बँकांच्या खासगीकरणावर आणि जनतेच्या पैशांच्या सुरक्षेवर होणार मंथन; नागपुरात कामगार केसरी रुईकर स्मृती व्याख्यानाचे आयोजन 14 नोव्हेंबर ला !
नागपूर WH NEWS : बँकांचे खासगीकरण आणि जनतेच्या पैशांची सुरक्षा या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर नागपूर येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कामगार केसरी रुईकर स्मृती व्याख्यानमाला २०२६ अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, बँकिंग क्षेत्रातील बदल, खासगीकरणाचे परिणाम आणि सामान्य जनतेच्या ठेवींच्या सुरक्षेबाबत यावेळी सखोल चर्चा होणार आहे.
या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते मा. देविदास तुळजापूरकर (चेअरमन, बँकिंग एज्युकेशन ट्रेनिंग रिसर्च अकादमी आणि पर्याय फाउंडेशन) हे असणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीनिवास खांदवाले राहणार आहेत.
स्थळ : अर्पण सभागृह, हिंदी मोर भवन, झाशी राणी चौक,नागपूर 5.30 वाजता कार्यक्रम सुरु होणार.
या कार्यक्रमाला उपस्थित राहून महत्त्वपूर्ण विषयावरील चर्चा ऐकण्यासाठी नागरिक, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, बँक कर्मचारी आणि पत्रकार बांधवांनी आपल्या मित्रपरिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला रमेश पाटणे, गुरुप्रीत सिंह, विलास भोंगाडे, डॉ. गौतम कांबळे, अनिल ठोकमांडे, निलेश नासरे, अशोक दांडे, नरेश अडचुळे, राम रुईकर, डॉ. मनिषा रुईकर, डॉ. एम. एल. कासारे आणि डॉ. प्रदीप मुक्तिबोध अथक परिश्रम घेत आहे.
जनतेच्या कष्टाच्या पैशांची सुरक्षा आणि बँकिंग व्यवस्थेचे भविष्य यावर प्रकाश टाकणारे हे व्याख्यान नागपूरकरांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
