अत्यंत दुर्दैवी व मन सुन्न करणारी घटना आज जुना धामणगाव येथे घडली.

Follow Us on :
अत्यंत दुर्दैवी व मन सुन्न करणारी घटना आज जुना धामणगाव येथे घडली.धामणगाव विधानसभा मतदार संघIचे,युवा आमदार प्रतापदादा अडसड यांच्या समय सूचकतेने अवघ्या एक तासात रेस्क्यू टीम पोहोचली जुना धामणगाव येथील घटनास्थळी.

 

WH-NEWS (मंगेश बोबडे )धामणगाव रेल्वे :-दाभाडा शेत शिवार अंतर्गत शेतमजुरी काम करत असताना अचानक आलेल्या पावसामुळे संगीता सुधाकर शेलोटे व आणखी तीन महिला ज्या शेतमजुरी करत होत्या त्या घरी परतत असताना दाभाडा भागांमध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली. पाण्याचा प्रवाह इतका मोठ्या प्रमाणामध्ये होता की शेतशिवारातून वाहणाऱ्या नाल्यांनी रोद्र रूप धारण केले यामध्ये जुना धामणगाव येथील तीन महिला पाण्यात नाल्यामध्ये वाहून जात होत्या यामध्ये दोन महिला सुखरूप यामधून बाहेर पडल्या व एक महिला संगीता शेलोटे या त्या पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या ज्यांचा अद्यापही पत्ता लागलेला नसून रेस्क्यू टीम यामध्ये आपले कार्य बजावत आहे.

जुना धामणगाव येथील सरपंच विश्वेश्वररावजी दिघाडे व जुना धामणगाव येथील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शामभाऊ गंधे यांनी नांदगाव खंडेश्वर येथे विकास कामांच्या उद्घाटनांमध्ये व्यस्त असताना आमदार प्रतापदादा अडसड यांना फोन केला व सदर घटना त्यांना कळवली आमदार प्रतापदादा अडसड यांनी त्वरित संबंधित विभागाशी संपर्क करून अवघ्या एका तासांमध्ये रेस्क्यू टीमला जुना धामणगावला पोहोचण्या संदर्भात निर्देश दिले व एका तासात जुना धामणगाव येथे रेस्क्यू टीम पोचली व त्यांचे पुढील कार्य या ठिकाणी चालू आहे.*

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए