केरळ विधानसभा निवडणुकीत नागपूरच्या भाजप नेत्यांचा झंझावात
नागपूर WH NEWS : भारत निवडणूक आयोगाने केरळ विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या नुसार प्रचाराला सुरुवात झालेली आहे, संपूर्ण राज्यामध्ये ९ एप्रिल रोजी मतदान आणि ४ मे रोजी निकाल घोषित केले जाणार आहेत. केरळच्या १४० विधानसभा जागांसाठी होणाऱ्या या रणधुमाळीत सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूरमधील भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांकडे केरळमधील महत्त्वाच्या मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली असून, हे सर्व नेते सध्या केरळमध्ये पूर्णवेळ ठाण मांडून बसले आहेत.
महाराष्ट्रातील ८७ नेते १४० पैकी ८१ विधानसभा क्षेत्रात आपलं निवडणूक कौशल्य पणाला लाऊन पूर्णवेळ काम करत आहेत,पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे पालन करत नागपूरचे नेते आपापल्या नियुक्त विधानसभा क्षेत्रात प्रचाराचा धडाका लावत आहेत. यामध्ये मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके हे तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील ‘कझकूटम’ विधानसभा मतदारसंघात प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. माजी आमदार अनिल सोले यांच्याकडे ‘नेयाट्टीनकारा’ विधानसभा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे, तर माजी आमदार गिरीश व्यास हे ‘नेमम’ विधानसभा मतदारसंघात सक्रियपणे कार्य करत आहेत. तसेच आमदार परिणय फुके हे ‘पुनजर’ विधानसभा मतदारसंघात पूर्णवेळ उपस्थित राहून प्रचाराचे सूक्ष्म नियोजन आणि संघटन बांधणीवर भर देत आहेत.नागपूरच्या या अनुभवी नेत्यांनी केरळमधील स्थानिक कार्यकर्त्यांच्या साथीने जनसंपर्क मोहिमा आणि प्रचार सभांचा धडाका सुरू केला आहे.सोबतच विदर्भातील आर्वी विधानसभा चे आमदार सुमित वानखेडे,गडचिरोली चे आमदार मिलींद नरोटे,वरोरा चे आमदार करण देवतळे,चिखली चे आमदार श्वेता महल्ले,अकोला चे आमदार रणजीत पाटील,धामणगाव रेल्वे चे आमदार प्रताप अडसड विविध विधानसभा सभेत पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत, केरळमध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी हे सर्व नेते दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. नागपूरच्या या नेत्यांच्या सक्रिय सहभागामुळे केरळमधील भाजपच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.सर्वांच्या परिश्रमा मुळे व केरळ मधील जनतेच्या सहकार्याने भाजपाला या वेळी नेत्रदिपक यश मिळेल या बाबत खात्री आहे.
