शिवीगाळ, कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न? CCTV फुटेजने खळबळ!
-दलित फिर्यादी दोन दिवसांपासून FIR साठी कपिल नगर पोलीस ठाण्यात; PI सतीश आडे यांच्या भूमिकेवर गंभीर सवाल
-का दाखल केली नाही त्या फिर्यादीची FIR?
नागपूर | WH NEWS – कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दलित नागरिकासोबत कथित मारहाण, शिवीगाळ आणि जबरदस्तीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेचे CCTV फुटेजही समोर आले असून, त्यामध्ये काही व्यक्तींची बाचाबाची व शिवीगाळ होताना, तसेच एक कार घटनास्थळी येताना आणि संबंधित व्यक्तीला कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.

या व्हिडिओमुळे प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून, घटनेचे CCTV फुटेज उपलब्ध असतानाही कपिल नगर पोलीस स्टेशन चे पीआई सतिश आडे यांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब का केला आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
त्या दलित युवकाचा दोन दिवसांपासून FIR साठी संघर्ष!
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, 04 सप्टेंबर 2026 रोजी रात्री सुमारे 11.20 वाजता ही घटना घडली. तक्रारीमध्ये मारहाण, शिवीगाळ, धमकी तसेच जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
मात्र, तक्रारदाराचा आरोप आहे की, दोन दिवसांपासून कपिल नगर पोलीस ठाण्यात जाऊनही त्याची FIR दाखल करून घेतली जात नाही.त्याला स्वतः व्हिडिओ करून आपली कैफियत मांडावी लागली.

त्यातच आता कथित घटनेचे CCTV फुटेज समोर आले आहे. फुटेजमध्ये काही व्यक्तींमध्ये वाद होत असल्याचे, शिवीगाळ सुरू असल्याचे आणि त्यानंतर कार घटनास्थळी येऊन एका व्यक्तीला कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. या फुटेजची अधिकृत सत्यता आणि त्यातील व्यक्तींची ओळख पोलिस तपासातून निश्चित होणे बाकी आहे.
मग FIR दाखल करण्यास विलंब का?
या संपूर्ण प्रकरणात कपिलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
CCTV फुटेज उपलब्ध असल्याचा दावा!
लेखी तक्रार आणि गंभीर स्वरूपाचे आरोप असतानाही FIR नोंदविण्यात विलंब का? तक्रारदाराच्या आरोपांची तातडीने चौकशी का करण्यात आली नाही? आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई का झाली नाही? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
तक्रारदाराने हे प्रकरण SC/ST (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत नोंदविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची स्वतंत्रपणे दखल घेणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

‘आरोपींना पाठबळ?’ तक्रारदाराचा गंभीर आरोप!
FIR दाखल करण्यास कथित विलंब असल्याचे सांगितले जाणारे CCTV फुटेज यामुळे पोलिसांकडून आरोपींना पाठबळ दिले जात आहे का? असा गंभीर संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे.त्याने स्वतः पोलीस स्टेशन मधुन व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल करून आपली कैफियत मांडली.
हा आरोप अद्याप तपासातून सिद्ध झालेला नसला, तरी वपोनी. सतीश आडे यांनी या प्रकरणात नेमकी कोणती कार्यवाही केली, FIR का दाखल झाली नाही आणि CCTV फुटेजची तपासणी करण्यात आली आहे का, याचे उत्तर देणे आता गरजेचे झाले आहे.
CP विश्वास नांगरे पाटील यांनी लक्ष घालावे!
या प्रकरणात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तातडीने लक्ष घालून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि वपोनी सतीश आडे यांच्याकडून स्पष्टीकरण मागावे, अशी मागणी जोर धरत आहे.
CCTV फुटेज तपासावे, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवावेत, तक्रारीतील आरोपांची चौकशी करावी आणि कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता असल्यास तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
CCTV फुटेजने उपस्थित केलेले प्रश्न…
– शिवीगाळ होत असल्याचे दृश्य…!
– कार घटनास्थळी येते…!
-एका व्यक्तीला कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न होताना दिसतो…!
तरीही FIR नोंदविण्यास विलंब का?
आता या प्रश्नांची उत्तरे वपोनी सतीश आडे आणि वरिष्ठ पोलीस प्रशासनाने देणे अपेक्षित आहे. या संदर्भात माहिती पोलिसांचा पक्ष जाणून घेण्यासाठी वपोनी सतीश आडे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
