वडोदा येथे ‘रघुपती राघव राजा राम’ सत्याग्रह; अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणी कारवाईची मागणी

Follow Us on :

वडोदा येथे ‘रघुपती राघव राजा राम’ सत्याग्रह; अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणी कारवाईची मागणी
वडोदा (प्रतिनिधी): अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणाचा निषेध नोंदवत व दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी रविवारी (दि. १२ जुलै २०२६) वडोदा येथे ‘रघुपती राघव राजा राम’ सत्याग्रह शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या आंदोलनाचे नेतृत्व व आयोजन प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे यांनी केले.

सत्याग्रहाची सुरुवात वडोदा येथील पुरातन विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भजन-कीर्तनाने झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात “देव हा बाजारचा भाजीपाला नाही रे” आणि “रघुपती राघव राजा राम” यांसारखी भक्तिगीते सादर करण्यात आली. यावेळी देशातील सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी लाभावी तसेच प्रभू श्रीराम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा व्हावी, अशी प्रार्थना करण्यात आली.
यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून दिंडी काढण्यात आली. ही दिंडी संपूर्ण गावातून मार्गक्रमण करत वडोदा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ समाप्त झाली. दिंडीदरम्यान “राम आमच्या मनात, राम आमच्या संविधानात”, “राम नाम जपना, मंदिर का माल अपना” आणि “राम मंदिर के लूट का साथीदार सत्ताधारी और संघ परिवार” अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच लहान मुलांनी सादर केलेल्या भजनांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

सत्याग्रहानंतर वडोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टशी संबंधित काही पदाधिकाऱ्यांसह इतर अज्ञात सह-कटकारस्थान्यांविरोधात कथित देणगी चोरी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
या सत्याग्रहात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मीताई बर्वे, जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्विनजी बैस, प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे, तापेश्वरजी वैद्य, ज्ञानेश्वरजी वानखेडे, राजेंद्रजी लांडे, अनंताजी वाघ, मंगलमूर्ती थोटे, छाया हलमारे, पंकज ढोरे, अर्जुनजी राऊत, सुधाकरजी ठवकर, जोगेश्वरी कुठे, रमेश राऊत, निलेश कळंबे, विलास मोहोळ, शुद्धोधनजी मानवटकर, चंद्रकांतजी ढोंगे, पंकज कुथे, कोठीरामजी महल्ले, अल्पेश ठाकरे, महेंद्र मोटघरे यांच्यासह विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष नानाभाऊ मंडलिक, पुरुषोत्तमजी वाघाये, सुनीलजी धुसान, वामन बोबडे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि भक्तगण उपस्थित होते.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए