सालोरा बुद्रुक येथे कन्यारत्न जन्माचे अभिनंदन – ग्रामपंचायतीकडून ₹५,००० चा धनादेश
तिवासा WH NEWS – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत 17 सप्टेंबर 2025 नंतर गावात जन्माला येणाऱ्या मुलींचे स्वागत व सन्मान करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने ग्रामपंचायत सालोरा बुद्रुक तर्फे गावात जन्मलेल्या कन्यारत्नाच्या कुटुंबाला प्रोत्साहनपर सानुग्रह म्हणून ₹५,००० रुपयांचा धनादेश देऊन अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी सरपंच ममताताई जाधव, उपसरपंच नीताताई धाकडे, सदस्य वैशालीताई राठोड, हिरालाल राठोड, शिक्षण समिती अध्यक्ष गणेश दयाराम राठोड, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनायकराव तसरे, चापालाल महाराज बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष मदन महाराज यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक खेमराजजी जाधव, साहेबरावजी धाकडे, नंदूभाऊ नागपुरे, राजाभाऊ राऊत, प्रीतम तसरे, सुरेशराव तसरे, स्वप्निल राऊत, नंदूभाऊ धाकडे, प्रकाशभाऊ चव्हाण, अरविंद चव्हाण, निलेश राठोड, विश्वजीत बाखडे, निरंजन राठोड, विशाल जाधव, विशाल चव्हाण, अमर राठोड, सचिन जाधव, उमेश राठोड, अजय राठोड, गजानन राठोड, परसराम राठोड,
ग्रामपंचायत कर्मचारी वसुदेव चव्हाण, रोजगार सेवक बळीराम राठोड, उकंड राठोड, विजय जाधव, गणेशभाऊ जाधव, गजानन वानखडे, संजय जाधव, आर्यन राठोड, प्रफुल कांबळे, गजानन मोहोळ, श्रीकृष्णभाऊ मनोहरे, पंजाब थोरात, सोनूसिंग बावरी व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे गावात कन्यारत्न जन्माचे स्वागत व मुलींच्या सन्मानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत असून ग्रामपंचायत सालोरा बुद्रुकचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.
