७ तास महासमाधीस्थळावर गुरुदेव सेवकांचे आत्मक्लेश आंदोलन! -साहित्यीक, कवी, विचारवंत, प्रबोधनकार आणि कीर्तनकारांची उपस्थिती! -दिवाळीनंतर गुरुदेव मंडळाची युवकांसोबत संयुक्त बैठकीच्या आश्वासनामुळे आत्मक्लेश आंदोलन तूर्तास स्थगित!

Follow Us on :

 

७ तास महासमाधीस्थळावर गुरुदेव सेवकांचे आत्मक्लेश आंदोलन!

-साहित्यीक, कवी, विचारवंत, प्रबोधनकार आणि कीर्तनकारांची उपस्थिती!

-दिवाळीनंतर गुरुदेव मंडळाची युवकांसोबत संयुक्त बैठकीच्या आश्वासनामुळे आत्मक्लेश आंदोलन तूर्तास स्थगित!

 तिवसा WH NEWS प्रतिनिधी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी येथील ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवात सादर करण्यात आलेल्या निवेदनातील तरुणांच्या आंदोलनांना अराजकता संबोधण्यात आले होते. त्याशिवाय, अनेक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या प्रकरणावरून गुरुदेव सेवकांनी नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळी शेकडो गुरुदेव सेवकांनी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. ज्यामध्ये लेखक चंद्रकांत वानखडे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन दिवाळीनंतर संयुक्त बैठक घेऊन गुरुदेव सेवकांच्या मागण्यांवर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकारिणी सदस्य एड दिलीप कोहळे, राजाराम बोथे, गोपाल कडू, टी के कठाळे यांनी आश्वासन गुरुदेव सेवा मंडळाने दिले. यावर जर आगामी बैठकीत आंदोलनाच्या निवेदनातील मागण्यांवर समाधानकारक निर्णय झाला नाही. तर पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा आत्मक्लेश आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

पुण्यतिथी महोत्सवातील श्रद्धांजलीपर निवेदनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जिवनपटावर प्रकाश टाकणे गरजेचे होते. त्यांचे भजन त्यांचे कार्याचा भावनिक उलगडा करणे गरजेचे होते. मात्र, जगातील विविध घडामोडींचा उल्लेख करताना, युवकांच्या आंदोलनांच्या संदर्भात अराजकता या शब्दाचा उल्लेख झाल्यानंतर युवकांमध्ये नाराजी पसरली होती त्याशिवाय, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, मानवतावाद यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे राष्ट्रसंतांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या तरुणांच्या आंदोलनाबाबत अराजक शब्दप्रयोग का करण्यात आला, असा सवाल यादरम्यान गुरुदेव सेवकांनी उपस्थित केला. यादरम्यान राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी शेकडो गुरुदेव भक्त एकत्र येत आत्मक्लेश आंदोलनात सहभागी झाले होते.

या आंदोलनात चंद्रकांतदादा वानखडे, अमोल मिटकरी, किशोर बळी, ज्ञानेश्वर रक्षक, प्रेमकुमार बोके, डॉ. रघुनाथ वाडेकर, प्रशांत कांबळे, रवी मानव, रुपराव वाघ, डॉ पी आर राजपूत, वैभव वानखडे, अंकुश वाघ, शफीक शहा, ज्ञानेश वाकुडकर, गणेश हलकारे, पंकज आवारे, रोशन कांडलकर, गोविंद पोलाड, हेमंत टाले, डॉ नरेंद्र तराळ, सीमा बोके, सुयोग राजनेकर, अमर वानखडे, राजेश धुरंधर, अंकुश मानकर, राजेश वानखडे, मनोज अंबाडकर, बाळा जगताप, राजाभाऊ जाणे, हरिष पाटील, प्रसाद कुंजेकर, रामेश्वर बरगट, बाबासाहेब शेळके, अक्षय यावले, प्रवीण पाचघरे, मनोहरराव वाघ, अजित पठाण, चेतन कांडलकर, सुशील निमकर, आदी गुरुदेव सेवक उपस्थित होते.

या प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर
– श्रद्धांजली पूर्वी घेतलेल्या निवेदनाची स्क्रिप्ट देण्यात यावी. शिवाय, यापुढे पुण्यतिथी महोत्सवात निवेदनाची स्क्रिप्ट निवेदनानंतर गुरुदेव अनुयायांसाठी प्रसारित करावी.
– पुण्यतिथी महोत्सवात निवेदनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जिवनपटांचाच भावनिक उल्लेख असावा.
– पेपर फुटीमुळे शेकडो युवकांच्या आत्महत्येनंतर झालेल्या युवकांचे आंदोलनाला अराजक म्हटल्या गेले. त्याबद्दल लेखी माफीनामा देण्यात यावा.

– डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेल्या धर्मनिरपेक्षतेला खोकला असल्याचा तसेच महाराजांनी मांडलेला सर्वधर्म समभाव संकल्पनेवर नकारात्मकरित्या प्रश्न उपस्थित केल्याने माफीनामा द्यावा.
– पुण्यतिथी महोत्सवाच्या मंचावर दरवर्षी सर्वधर्मांची प्रतीके लावण्यात यावीत.
– प्रत्येक धर्माची प्रार्थना संबंधित धर्मगुरूंकडूनच त्यांच्या धर्मपरंपरेनुसारच घेण्यात यावी.

महासमाधिस्थळावर जाण्यास राजाराम बोथे यांनी केली मनाई

प्रशांत कांबळे, शफीक शहा आणि इतर काही लोक समाधीस्थळावर आत्मक्लेश करण्यासाठी बसायला चटई टाकायला जात असतांना सेवा मंडळाचे पदसिद्ध सदस्य राजाराम बोथे, अंकुश गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अडवले. तुम्हाला महासमाधीस्थळी आत्मक्लेश करण्यासाठी जाता येणार नाही. इथे कोणालाही आंदोलन करता येणार नाही. असे म्हणत पोलिसांना पुढे केले आणि काही वेळासाठी गुरुदेव सेवकांना महासमाधीस्थळी जाण्यास मज्जाव केल्याने गुरुदेव सेवकांनी सुमारे दोन तास गेटवर रस्त्यावर बसूनच आत्मक्लेश आंदोलन करावे लागले हे मात्र विशेष .

आंदोलनाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सेवा मंडळाचे पदाधिकारी आणि आंदोलन कर्त्यांची बैठक झाली. यामध्ये दिवाळीनंतर संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. जर या बैठकीत निर्णय झाला नाहीतर पुन्हा आंदोलन करू.
– अंकुश वाघ, आंदोलनकर्ते

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए