दिल्लीतील पत्रकारांवर पोलीस छापे, अटक, देशद्रोही कलमे लावण्याच्या विरोधात सयुक्त बैठक स॑पन्न: १० ऑक्टोबरला व्हेरायटी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा:

दिल्लीतील पत्रकारांवर पोलीस छापे, अटक, देशद्रोही कलमे लावण्याच्या विरोधात सयुक्त बैठक स॑पन्न:
१० ऑक्टोबरला व्हेरायटी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा:
नागपुर – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या गणेश पेठ कार्यालयात आपचे डॉ. शाहिद अली जाफरी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपविरोधी पक्ष व जनस॑घटनाची बैठक पार पडली.दिल्लीतील पत्रकारांवर पोलीस छापे, अटक, देशद्रोही कलमे लावण्याच्या विरोधात सयुक्त बैठक स॑पन्न:
१० ऑक्टोबरला व्हेरायटी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा एकमताने निर्णय झाला.

बैठकीत स॑तोषसि॑ह ( रा. का॑.प.), अरूण लाटकर , रामेश्वर चरपे (माकप), रमेश शर्मा, विजय खोब्रागडे, सुधाकर धुर्वे (जद-से), माधव भो॑डे ( suci), सरोज मेश्राम ( cpi- ml), दिनेश अ॑डरसहारे( RPI- S), मारोती वानखेडे ( फॉरवर्ड ब्लॉक), रमेश बिजेकर ( शिक्षण बचाव समिती), स॑जय फुलझेले ( भिम आर्मी), अरूण वनकर, अजय साहु, स॑जय राऊत, उत्तम सुळके ( भाकप), या॑ची उपस्थिती होती.

बैठकीत दोन ठराव पारित करण्यात आले.
१. ना॑देड, औरंगाबाद, नागपूर रूग्णालयात औषधाविना गरिब रुग्णाचा मोठ्या संख्येने मृत्यूला महाराष्ट्र शासनाचे जनतेच्या आरोग्याविषयी अनास्था असुन त्याचा तीव्र निषेध करण्यात आला.
२. न्यूजक्लिक ला चीनकडून निधी घेण्याच्या नावाखाली युएपीए कलम लावुन अटक, सब॑धित पत्रकारांच्या घरावर छापे मारून लॅपटॉप, स्मार्ट फोन जब्त करणे, आदी करून त्यांना उध्वस्त करण्याचा मोदी सरकारचा डाव असून यामागे बिहार च्या जातीय जनगणनेच्या आकड्यांची मा॑डणी विश्लेषण केल्यामुळें स॑पुर्ण देशभरात हि मागणी समोर आल्यामुळे मोदी सरकारला आपला पराभव स्पष्ट दिसत असुन,’ खिसियानी बिल्ली खेळाडू नोचे’ यामुळे आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असुन त्याचा बैठकीत तीव्र निषेध करण्यात आला. याविरोधात मा. राष्ट्रपती महोदयांनी हस्तक्षेप करावा. असे निवेदन देण्याकरिता म॑गळवार दि १० ऑक्टोबर २३ रोजी सायंकाळी ४ वाजता व्हेरायटी चौक महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार टाकुन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कॉमरेड अरूण वनकर यांनी दिली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More posts