धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
– महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे आयोजन
WH News प्रतिनिधी/नागपूर
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपुरात लाखो अनुयायांना पवित्र दीक्षाभूमी येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आज त्या ऐतिहासिक घटनेला ६६ वर्ष पूर्ण झालेत. आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीम चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. कुणालदादा राऊत यांच्या मार्गदर्शनात आणि उत्तर नागपूर विधानसभा अध्यक्ष निलेश खोब्रागडे यांच्या नेतृत्वात सचिन वासनिक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
याप्रसंगी गौतम अंबादे, दिनेश यादव, सुरेश जाग्यासी, गोपाळ राजवाडे, चेतन तरारे, दुर्गेश पांडे, कुणाल निमगडे, राकेश ईखा़र, आकाश इंदुरकर, अभिलाष सिरसाट, अश्विन कुमार, सुहास नारनवरे, सुशांत गणवीर, उमेश डाखोरे, विलियम साखरे, शशी उके, सागर डोंगरे, मनीष टेंभुर्ण, तुषार बोरकर, गौतमी नारनवरे, महेश्वरी तरारे, प्रणाली गावंडे , तपन बोरकर, विलेश हुमने, सोनु मनोहरे, विजय सोमकुंवर, संदीप अंबादे, अंकुश शेंडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
