जल सैनिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्षांची घोषणा – जल, जमीन आणि जंगल संवर्धनासाठी राज्यभर संघटन विस्ताराला गती!

Follow Us on :

जल सैनिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्षांची घोषणा

– जल, जमीन आणि जंगल संवर्धनासाठी राज्यभर संघटन विस्ताराला गती!

अमरावती WH NEWS –  जल, जमीन आणि जंगलाच्या संरक्षण व संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या जल सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या विविध जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. ही नियुक्ती संघटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष ॲड. राजीव अंबापुरे यांनी केली.

या निवडीद्वारे संघटनेच्या राज्यव्यापी विस्ताराला चालना मिळणार असून पर्यावरण संरक्षण, जलसंधारण, जलप्रदूषण नियंत्रण, वृक्षसंवर्धन, जंगल संरक्षण आणि नैसर्गिक संसाधनांच्या जतनासाठी संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष ॲड. राजीव अंबापुरे यांनी दिली.

राज्यातील उर्वरित जिल्हाध्यक्षांची तसेच तालुकाध्यक्षांची नियुक्ती पुढील महिन्यात जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नव्याने नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

नियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे :

  • वाशीम जिल्हा – अध्यक्ष: सुभाष नानवटे, कार्याध्यक्ष: शंकर म्हस्के
  • बुलढाणा जिल्हा – अध्यक्ष: उषा वनारे, कार्याध्यक्ष: विष्णू ढोन
  • अकोला जिल्हा – अध्यक्ष: तुषार हांडे, कार्याध्यक्ष: वैशाली भटकर
  • यवतमाळ जिल्हा – अध्यक्ष: रवींद्र राऊत, कार्याध्यक्ष: गुणवंत घावडे
  • अमरावती जिल्हा – अध्यक्ष: योगेश रघुवंशी, कार्याध्यक्ष: प्रकाश रंगारी
  • वर्धा जिल्हा – अध्यक्ष: योगेश कांबळे
  • नागपूर जिल्हा – अध्यक्ष: विजय खवसे
  • चंद्रपूर जिल्हा – अध्यक्ष: रवींद्र ठमके
  • रत्नागिरी जिल्हा – अध्यक्ष: शाम गिरकर
  • पुणे जिल्हा – अध्यक्ष: रोहिणी दीक्षित

संघटनेने “जल, जमीन आणि जंगल” या त्रिसूत्रीच्या संरक्षणासाठी जनजागृती, लोकसहभाग आणि पर्यावरणपूरक उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए