ग्रामगीतेचे संपादक, लेखक, साहित्यकार सुदाम सावरकर यांची पुण्यतिथी साजरी!
-पुतळा स्वच्छ करीत हार अर्पण करून वाहिले अभिवादन
गुरुकुंज मोझरी WH NEWS : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सांगाती, ग्रामगीता ग्रंथाचे संपादक, थोर लेखक व साहित्यकार सुदाम सावरकर (दामोदर सावरकर) यांची पुण्यतिथी सोमवारी गुरुकुंज मोझरीतील त्यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी पार पडली. या प्रसंगी सावरकर यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास स्वच्छ करून पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या स्मृतीस नम्र अभिवादन वाहिले.

सावरकर यांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात येऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा व साहित्याचा प्रचार-प्रसार करण्यात सुदाम सावरकर यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. ग्रामगीता, महाराजांची ग्रंथसंपदा तसेच गुरुदेव मासिकाचे सुयोग्य व नेटके संपादन त्यांनी अत्यंत निष्पाप वृत्तीने केले. स्वतः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सावरकर यांच्या अथांग अभ्यासाचा आणि समर्पणाचा गौरव करत त्यांना ग्रामगीतेचे खरे जाणकार असे संबोधले होते. तुकडोजी महाराज व सुदाम सावरकर यांची जोडी साहित्याच्या विश्वात कृष्ण-सुदामाची अजब जोडी म्हणून आजही ओळखली जाते.
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे जन्मगाव शिरजगाव मोझरी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, मनोज दिगांबरे, मनोहर साबळे, रमेश बोके, भारत ठाकरे, मारोतराव सातपुते, मनोज मुंगले, रामराव वाघाडे, हरिदास जवंजाळ, विजय क्षीरसागर, जानराव मुंगले यांच्यासह
नागरिक, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी सुदाम सावरकर यांच्या विचारांचे आणि साहित्याचे जतन करण्याचा संकल्प केला.
