5 ऑक्टोम्बरला दीक्षाभूमिवर धम्मदीक्षा सोहळा…30 लाख अनुयायी येथील दीक्षाभूमि वर
नितिन गडकरी,देवेंद्र फडणवीस,रामदास आठवले यांची राहणार उपस्थिति..!
दीक्षाभूमि नागपूर – कोरोना काळात दीक्षाभूमिवर दीक्षा सोहळा होवू शकला नाही.मात्र या वर्षी मोठ्या प्रमाणात 66 वे धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात येत असून देश विदेशातिल तब्बल 30 लाख अनुयायी दीक्षाभूमिवर येण्याची शक्यता दीक्षाभूमि स्मारक समिति ने वर्तवली आहे.शनिवारी दीक्षाभूमि आंबेडकर कॉलेज येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये सचिव एस एस फुलझेले यांनी दिली.
धम्मचक प्रवर्तन वर्धापन दिनाचे कार्यक्रम दिनांक 2 ते 5 ऑक्टोबर 2022 पर्यंत आयोजीत करण्यात आल्याची माहिती दिली . दरवर्षी अनुयायांची गर्दी दीक्षाभूमीवर वाढत आहे . या वर्षी देखील 66 व्या धम्मचक प्रवर्तन दिन समारोहासंबंधी व्यवस्था करण्यासाठी नागपूर महानगरपालिका , नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण , महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ , महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ , महाराष्ट्र शासनाचे आरोग्य सेवा विभाग आणि पोलिस विभाग यांच्या तर्फे अनुयायांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून यापूर्वी नागपूर जिल्हयाचे मा . जिल्हाधिकारी आणि मा . विभागीय आयुक्त यांनी या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली व त्यांनी सर्व संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या आहेत .
त्यामुळेच आम्ही एवढा मोठा कार्यक्रम शांततेत आणि कुठलीही अनुचित घटना न घडता पार पाडतो . दिनांक 14 ऑक्टोंबर 1956 रोजी विजयादशमीला परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर सकाळी 900 वाजता पूज्य महास्थवीर चंद्रमणी यांचेकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली . त्या प्रसंगाची स्मृति म्हणून या वर्षी देखील येत्या 5 ऑक्टोबरला सकाळी 9-00 वाजता दीक्षाभूमीवर पूज्य भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई अध्यक्ष , प.पू. डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती , यांचे प्रमुख उपस्थितीत बुध्दवंदना घेण्यात येईल . याचवेळी संपूर्ण नागपूर शहरातील बुध्द विहारात बुध्द वंदना घेण्यात यावी अशी बौध्द जनतेला स्मारक समितीतर्फे जाहीर विनंती करण्यात आली आहे .
महिला धम्म मेळावा..
रविवार , दिनांक 2-10-2022 सायं . 5.30 वा 66 व्या धम्मचक प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम महिला धम्म मेळावा आयोजीत करण्यात आला.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि बाबासाहेबांना अपेक्षित भारत या विषयावर परिसंवाद साधनार आहे. कार्यक्रमाच्या वक्ता विशेष अतिथी म्हणून डॉ . श्रीमती कमलताई रामकृष्णजी गवई , माजी लेडी गव्हर्नर , बिहार आणि केरळ आणि सदस्या स्मारक समिती . आदरणीय भिक्खूणी विजया मैत्रेय , आयु सुषमा पाझारे प्राचार्या डॉ . भूवनेश्वरी मेहेरे , प्रा . सरोज आगलावे , प्रा . डॉ . प्रज्ञा बागडे , आयु छाया खोब्रागडे हे असतील.
3 ऑक्टोम्बर चे कार्यक्रम..
सोमवार दिनांक 3-10-2022 सकाळी 9.00 वा . पासून मंगळवार , दिनांक 4-10-2022 सकाळी 9.00 वा . सकाळी 10.30 वा . सायंकाळी 6.00 वा . रात्रौ 9.00 वा . हस्ते अध्यक्ष उद्घाटक बुधवार , दिनांक 5-10-2022 सकाळी 6 ते 8.30 वा . सकाळी 9.00 वा . दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई यांचेतर्फे बौध्द धम्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम याप्रसंगी भंते धम्म सारथी , भंते नागवंश , भंते नागसेन , भंते प्रज्ञाबोधी , भंते धम्मविज्ज , भंते महानाग , भंते धम्मप्रकाश व भिक्खु संघ उपस्थित राहतील .
4 ऑक्टोम्बर चे कार्यक्रम…
पवित्र दीक्षाभूमीवर पंचशील झेंडयाचे ध्वजारोहण भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई , अध्यक्ष , स्मारक समिती व स्मारक समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत . समता सैनिक दला तर्फे मानवंदना देण्यात येईल . थायलंड येथील भिक्खू संघातर्फे पवित्र दीक्षाभूमीवर 56 फुटांची बौध्द प्रतिमा देण्यात येणार आहे . त्या जागेचे भूमिपूजन दिवसभर दीक्षा देण्याचा कार्यक्रम सुरू राहील . धम्मपरिषद पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई , अध्यक्ष , स्मारक समिती , डॉ . सुधिर फुलझेले , सचिव परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती , याप्रसंगी भदन्त अनेक उदोमधम्मकीत्ती , डॉ . पॅन सूनसवाड , थायलंड यांची विशेष उपस्थिती राहील .. धम्मपरिषदेत जपान , थायलंड , मलेशिया आणि देश – विदेशातील तसेच भारतातील बौध्द भिख्खू प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करतील . सांस्कृतिक कार्यक्रम – आयु सीमा पाटील यांचे पोवाडा गायन आणि बाबासाहेबांच्या जीवनावर आधारीत लघु नाटीका स्मारक समितीतर्फे धम्मपहाट बुध्द – भीम गीतांचा कार्यक्रम पवित्र दीक्षाभूमीवर पूज्य भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई हे सामुहिक बुध्दवंदना घेतील . दिवसभर दीक्षा देण्याचा कार्यक्रम होईल.
सायंकाळी 6.00 वा धम्म परिषद… कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहूणे 66 व्या धम्मचक प्रवर्तन वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम पूज्य भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई , अध्यक्ष , परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती ,ना. श्री नितीन गडकरी , केंद्रिय मंत्री , सड़क परिवहन व राजमार्ग भारत सरकार , ना. श्री रामदासजी आठवले , सामाजिक न्याय आणि अधिकारीता राज्य मंत्री भारत सरकार ना. देवेद्र फडणवीस , उप – मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचा मंगल सोहळा संपन्न होईल.
पवित्र दीक्षाभूमीवर येणा – या अनुयायांकरिता विशेष सूचना : 1 . आकस्मिक पाउस आल्यास अनुयायांची गैरसोय होउ नये म्हणून याकरिता दीक्षाभूमीच्या जवळपास असलेल्या शाळा येथे आश्रयाची सोय करण्यात आली आहे . या कार्यक्रमाच्या दिवशी अनुयायांना थांबण्याकरिता शाळा उपलब्ध करून देण्याबाबत सर्व संबंधित शाळांना शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक / माध्यमिक व महानगर पालिका यांना मा . जिल्हाधिकारी , नागपूर यांनी सूचना दिल्या आहेत . 2 . तसेच , दरवर्षीप्रमाणे नागपूरातील सर्व बुध्द विहारां मध्ये अनुयायांची व्यवस्था सर्व बुध्दाविहार कमिटीनी करावी हि विनंती .
दिनांक 5-10-2022 च्या मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रसारण सायं . 5.00 वाजेपासून सहयाद्री दूरदर्शन , आवाज इंडिया आणि यु.सी. एन . या नागपूरातील वाहीणीवरून सुध्दा होणार आहे . तेव्हा जनतेने याची नोंद घ्यावी वरील पत्रकार परिषदेस स्मारक समितीचे सदस्य अॅड . आनंद फुलझेले , श्री . एन.आर. सुटे , श्री . विलास गजघाटे , डॉ . प्रदीप आगलावे , डॉ . चंद्रशेखर मेश्राम , भन्ते नागदिपांकर व डॉ . आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती . बी . ए . मेहरे उपस्थित होते .डॉ . सुधिर फुलझेले सचिव ,उपस्थित होते.