Category: विदर्भ

  • वाडीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

    वाडीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

    वाडीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी
    वाडी :महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेची ज्योत राज्यातील जनमानसात पेटवून शिवसेना संघटनेची स्थापना करून हिंदुत्वासाठी प्रखर लढा उभारणारे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची नव्यान्नववी जयंती 23 जानेवारी ला साजरी करण्यात आली.

    वाडी शहर शिवसेना व युवासेना च्या वतीने वाडी येथील वंदनीय बाळासाहेब ठाकरे चौकातील बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनासह माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.वंद.बाळासाहेब ठाकरे यांनी कणखर धोरणाचा अवलंब करून महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी दिलेल्या प्रखर लढ्याचा जीवन प्रवास शहर प्रमुख मधू माणके पाटिल यांनी आपल्या भाषणातून सांगितला. यावेळी विधानसभा संघटन प्रमुख संतोष केचे यांच्या हस्ते केक कापून मिठाईचे वितरण करण्यात आले.

    यावेळी उप तालुकाप्रमुख रुपेश झाडे, जेष्ठ शिवसैनिक हरिशभाई हिरनवार, दिलीपभाऊ चौधरी,प्रमोद जाधव,चंदन दत्ता, उमेश महाजन, किशोर ढगे,विलास भोंगळे, भोजराज भोंगळे, सचिन बोंबले, क्रांती सिंग, लखन राऊत,कमल तायडे, सुबोध जांभुळकर, मनोज नगरारे , अभय वर्मा,शिवनारायण पवार,सुभाष माने,दशरथ वांगे,अमोल सोनसरे, बंडू चौधरी व मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.

  • प्रभाकर दुपारे समग्र नाटक ला शब्दगंध पुरस्कार

    प्रभाकर दुपारे समग्र नाटक ला शब्दगंध पुरस्कार

    प्रभाकर दुपारे समग्र नाटक ला शब्दगंध पुरस्कार

    नागपूर,-प्रसिद्ध नाटककार प्रभाकर दुपारे यांच्या नुकतेच प्रसिद्ध झालेल्या प्रभाकर दुपारे समग्र नाटक या पुस्तकाला अहमदनगरच्या शब्दगंध राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर करण्यात आला. येत्या ९ फेब्रुवारी रोजी नगर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात हा पुरस्कार देण्यात येईल.

    शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र उदागे, उपाध्यक्ष माजी प्राचार्य पी पी. ढाकणे, सचिव सुनील गोसावी, राज्य संघटक डॉ. अशोक कानडेव नियोजन समितीचे प्रमुख बबनराव गिरी यांनी ही घोषणा केली. या पुस्तकात प्रभाकर दुपारे यांनच्या एकुण १० गाजलेल्या नाटकांचा समावेश आहे. शब्दगंधच्या वतीने या सोबतच तळ हातावर उगवलेल्या कविता (सुनील कोंडके, निवडुंगाची काटे जी.जी.कांबळे (साकव (अंगीता पुराणीक) तडजोड (निवृत्ती जोरी) जिव्हाळ्याची माणसं (भास्कर बंगाळे, (ऑल इज वेल (विनय मिरासे) मराठी तेलगु भाषिक अनुबंध (डॉ. आत्मराम राठोड, गंपुच्या गोष्टी, (गौरव भुकन) काव्य संकल्प (हनुमान माने) संकिर्ण संत तुकाराम एक चिंतन (डॉ. सभिाष बागल) यांना जाहीर करण्यात आला आहे. स्मृती चिन्ह, शाल, सन्मान चिन्ह व ग्रंथ भेट असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

  • आम्ही फुले आंबेडकरांचे नाव घेणारे अनेक सुरात का बोलतो आणि ब्राह्मण एका सुरात का बोलतात..! नागेश चौधरी 

    आम्ही फुले आंबेडकरांचे नाव घेणारे अनेक सुरात का बोलतो आणि ब्राह्मण एका सुरात का बोलतात..! नागेश चौधरी 

    आम्ही फुले आंबेडकरांचे नाव घेणारे अनेक सुरात का बोलतो आणि ब्राह्मण एका सुरात का बोलतात..! चौधरी 

    डॉक्टर आंबेडकरांचे बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन जे अनेक पक्ष आणि संघटना झालेल्या आहेत त्यांची वक्तव्य पाहिली म्हणजे त्यांच्यात देखील एक सूर दिसत नाही परस्परांच्या विरोधी बोलताना दिसतात आणि सगळे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतात त्याचप्रमाणे महात्मा फुले यांचे नाव घेणारे देखील अनेक संघटनांमध्ये विभाजित आहेत अनेक पक्षांमध्ये विभाजित आहे शाहू महाराजांचे नाव घेणारे किंवा शिवाजी राजांचे नाव घेणारे देखील एकत्र नाहीत ते देखील अनेक संघटनांमध्ये आणि पक्षांमध्ये विखुरलेले आहेत अर्थात ब्राह्मण एक सूर्य होत आहे आणि बहुजन बहुसुरी आहेत याला कारण काय तुमचे आदर्श एक असताना तुम्ही फटाफट का आहात फाटाफटीत का आणि का आहात आणि ते मात्र एकत्र का आहेत आणि त्यांच्यात फटाफट का नाही याचा विचार बहुजनात बहुजन जे यांना ते आदर्श मानतात त्यांचे नाव घेत अनेक संघटना का काढतात आणि ब्राह्मण जेव्हा अनेक संघटना काढतात तेव्हा ते एका सुरात बोलतात एकामेकाच्या विरुद्ध बोलत नाही उदाहरणार्थ आरएसएसचे लोक विश्व हिंदू परिषदेचे लोक विद्यार्थी परिषदेचे लोक किंवा त्यांच्या ज्या अनेक संघटना आहेत ते ते एका सुरात बोलतात एकमेकांच्या विरुद्ध बोलत नाही कोणाशी स्पर्धा करत नाही.

    उदाहरणार्थ विश्व हिंदू परिषद आणि आरएसएस किंवा एबीव्हीपी चे लोक हे कधीही एकमेकाची गुणी दोन्ही काढत नाही किंवा एकमेकांना शिव्या घालत नाही त्यांच्यामध्ये नेतृत्वाची स्पर्धा नाही आणि आमच्या मध्येच नेतेगिरीची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा का आहे याचा विचार आम्ही करतो का ते जसे अनेक संघटना काढून एक सूर्य आहेत परंतु आमच्या अनेक संघटना अनेक सूर्य आहेत किंवा असं म्हणता येईल की बे सूर्य आहेत आमच्यामध्ये सुरू नाही म्हणजे आम्ही असू राव हे सिद्ध करतो का मला असं वाटते हेच खरे आहे कारण सूर यांना ब्राह्मण म्हणतात म्हटल्या जातं ते एकत्र आहेत आणि आम्ही असू का होत असुर का होत याचा विचार केला पाहिजे हे असून अनेक सूर्य असणं हे आमच्या विभाजनाचा कारण आहे हे आमच्या केव्हा लक्षात येतील आमच्या म्हणजे आम्ही जे एससी एसटी ओबीसी मध्ये किंवा ज्यांना मायनॉरिटी म्हणतात त्यांच्यामध्ये एक सूर्यपणा का नाही कारण शोधायला हवे.

    त्याला कारण हे दिसते की त्यांचं ध्येय एक आहे ते एकत्र आहे म्हणून नव्हे तर एक जाती आहे म्हणून नव्हे तर त्यांनी हे ठरवलं आहे की त्यांचे ध्येय हे वर्चस्वाचे आहे आणि आमचे बहुजनांचे ध्येय नाही आम्ही जेव्हा हे कसुरी होऊ तेव्हाच आम्ही त्यांच्याशी मुकाबला करू शकू आणि जोपर्यंत आम्ही जातीमध्ये विखुरले आहोत जातीच्या नावाने उच्चनीच तेच विखुरले आहोत म्हणजे ब्राह्मणांचे आदेश मनुचे आदेश पाळत आहोत तोपर्यंत तुम्ही मनूचा मुकाबला करू शकत नाही म्हणून साप पराभव करू शकत नाही म्हणून एक तर आपल्याला एक सूर्य हवा लागेल किंवा एक जातीय व्हावं लागेल सर्व जाती विसरून आम्ही एक आहोत आमची जात एक आहे अशा प्रकारची मानसिकता तयार करण्याची जेव्हा निकर असेल आणि तिनी अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय तुम्ही बेसुरी राहणार नाही अनेक सुरात बोलणार नाही परस्परांच्या विरोधात बोलणार नाही आणि ब्राह्मणांच्या कह्यात राहणार नाही त्यांच्याच संघटनात जाऊन निसत्व स्वीकारणार नाही कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः विखुरलेल्या आहात फाटा फूट आहात तोपर्यंत तुम्ही त्यांचा मुकाबला करू शकत नाही तुम्ही विखुरण्यामध्येच किंवा फाटाफुटीमुळेच तुम्ही शक्तीहीन आहात तुम्ही स्वतःला या देशाचे मूळनिवासी समजणारे असल्यास परंतु तुम्ही मूळ भूमिका चापत नाही जपत नाही चालत नाही निर्माण करत नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे जोपर्यंत ब्राह्मण एक सूर्य आहेत संघटित आहेत त्यांचे एक आहे त्यांचं जे हिंदू राष्ट्राचं ध्येय आहे ते ब्राह्मण वरचे स्वादिष्ट व्यवस्था सत्ता हे आहे आणि तुमचं विखवलेलं पण तुमचं ध्येय पण विकलेला आहे तुमचं एक ध्येय नाही आहे आणि म्हणून तुम्ही शक्ती आहात हे लक्षात घ्या आणि आम्ही आमचे लोक ज्याप्रमाणे गमजा करतात बढाई मारतात शेती मारतात आणि विखुरतात ते लोक स्वतःच ध्येय निर्माण करू शकत नाही आम्ही ध्येयहीन जगत आहोत आणि ब्राह्मण ध्येयासहित जगत आहेत त्यांचं ध्येय म्हणजे मनुस्मृती लागू करणे ब्राह्मणांचे वर्चस्व लागू करणे ब्राह्मणांची व्यवस्था तिथे कशी राहील यासाठी ते सतत जागे असतात 24 तास काम करतात आणि आम्हाला आम्हाला देखील त्यांच्या कवेत घेतात गोड गोड बोलतात आणि म्हणतात तुम्ही सगळे हिंदू आहात तुमचे शत्रू मुसलमान आहेत अशा प्रकारची मानसिकता तयार करण्यामध्ये हीच त्यांचेच आहे तुमचे मुळीच येत नाही.

    या देशातील किंवा जगातील जे काही धर्म आहे ते धर्म उच्चनीच तेच विभागलेले नाहीत इथे जो धर्म सांगण्यात येतो त्यामध्ये जी उतरण आहे उतरंड आहे तशी उतरण कुठल्याही धर्मामध्ये नाही उदाहरणार्थ इस्लाम किंवा ख्रिश्चन नीती मध्ये पैगंबर हा प्रेषित आहे येशू ख्रिस्त हे प्रसिद्ध आहे आणि त्यांना मांडणारे सगळे भक्त आहेत जे कोणी भक्त आहे त्यांच्यामध्ये समानता आहे इस्लाममध्ये कोणी शूद्र त्याचप्रमाणे ख्रिस्तांमध्ये मूळतः मुळात विषमता नाही ब्राह्मण शूद्र असा भेद नाही आणि म्हणून हे धर्म समानतावादी आहेत असे म्हणता येईल परंतु ज्याला हिंदू धर्म म्हटले जाते त्याच्यामध्ये समानता दिसत नाही किंवा चर्चमध्ये कुणाल आहे जातीवरून प्रवेश नाही असा असे दिसत नाही परंतु इथे जो हिंदू नावाचा धर्म आहे त्या धर्माच्या मंदिरामध्ये देवाच्या नावानं विषमता आहे प्रवेश आहे सुधारणा आणि अतिषद यांना तसेच स्त्रियांना देखील प्रवेश नाही याचा अर्थ देव यांनी विषमतावादी केला आहे धर्म विषमतावादी केला आहे आणि लोकांना माणूस तिकडे घटना ठेवणारी भूमिका यांनी घेतली आहे हा धर्म होऊ शकत नाही धर्म हा समानतावादी नसेल मानवतावादी नसेल मानवाला अस्पृश्य करणारा असेल उच्चनीच ते विभागणारा असेल त्याला धर्म म्हणणं ही एक लबाडी आहे म्हणून हिंदू नावाचा धर्म आहे असे जे ब्राह्मण सांगतात ते मनुस्मृतीमध्ये आहे किंवा यांच्या वेदांमध्ये पुराणांमध्ये आणि अनेक स्मृतीमध्ये आहे, रामायण, महाभारतामध्ये आहे तो धर्म नाही. रामराज्य हे विषमतावादी राज्य राहणार आहे आणि म्हणून या देशांमध्ये रामाचं जे मंदिर झालेलं आहे त्या मागची भूमिका काय आहे ते लक्षात घ्यायला हवे.

    5 ऑगस्ट 2020 ला त्या राम मंदिर जागा पूजेच्या वेळी संघ चालक मोहन भागवत यांनी एक मनुस्मृती मधला श्लोक म्हटला होता ‘एतद्देशप्रसूतस्यतस्य सकाशादग्रजन्मन: | स्वं स्वं चरित्र शिक्षरेन् पृथ्वीयाम् सर्व मानवा:||’
    त्याचा अर्थ होतो, या जगातील ब्राह्मण अग्र जन्मी म्हणजे
    सर्वश्रेष्ठ आहेत आणि जगातील सर्वांनी त्याच्यापासून आचार शिकायला पाहिजे म्हणजे तुमची वागणूक ब्राम्हण सांगतील तशी असायला पाहिजे. माजी संघ मुखंड गोळवलकर आपल्या ‘We or our Nationhood Defined’ या पुस्तकात हा श्लोक देऊन म्हणतात,.. the first and greatest law giver of the world -Manu to lay down his code directing all the people of the world to come to Hindustan to learn their duties at the holy feet of the eldest born Brahmans of this land हा मनुस्मृति मधला दुसऱ्या अध्यायातील एकोणिसावा श्लोक आहे. त्या ठिकाणी प्रधान मंत्री मोदी हजर होते. म्हणजे मोदींना मनुस्मृति मान्य आहे हे उघड आहे. खुद्द मोदींना मनुस्मृति कितपत माहित आहे हाही प्रश्न आहे. परंतु मोहन भागवत यांना मात्र मनुस्मृtig लागू करायची आहे आणि त्यासाठी मोदींना पुढे करण्यात आले आहे. कारण मोदींनी या ठिकाणी एक शब्दही उच्चारला नव्हता. अर्थात ब्राह्मण श्रेष्ठत्व नाकारलेले नाही. आणि राम मंदिर जर मनुस्मृती अमलात आणण्यासाठी असेल तर या देशातील सर्व मोठी मंदिरे हे मनुवादी आहेत, अस्पृश्यांना, दलितांना, स्त्रियांना प्रवेश नाकारणारे आहेत हे लक्षात घेतले पाहिजे, आणि हे लक्षात घेतल्यावरही जर आम्ही स्वतःला हिंदू म्हणत असू तर आम्ही ब्राह्मणाचे गुलाम आहोत हे स्पष्ट होते. कारण जे ते सांगतात तेच आम्ही ऐकतो, तसे वागतो. अर्थात त्यांचे गुलाम आहोत हे स्वतःच सिद्ध करतो. त्यावरून आम्हाला स्वतःला अक्कल नाही हेही सिद्ध होते. बहुसंख्य लोक मुला मुलीचे नाव ठेवणे, लग्नाची तारीख ठरवणे या बाबतीतही ब्राह्मणांवर अवलंबून असतात. आणि यात शिकलेल्या लोकांचाही अपवाद नाही.

    सभार -नागेश चौधरी फेसबुक

  • मेंढपाळ शेतकऱ्यांच्या हक्कासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर वाडा आंदोलन  शेळ्या, मेंढ्या, घोड्यांसह मेंढपाळ, शेतकऱ्याचे आंदोलन

    मेंढपाळ शेतकऱ्यांच्या हक्कासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर वाडा आंदोलन शेळ्या, मेंढ्या, घोड्यांसह मेंढपाळ, शेतकऱ्याचे आंदोलन

    मेंढपाळ शेतकऱ्यांच्या हक्कासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर वाडा आंदोलन

    शेळ्या, मेंढ्या, घोड्यांसह मेंढपाळ, शेतकऱ्याचे आंदोलन

    @नयन उर्फ नरेंद्र मोंढे, यांच्या फेसबुक वरून बातमी 

    अमरावती –  ढपाळ, शेतकऱ्याच्या विविध मागण्या, हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूं, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वात संत गाडगेबाबा मंदिर समोरील प्रांगण ते विभागीय आयुक्त ‘वाडा आंदोलन’ मोर्चा मंगळवार(ता. सात) रोजी काढण्यात आला. मोर्चात हजारो मेंढपाळ, शेतकरी, आपल्या शेळ्या, मेंढ्या, घोडे घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. या वेळी येळकोट येळकोट जय मल्हार अपना भिडू बच्चू कडू च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता संत गाडगेबाबा समाधी स्थळाला अभिवादन करून वाडा आंदोलनाला सुरुवात झाली.

    माजी मंत्री बच्चू कडू व महादेव जानकर गाडगे नगर येथील प्रांगणात दुपारी १.३० वाजता हातात काठी, खांद्यावर घोंगडी, डोक्यावर धनगरी फेटा असा धनगरी पारंपारिक वेशभूषा धारण करून घोड्यावर सवार झाले होते. तर महादेव जानकर यांनीही धनगरी फेटा व हातात काठी घेऊन घोड्यावर स्वार होऊन वाडा आंदोलनाचे नेतृत्व केले.
    मोर्चा संत गाडगेबाबा समाधी स्थळ परिसरातील प्रांगणातून १.४५ वाजता निघाला पंचवटी चौक विरांगणा राणी दुर्गावती चौक (गर्ल्स हायस्कुल) चौक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून राजमाता जिजाऊ स्मारक चौक (आरटीओ चौक) थेट विभागीय आयुक्त कर्यालयावर दुपारी २.४५ वाजता धडकला.


    गत आठ दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी राज्य शासनाला शेतकरी आणि मेंढपाळ यांच्या न्याय मागण्यांसंदर्भात अल्टीमेटम दिला होता. मात्र, शासनाने मागण्यांकडे पाठ फिरवल्याने अखेर शेतकरी आणि मेंढपाळ यांना सोबत घेऊन बच्चू कडू विभागीय आयुक्त कार्यालयासमोर “वाडा आंदोलन” करणार केले. राज्यातील मेंढपाळ आपल्या न्याय मागणीकरिता सरकारचे उंबरठे झिजवित असताना त्यांच्या मागण्यांच्या संबधात मुख्यमंत्री कुठलेही ठोस पाऊल उचलत नाहीत.. शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहीजे, वण्यप्राण्यांपासून त्याच्या पिकाचे संरक्षण झाले पाहीजे, त्याला पीक नुकसानीचे पिक विम्याव्दारे भरपाई मिळणे गरजेचे आहे, राज्य सरकारने विधानसभा निवडणूकीच्या काळात घोषीत केलेली सरसकट कर्जमाफी शेतक:यांना तातडीने मिळावी, चराईकरिता परराज्यातून येणा:या मेंढपाळांवर बंदी घालण्यात या मागण्या घेऊन वाडा आंदोलन करण्यात आले.


    आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू ,महानगरप्रमुख बंटी रामटेके, प्रदेश प्रवक्ते जीतू दुधाने, मंगेश देशमुख, शेख अकबर, संजय देशमुख, शाम इंगळे, राजेश वाटाणे, संतोष किटकले, बल्लू जवंजाळ, दीपक बंड, अभिजीत देशमुख, संजय इंगळे, यांच्यासह मेंढपाळ शेतकरी हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.

    आयुक्त कार्यालयाला आले छावणीचे स्वरूप

    वाडा आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी २ पोलीस उपायुक्त, ४ एसीपी, २२ पोलीस निरीक्षक, ५५ पीएसआय, एपीआय ३५० अमलदार यांच्यासह रॅपिडक्शन फोर्स, वज्र, अग्निशमन दल बंदोबस्तात होते यावेळी पोलीस दल बॉडी प्रोटेक्टर परिधान करून हातात लाठी डोक्यात हेल्मेट घालून विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने विभागीय आयुक्त कार्यालयाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

    पारंपरिक वेशभूषा, वाद्य,नृत्य

    आंदोलक मेंढपाळ बांधव पारंपारिक वेशभूषा धारण करून आपल्या पारंपारिक वाद्यावर नृत्य करीत होते.यावेळी डोक्यावर मळवट लावून हातात पिवळे झेंडे घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. येळकोट येळकोट जय मल्हार अपना भिडू बच्चू कडू , बच्चु भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देत होते.

    मेंढपाळ व शेतकऱ्यांसाठी सातत्याने रस्त्यावरचा लढा देणार- महादेव जानकर

    अमरावती जिल्हा मुख्यमंत्र्यांचा आजोळ असून त्यांनी मेंढपाळांचे प्रश्न सोडवावे मेंढपाळांनी आणखी किती दिवस केवळ मेंढरच राखायची? मेंढपाळांच्या मुलांसाठी अद्यापही वसतिगृह सुरू झाले नाही. कॅबिनेट मंत्री असताना योजना आणल्या योजना ची घोषणा झाली मात्र योजनेला पैसा दिला नसल्याने अंमलबजावणी झालेली नाही. भाजप महा गद्दार आहे. प्रहार व राष्ट्रीय समाज पक्ष शेतकरी व मेंढपाळ यांच्यासाठी एकत्र आले आहेत त्यांना न्याय देण्यासाठी सातत्याने रस्त्यावरचा लढा देणार ही सुरुवात असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

    पुढच्या वेळी सर्वांनीच काठ्या घेऊन या-आ बब्चू कडू

    आपल्या मागण्या संदर्भात एक महिन्याचा वेळ प्रशासनाला दिला आहे.आज शांततेत एकटाच काठी घेऊन आलो आहे. एक महिन्यानंतर सर्वांनीच आता काट्या घेऊन आठ दिवस मुक्कामासाठी यायचं आहे. ऐकलं तर ठीक नाहीतर पुढच्या वेळी हटा सावन की घटा. पुढच्या वेळीस इथं आल्यावर पुन्हा जाणार असा इशाराही बच्चू कडू यांनी ‘वाडा आंदोलन सभेत बोलताना दिला आहे.
    हिंदू शेतकरी, हिंदू मेंढपाळ. मी हे का बोलतोय कारण धर्माच्या नावाने काहीजण राजकारण करताय. एकीकडे शेतकरी मरतोय, दुसरीकडे मेंढपाळ मरतोय. राज्यात बगर मेहनतीच्या योजना सुरू केल्या. मात्र ज्यांना डोळे नाही, पाय नाही त्यांना चार महिन्यापासून पगार नाही. त्यामुळे अजितदादा कुठं गेला तुमचा वादा. अशा म्हणण्याची वेळ आली आहे. कायदा मोडून हात लावला तर उद्या हातात कायदा घेतल्या शिवाय राहणार नाही. असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी वाडा आंदोलन सभेत बोलताना दिला आहे.

    आंदोलन सभेत बोलताना त्यांनी चौफेर फटकेबाजी करत सरकारवर निशाणा धरला.
    चारा आहे पण हात लावू देणार नाही हा कसला कायदा आहे. बटेंगे को कंटेंगे म्हणताय, तर मग मेंढपाळ पण कटणार ना? आता जर कर्ज भरलं नाही तर पुढच्या वर्षी कर्ज भेटणार नाही, कृषिमंत्री म्हणाले की आर्थिक परिस्थिती चंगली नाही. त्यामुळे चार पाच महिने कर्जमाफी होणार नाही. मग बोंबलता कशाला. जेवायला बोलवायचं आणि पळून जायचं. मात्र हम रुकने वाले औलाद नही चलने वाले औलाद है, मेंढपाळ शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मेलो तरी चालेल. असा निर्धारही बच्चू कडूंनी यावेळी बोलताना केला आहे.

     

    विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन देण्याकरिता बच्चू कडू महादेवराव जानकर यांच्यासह मेंढपाळ शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ जात असताना बंदोबस्त करिता असलेल्या पोलीस बच्चू कडू यांना बॅरिकेटच्या आत मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात सोडले मात्र काही वेळ महादेव जानकर यांना पोलिसांनी अडवून ठेवले होते. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आत पोलीस प्रशासनाकडून प्रसिद्धी माध्यमांनाही प्रवेश बंदी केली होती.

  • टिळक पत्रकार भवनात सोमवारी जांभेकरांना अभिवादन

    टिळक पत्रकार भवनात सोमवारी जांभेकरांना अभिवादन

    टिळक पत्रकार भवनात सोमवारी जांभेकरांना अभिवादन

    नागपूर, 6 जानेवारी– मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 213 व्या, जयंतीनिमित्त 6 जानेवारीला, टिळक पत्रकार भवनातील त्यांच्या अर्धपुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला.

    याप्रसंगी सर्व पत्रकारांची उपस्थित होती. टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे उपाध्यक्ष व व्यवस्थापक प्रभाकर दुपारे यांनी जांभेकरांना अभिवादन करून माल्यार्पण केले. याप्रसंगी हरीश तिवारी, योगेश पांडे, दिलीप कांबळे, भीमरावजी लोणारे तसेच ज्येष्ठ पत्रकार राजीव जोशी यांची उपस्थिती होती.

     

  • संघरत्न मानके भारत जापान चा मैत्री चा दुवा म्हणून जगात प्रसिद्ध  धम्मदुत भदंन्त संघरत्न मानके -भदंन्त नाग दिपंकर महास्थविर

    संघरत्न मानके भारत जापान चा मैत्री चा दुवा म्हणून जगात प्रसिद्ध  धम्मदुत भदंन्त संघरत्न मानके -भदंन्त नाग दिपंकर महास्थविर

    संघरत्न मानके भारत जापान चा मैत्री चा दुवा म्हणून जगात प्रसिद्ध  धम्मदुत भदंन्त संघरत्न मानके –भदंन्त नाग दिपंकर महास्थविर

    नागपूर – हरदास नगर लष्करीबाग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र आंदोलनात सक्रिय सहभागी असलेले माजी नगरसेवक उत्तुंग शिखराचे धनी बहुआयामी सतधम्मीक व्यक्तिमत्त्व सचिदानंद मानके गुरुजी व मातोश्री सीताबाई मानके यांच्या परिवारात दिनांक ३ जानेवारी १९६२ साली जन्माला आलेले संघरत्न यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण करून १९६९ला बालवयात श्रमण जीवनात पाऊल टाकले जापानचे सोमेन होरीसावा यांच्या मार्गदर्शनात जापान ला जाऊन बौद्ध धम्म विषयक शिक्षण घेतले जापान येथेच राहून धम्म प्रचार करत असतांना भारतात येऊन धम्म प्रचार प्रसार करत महासमाधीभुमी पवनी व प्रज्ञागिरी डोंगरगड येथे आपले कार्य सुरू केले अनाथ नीराश्रीत दुर्बल विद्यार्थी यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी जीवनावश्यक व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले असंख्य विद्यार्थी घडवत त्यांना उच्चशिक्षित केले गावकुसातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रयत्न केले उत्तम दर्जेदार शिक्षण संस्था स्थापन करून शैक्षणिक प्रगती केली.

    वाचनालय लायब्ररी मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते देशातील कोणत्याही भागात नैसर्गिक आपत्ती आली किंवा भुकंप दुष्काळ महामारी उत्पन्न झाली असता मदतीचा हात पुढे करून त्यांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे ही जाणीव बाळगून सतत प्रयत्न करत असतात.

    भारत जापान चा मैत्री चा दुवा म्हणून जगात प्रसिद्ध असलेल्या या धम्मदुत भदंन्त संघरत्न मानके याच्या मार्गदर्शनातुन प्रेरक दिशादर्शक संदेश समोर येतो बौद्ध आंबेडकर विचारधारेचे अभ्यासक चिंतक चिकित्सक व्याख्याते म्हणून नावलौकिक आहे वयाच्या त्रेसष्ठ वर्षाच्या प्रवासात पचपंन वर्ष धार्मिक जीवन जगत असताना आम्हाला खूप अभिमान वाटतो त्यांनी या पुढे सुद्धा धम्म प्रचार प्रसार क्षेत्रातील कार्य उत्तम प्रकारे चालू ठेवावे आणि जागतिक स्तरावर आपले योगदान द्यावे त्यांच्या आयु आरोग्य सुख समृद्धी साठी सदैव सदिच्छा व मैत्री भावना व्यक्त करतो
    भदंन्त नाग दिपंकर महास्थविर

  • नामांतरवीर उपेंद्र शेंडे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा ५ जानेवारी ला.!  -नामदार नितीनजी गडकरी/ रामदासजी आठवले उपस्थित राहणार

    नामांतरवीर उपेंद्र शेंडे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा ५ जानेवारी ला.! -नामदार नितीनजी गडकरी/ रामदासजी आठवले उपस्थित राहणार

    नामांतरवीर उपेंद्र शेंडे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा ५ जानेवारी ला.!

    -नामदार नितीनजी गडकरी/ रामदासजी आठवले उपस्थित राहणार
    नागपूर – विद्यार्थी जीवनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या विचाराशी प्रामाणिक राहून रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीसाठी रक्ताच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि थेबापर्यंत निष्ठेने प्रामाणिक राहून समाज उत्नासाठी काम केले.

    त्यांच्या कार्याची पावती म्हणून 1985 साली महानगरपालिका नागपूर व 1990 मध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदार म्हणून जनतेने निवडून दिले.
    त्यांनी आपल्या कार्यकाळात निस्वार्थ सेवेच्या ठसा उमटविला अशा निस्वार्थी त्यागी चळवळीच्या झंजावात व्यक्तिमत्व आपल्यातून नुकतेच निघून गेले अशा सच्चा भीमसैनिकाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन दिनांक 5 जानेवारी 2024ला ४.०० वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्वेशन सेंटर ऑटोडियरम, कामठी रोड,दुसरा माळा येथे आयोजित केले आहे.

    या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ताराचंद्र खांडेकर ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत भारताचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी भारताचे केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले, लाँग मार्च प्रणेते जोगेंद्र कवाडे, एडवोकेट सुलेखाताई कवाडे माजी राज्यमंत्री तथा अध्यक्ष ओवा सोसायटी राजेंद्र गवई सचिव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर, विकास ठाकरे शहराध्यक्ष काॅग्रेस तथा आमदार उत्तमराव गवई राष्ट्रीय सरचिटणीस खोरीपा, प्राध्यापक डॉक्टर राष्ट्रीय प्रवक्ते यांनी एन व्ही ढोक ,एका सच्चा भीमसैनिकाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान राजन वाघमारे बाळू घरडे,अविनाश धामगाये,राजू गजभिये ,बंडोपंत टेंभुर्णी, प्रकाश कुंभे, यशवंत तेलंग नरेश वाहने डॉ. मच्छिंद्र चोरमारे, डॉ प्रदीप बोरकर यांनी आव्हान केले आहे .

  • भाजपा नागपूर में क्या एक सीट दलित को देंगे? दो विधानपरिषद है रिक्त… नागपूर जिले में भाजपा से एक भी दलित विधायक नहीं.. संदीप गवई को विधानपरिषद भेजने की उठ रही मांग!

    भाजपा नागपूर में क्या एक सीट दलित को देंगे? दो विधानपरिषद है रिक्त… नागपूर जिले में भाजपा से एक भी दलित विधायक नहीं.. संदीप गवई को विधानपरिषद भेजने की उठ रही मांग!

    भाजपा नागपूर में क्या एक सीट दलित को देंगे? दो विधानपरिषद है रिक्त… नागपूर जिले में भाजपा से एक भी दलित विधायक नहीं.. संदीप गवई को विधानपरिषद भेजने की उठ रही मांग!
    नागपूर (विजय खवसे )नागपूर जिले में हालही विधानसभा चुनाव में फिर भाजपा ने बाजी मारी वही भाजपा से चंद्रशेखर बावनकुले, प्रवीण दडके की दो विधानपरिषद सीट खाली होनेसे दो सिटो के लिए भाजपा की और से लाईन लगी. भाजपा का दलित चेहरा संदीप गवई, ब्राह्मण चेहरा संदीप जोशी, दयाशंकर तिवारी, शिंदी चेहरा विक्की कुकरेजा, मराठा बंटी कुकडे, संजय भेंडे परिषद पर जानेके इच्छुक दिखाई दे रहें है.लेकिन आलाकमान किसकी लॉटरी खोलते यह तो आनेवाला समय बतायागा.

    नागपूर जिले की बात करें तो काँग्रेस से दो विधायक नितीन राऊत व संजय मेश्राम बुद्धिस्ट चेहरे है. लेकिन भाजपा की बात करें तो उत्तर नागपूर से मिलिंद माने की हार होणे से अब जिले में एक भी दलित चेहरा भाजपा के पास नहीं है. ऐसे में भाजपा यदी संदीप गवई को विधानपरिषद को मौका देते तो भाजपा के पास भी एक बौद्ध बडा चेहरा मिल शकता है.

    संदीप जोशी महापौर व स्थाई समिती सभापती रहें, दयाशंकर तिवारी भी महापौर रहें. विक्की कुकरेजा भी सभापती रहें लेकिन संदीप गवई को अबतक कोई पद नही मिला वे लगातार भाजपा को बढाने दलितो में जाकर प्रयास करते है. ऐसे में नागपूर जिले में भाजपा को दलित वोटो को हासील करने के लिए व हम भी सभी को लेकर राजनीती करने का संदेश देने के लिए संदीप गवई को विधानपरिषद में भेजना होंगा.
    नागपूर जिले में भी दलित चेहरा देने की मांग उठ रही हैं.

  • अखेर…साईटोला शाळेच्या जीर्ण इमारतीला पालकांनी ठोकला कुलूप  ◼️ स्लॅब कोसळून तीन विद्यार्थी जखमी झाल्याचे प्रकरण

    अखेर…साईटोला शाळेच्या जीर्ण इमारतीला पालकांनी ठोकला कुलूप ◼️ स्लॅब कोसळून तीन विद्यार्थी जखमी झाल्याचे प्रकरण

    अखेर…साईटोला शाळेच्या जीर्ण इमारतीला पालकांनी ठोकला कुलूप

    ◼️ स्लॅब कोसळून तीन विद्यार्थी जखमी झाल्याचे प्रकरण

    गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील हिरापूर ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या साईटोला येथील जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण स्लॅबचे प्लास्टर कोसळून तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना गुरुवार 2 जानेवारी रोजी घडली. या घटनेमुळे पालकांमध्ये संताप व्यक्त करत शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. मात्र, याकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने आज, शुक्रवार (ता.3) जखमी विद्यार्थ्यांचे पालक व गावकऱ्यांनी त्या शाळेच्या जीर्ण इमारतील कुलूप ठोकले आहे. तर जोपर्यंत इमारत दुरुस्त होणार नाही व नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठविला जाणार नाही तोपर्यंत आपल्या पाल्यांना शाळेच्या पटांगणात मंडप टाकून शिक्षण देऊ अशी भूमिका पालकांनी घेतली आहे.

    साईटोला येथे १ ते ४ पर्यंतची जिल्हा परिषद शाळा असून मुले व मुली असे 16 विद्यार्थी अध्ययनरत आहेत. दरम्यान, सर्व विद्यार्थी शाळेच्या एका इमारती बसतात. मात्र हि इमारतही जीर्ण झाली आहे. अशातच काल, गुरुवारी विद्यार्थी वर्गात असताना अचानक स्लॅबचा प्लास्टर काही विद्यार्थ्यांच्या अंगावर पडले. ज्यामध्ये तिसऱ्या वर्गातील विद्यार्थी लखन रहांगडाले या विद्यार्थ्याच्या डोक्याला व हाताला दुखापत होऊन जखमी झाला तर चेतन कावळे व महेन सोनवाने हे दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले होते.

    त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त करून आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणार नाही असा निर्णय घेतला होता. दरम्यान, आज, चार वर्ग असून केवळ एकच इमारत कामी आहे व तीही इमारत जीर्ण असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेच्या पटांगणातच बसवून शिक्षण देण्याच्या निर्णय घेतला आहे. तर जोपर्यंत इमारत पूर्णतः दुरुस्त होणार नाही तोपर्यंत पाल्यांना त्या इमारतीत बसवू देणार नाही अशी भूमिका घेत पालक व गावकऱ्यांनी शाळेला कुलूप लावत संताप व्यक्त केला आहे.

  • गोंदिया गारठला.. विदर्भात गोंदियात सर्वाधिक थंड  ◼️ ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

    गोंदिया गारठला.. विदर्भात गोंदियात सर्वाधिक थंड ◼️ ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

    गोंदिया गारठला.. विदर्भात गोंदियात सर्वाधिक थंड

    ◼️ ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, गोंदिया जिह्वात काश्मीर!

    गोंदिया: राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहेत. आधी कडाक्याची थंडी, त्यानंतर पाऊस आणि आता पुन्हा एकदा थंडी परतली आहे. आज शुक्रवार ३ जानेवारीला विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे करण्यात आली असून ८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.

    विदर्भात सर्वाधिक थंड गोंदिया असला तरी त्यापाठोपाठ नागपूरचा क्रमांक येतो. विशेष म्हणजे, २ जानेवारीला नागपूरचे तापमान ८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. त्यातच गोंदियाचे तापमान ९.८अंश सेल्सिअस नोंदवले होते. मात्र, दुसरीकडे आजच्या तापमानावर लक्ष दिल्यास गोंदियाचे कमाल तापमान 28.8 तर किमान तापमान 8.8 अंश सेल्सिअसने नोंदवण्यात आले आहे. तर नागपूरचे कमाल तापमान 30.4 व किमान तापमान 9.0 एवढे आहे. तर विदर्भातील इतर जिल्हे पाहता 11 अंशाच्या वर तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

    गेल्या वर्षात राज्यातील वातावरणात सातत्याने बदल घडून आले. आता नवीन वर्षातही वातावरणात बदल दिसून येत आहे. डिसेंबर २०२४ अखेरीस राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यातच, आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा थंडीने जोर पकडला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पारा घसरलाय. त्यामुळे त्याठिकाणी गुलाबी थंडी जाणवत आहे. तर विदर्भात मात्र अवघ्या २४ तासात वातावरणात बदल झाला आहे. अवघ्या २४ तासात किमान तापमान साडेपाच अंशाने कमी झाले आहे. परिणामी विदर्भात विशेषतः गोंदिया जिल्ह्यात बोचर्‍या थंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

    ◼️वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम

    यंदा हिवाळ्याला सुरुवात होऊनही अपेक्षित अशी थंडी जाणवली नाही, त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या मध्यात पारा घसरून 8 अंशावर आला होता, त्यानंतर ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस व आता पुन्हा थंडी असे बदल वातावरण झाले आहे. मात्र, या वातावरण बदलाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून खोकला, शर्दी, ताप आदी आजार बळावले आहे. त्यामुळे रुग्णालयात गर्दी वाढली असून रुग्णांच्या रांगा दिसून येत आहे.

    ◼️शेकोट्या पेटल्या ….

    गारठा वाढल्याने नागरिकांना बोचर्‍या थंडीच्या सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिक असल्याने गावोगावी 10 वाजतापर्यंत शेकोट्या पेटल्याच्या दिसून आले. तर शहरी भागातही नागरिक थंडीपासून बचाव करताना दिसले.