नागपूर दीक्षाभूमीवर महिला उपासिकेशी गैरवर्तन; दोघी महिलांविरुद्ध बजाजनगर पोलिसांत गुन्हा दाखल
आंबेडकरी महिला, भिक्षु ने उठवीला आवाज.. झाला गुन्हा दाखल!
नागपूर, WH NEWS 11 जुलै : – दीक्षाभूमी परिसरात एका 65 वर्षीय बौद्ध उपासिकेशी कथितरित्या गैरवर्तन, विनयभंग, धमकी तसेच तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सरोज शिवराज मेढे उर्फ विशाखा भिक्षुणी (वय 65) यांनी दिलेल्या तक्रारीवरून माया उके आणि मंगला उडके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 10 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 9.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी परिसरात घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी या दीक्षाभूमीवर वंदना करीत असताना आरोपी महिलांनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर अंगावरील वस्त्र ओढण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ चित्रीत करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 74, 76, 296, 351(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी नारायण बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
भन्ते वर झालेला अन्याय सहन करणार नाही
काही आपल्याच महिलांनी भिक्षुनी सोबत जो प्रकार केला तो निंदनीय आहे. एका सामान्य महिलेला एका भिक्षुणीचे चिवर उतरविण्याचा काय अधिकार आहे. जो प्रकार घडला तो निंदनीय आहे.
भन्ते हर्षबोधी महास्थवीर
