जिष्णू देव वर्मा यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ!
मुंबई, दि. १० WH NEWS : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली.

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत.
सुरुवातीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जिष्णू देव वर्मा यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.
शपथविधी सोहळ्याला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन नरहरी झिरवळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अनेक कलाकृती विविध पर्यटनस्थळे, मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी मांडण्यात आल्या आहेत.
ते एक प्रख्यात कवी आणि लेखकही आहेत. बंगाली आणि इंग्रजी भाषेतील त्यांच्या कवितांनी अनेकांच्या मनाला स्पर्श केला आहे. त्यांच्या Children of Water Goddess आणि Master of Time या पुस्तकांमधील साहित्यिक अभिव्यक्ती प्रभावी आणि भावस्पर्शी मानली जाते.
त्यांच्या मते जीवन हा एक गहन प्रवास आहे—ज्यात प्रत्येक क्षण हा एक पवित्र आहुती आहे आणि प्रत्येक आव्हान हे ज्ञान व धैर्य वाढविण्याची संधी आहे. त्यांच्या कवितेतील शब्दांत ते असे म्हणतात—
“Let us carry hope in our souls,Not only for ourselves,But for those too,Who look upon us with hope.”आदिवासी विकास, शिक्षण, आरोग्य तसेच कला आणि संस्कृती यांप्रती त्यांची अत्यंत निष्ठा आणि बांधिलकी आहे.
३१ जुलै २०२४ रोजी जिष्णु देव वर्मा यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर १० मार्च २०२६ रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.आपल्या स्नेहपूर्ण स्वभावामुळे ते सर्व स्तरांतील लोकांशी सहजतेने संवाद साधतात आणि सामान्य नागरिकांसाठी नेहमी उपलब्ध असतात.
समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना आधार देऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणे यातच जीवनाचे सार्थक आहे असे ते मानतात.
