हिंगणा तालुक्यात भ्रष्टाचाराचा स्फोट! प्रशासनावर गंभीर आरोप,!MIDC भागात अवैध धंद्यांनी गाठला कळस! मुख्यमंत्री फडणवीस कडे करणार तक्रार -लोहितकर
हिंगणा प्रतिनिधी WH NEWS –( गजानन ढाकूलकर):
नागपूर जिल्हा हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा असतानाही हिंगणा तालुक्यात भ्रष्टाचार आणि अवैध धंद्यांनी अक्षरशः मोकाट धाव घेतल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. मानव अधिकार सेवा संघटनेने केलेल्या पाहणीत प्रशासनाच्या अनेक विभागांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
तलाठी ते पोलिस – सर्वच यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात
हिंगणा तालुक्यातील तलाठी कार्यालय, महसूल विभाग, उपभूमी अभिलेख कार्यालय, ग्राम पंचायत आणि पोलिस विभाग यांच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचा दावा करण्यात आला आहे.
नोंदींमध्ये गोंधळ, शासकीय जमिनीवर वाढलेले अतिक्रमण, अनधिकृत लेआउटना मिळणारे कथित संरक्षण आणि भू-माफियांची वाढती पकड – या सर्व बाबींमुळे सामान्य नागरिक आणि शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत.
एमआयडीसी परिसरात अवैध धंद्यांचा अड्डा?
हिंगणा MIDC परिसरात सट्टापट्टी, जुआ, गांजा, MD विक्रीसारखे गंभीर अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे – पोलिस विभागाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने संशय अधिक गडद झाला आहे. कार्यवाही मात्र थातूमातूर होते नंतर धंदे सुरु होते असे का?
ग्रामपंचायत स्तरावरही अनियमिततेचा कहर!
ग्रामपंचायत पातळीवर नियंत्रणाचा अभाव, अनियमित कामकाज आणि स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे निरीक्षण समोर आले.
यामुळे ग्रामीण भागातील विकासकामांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मानव अधिकार सेवा संघटनेचा मोठा खुलासा!
महाराष्ट्र मानव अधिकार सेवा संघटनेचे माजी अध्यक्ष आणि माहिती अधिकार महासंघाचे जनसंपर्क सल्लागार संजय लोहितकर यांनी हिंगणा तालुक्याची पाहणी करताना हे सर्व मुद्दे उघड केले.
त्यानंतर राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे कार्यालयात भेट देऊन महाराष्ट्र उपाध्यक्ष गजानन ढाकूलकर यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली.
कठोर कारवाईची मागणी – वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेरणार!
या सर्व प्रकरणांवर तातडीने कारवाई करण्यासाठी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.भ्रष्टाचार आणि अवैध धंद्यांविरोधात मोठे आंदोलन उभारण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
मोठा सवाल…?
– नागपूर जिल्ह्यासह हिंगण्यात सुरू असलेले अवैध धंद्याचा कारभार थांबणार का?
– प्रशासन खरोखर जागं होणार का?
की सर्व काही ‘सिस्टिम’च्या आड दडणार? असा प्रश्न करीत यावर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष द्यावे अशी मागणी संजय लोहितकर यांनी केली आहे.
