महिलेचा व्हॉट्सॲप ग्रुपवर बदनामीकारक व आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याचा आरोप; तिघांविरुद्ध लकडगंज पोलिसांत गुन्हा!सोशल मीडियाला हलक्यात घेऊ नका!

Follow Us on :

महिलेचा व्हॉट्सॲप ग्रुपवर बदनामीकारक व आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याचा आरोप; तिघांविरुद्ध लकडगंज पोलिसांत गुन्हा..! सोशल मीडियाला हलक्यात घेऊ नका!
नागपूर WH NEWS : व्हॉट्सॲप ग्रुपवर एका महिलेच्या वैयक्तिक व प्रेमसंबंधांबाबत आक्षेपार्ह तसेच बदनामीकारक मजकूर व संदेश प्रसारित केल्याच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २९ ऑगस्ट २०२६ रोजी घडल्याचे FIR मध्ये नमूद आहे. म्हणून आता सोशल मीडियाला हलक्यात घेऊ नका.


पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, तक्रारदार महिलेने संबंधित पोस्ट व संदेशांचा आक्षेप घेत पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीत सदर पोस्टमुळे तिची बदनामी होत असून मानसिक त्रास व सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित पोस्टचे स्क्रीनशॉटही पोलिसांकडे सादर करण्यात आल्याचे FIR मध्ये नमूद आहे.
या प्रकरणात पोलिसांनी पत्रकार धाकड टीवी युट्यूब चॅनल चे अरुण गौतम दिल्ली , अभय रतन बौद्ध दिल्ली आणि पेंथर चे आशिष बनसोडे नागपूर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

FIR नुसार, आरोपींकडून व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून तक्रारदार महिलेबाबत आक्षेपार्ह व बदनामीकारक संदेश प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ७४, ७९, ३५६ व ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनात  पोलीस निरीक्षक मनोज चौधरी करीत आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए