नागपूर विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात ‘भाजयुमो’ सरसावले; १८ मे रोजी ‘विद्यार्थी समस्या चर्चा’ चे आयोजन
-पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचा पुढाकार; सिनेट सदस्यासह भाजप पदाधिकारी ऐकणार समस्या
नागपूर WH NEWS :गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे आणि प्रशासकीय अनास्थेमुळे सामान्य विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक व शैक्षणिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. निकालांमधील गोंधळ, रखडलेल्या पदव्या, पुनर्मूल्यांकनातील अक्षम्य उशीर आणि प्रशासनाचा मनमानी कारभार यांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे.
अनेक महाविद्यालयांकडूनही विद्यार्थ्यांची अडवणूक आणि छळ केला जात असून, विद्यापीठ प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक पावलांवर त्रास सहन करावा लागत आहे व याकडे विद्यापीठ दुर्लक्ष करीत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमातून येत असलेल्या बातम्यांच्या आधारे तीव्रता ओळखून भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांच्या याच तीव्र असंतोषाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) सरसावला आहे. विद्यापीठाच्या या त्रासदायक कारभाराचा जाब विचारण्यासाठी आणि पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारी थेट जाणून घेण्यासाठी भाजयुमोतर्फे सोमवार, १८ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता एका विशेष ‘विद्यापीठ विद्यार्थी समस्या चर्चा’ चे आयोजन करण्यात आले आहे.या चर्चासत्रात नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य विष्णू चांगदे, नागपूर युवा मोर्चा अध्यक्ष सचिन करारे, महामंत्री रितेश पांडे, ऋषभ अरखेल, अथर्व त्रिवेदी, युवती प्रमुख प्रशंसा भोयर आणि विद्यार्थी आघाडी प्रमुख शंतनू झाडे हे प्रामुख्याने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतील.
या चर्चेत विद्यापीठाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक किंवा प्रशासकीय अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना आपली बाजू आणि समस्या थेट मांडता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजयुमोतर्फे विद्यार्थी हिताकरिता विद्यापीठासोबत चर्चा करून विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल.नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पीडित विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या आणि तक्रारींसह या चर्चेत आपल्या समस्येची निगडित असलेले कागदपत्र घेऊन वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन युवा मोर्चा अध्यक्ष सचिन करारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9764118791,8698444499,
7841829002,95797 27124 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे
