल्याचे दिसून आलें . लागलीच वरिष्ठ अधिकारी यांना कळविण्यात आले. रात्र झाली असल्याने शव विच्छेदन दुसऱ्या दिवशी सकाळी करण्याचे ठरले. सकाळी हिंगणा वनपरिक्षेत्र चे कर्मचारी यांनी NTCA च्या मार्गदर्शन सूचना नुसार कार्यवाही केली.


तसेच NTCA प्रतिनिधि अजिंक्य भटकर मानद वन्यजीव संरक्षक, PCCF (wildlife) चे प्रतिनिधि यांचे समक्ष पंचनामा तयार करण्यात आला. तर शवविच्छेदन हे पशू वैद्यकीय अधिकारी यांनी केला. प्राथमिक माहिती नुसार वाघिणीचा मृत्यू हा हृदय श्वसन क्रिया बंद पडल्याने ( Cardiac respiratory failure) झालेला असल्याचे दिसून आले आहे. फॉरेन्सिक करीता नमुने घेण्यात आले असुन RFL नागपूर येथे पाठविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानंतर दहन पंचनामा नोंदवण्यात आला.

याकरिता मा. श्री रंगनाथ नईकडे, मुख्य वनसंरक्षक नागपूर वनवृत्त यांचे मार्गदर्शना खाली उपवसंरक्षक श्री पी जी कोडापे यांनी कार्यवाही केली असुन पुढील तपास श्री आशिष निनावे सहायक वनसंरक्षक (अतिरिक्त कार्यभार) नागपूर हे करित आहेत.


पत्रकार व गावतिल सरपंच पोलीस पाटील यांना घटनास्थळी जाण्यास मनाई

वास्तविक पाहता वन विभागाने गावातील सरपंच पोलीस पाटील यांना पंचनामा करताना बोलावाले लागते परंतु तसे झाले नाही तर वृत संकलन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना सुद्धा माहिती दिली नाही. व घटना स्थळी जाऊ सुधा दिले नाही यामुळे

नदीपात्रात वाघाचा मृतदेह कसा?
या घटनेनंतर वाघाचा मृत्यु विध्धुत करंट लागून मेला असावा व नंतर वाघाचा मृतदेह नदीपात्रात आणून टाकल्याचा संशय गावकरी करीत असून वन विभाग तपास लावणार का? अशी उलट सुलट चर्चा गावकरी करीत आहे.
व वन विभाग यांनीच सर्व कर्मचारी घेऊन पंचनामा व गावातील सरपंच पोलीस पाटील मान्यवर व्यक्ती यांच्या कुणाही एकाच्यातरी समोर पोस्टमार्टम केले त्यामुळे गावातील लोकांना उलट सुलट चर्चा करण्याची संधी मिळाली
घटनास्थळी डॉग स्कॉट उपलब्ध
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वाघ हा मारला की मारून टाकला त्यामुळे घटनेची शहानिशा करण्याकरिता डॉग ला पाचारण करण्यात आले होते.आता वाघ मृत्यु प्रकरण क़ाय मोड़ घेईल हे तर चौकशी अंति माहित पडेल…वाघाचा घात पात तर नाही ना याही दिशेने चौकशी होईल .

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए