मेक्सीला कट लागल्यावरून चालकाची निर्घृण हत्या! -पत्नीची आरोपींना तात्काळ अटक करण्याची डिजिटल मीडिया पत्रकार परिषद मध्ये केली मागणी

0
1

मेक्सीला कट लागल्यावरून चालकाची निर्घृण हत्या!

पत्नीची आरोपींना तात्काळ अटक करण्याची डिजिटल मीडिया पत्रकार परिषद मध्ये केली मागणी

नागपूर | WH NEWS प्रतिनिधी
नारी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका चालकाची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना 25 ऑक्टोबर 2025 रोजी म्हाडा कॉलनी, ब्लॉक क्रमांक 10 येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक राजेश विश्वास वरेकर (48) हे चालक म्हणून काम करत होते. त्यांच्या फोर व्हिलर वाहनाचा कट मेक्सीलगत लागला या किरकोळ कारणावरून आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. 8 ते 10 जणांनी धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
फक्त दोन आरोपी अटकेत, मुख्य आरोपी FIR मध्येच नाही?
पत्नी सोनू राजेश वरेकर यांनी डिजिटल मीडिया भवन येथे गुरुवारी घेटलेल्या पत्रकार परिषद मध्ये गंभीर आरोप केले आहेत.

त्यांच्या म्हणण्यानुसार
• पोलिसांनी फक्त दोन आरोपींना अटक केली असून
• मुख्य आरोपी हनी ठाकूर याचे नाव FIR मध्येच समाविष्ट केलेले नाही
• इतर आरोपी अजूनही फरार आहेत
पत्नीने सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ओळखले गेलेले आरोपी
तक्रारदारांनी दिलेल्यानुसार, हल्ल्यात सहभागी असलेले आरोपी:
• हनी ठाकूर (मुख्य आरोपी – FIR मध्ये नाव नाही)
• कल्पेश रांभा
• लकी वाघमारे
• अंगत डहाट
• चूटका रामटेके
• हर्ष कुथे
• गौरव कुथे
गरीब कुटुंब उघड्यावर
मृतक राजेश वरेकर यांच्या पत्नी व दोन मुलांवर अचानक आलेले हे संकट कोसळले असून कुटुंब आर्थिकदृष्ट्या अतिशय अडचणीत आहे. त्यांनी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here