Category: विदर्भ

  • सत्यधर्म जागवा ! सत्यपाल महाराज

    सत्यधर्म जागवा ! सत्यपाल महाराज

    सत्यधर्म जागवा ! सत्यपाल महाराज

    नागपूर : समाज प्रबोधन व स्व. पार्वताबाई सुरकार यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमा निमित्याने प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे प्रबोधननाचा कार्यक्रम मानेवाडा रोडवरील बजरंग नगर, जादूमहाल चौक येथे नगर विकास कृति सामिती च्यावतीने आयोजीत करण्यात आला होता.

    प्रबोधनकार सत्यपाल महाराजानी वंदनीय तुकडोजी महाराजांनी दिलेल्या विचारातून भारतीय म्हणुन सत्यधर्माचे पालन करावे. असा संदेश दिला. याप्रसंगी अतिथी म्हणून श्री गुरुदेव सेवामंडळ नागपूर चे अध्यक्ष अशोक यावले, प्रा. राजाभाऊ सातपुते, देवेंद्र दस्तुरे, रमेश सिंगारे, प्रभू अरखेल, डॉ. जुमळे, रामदास टेकाडे, भाईजी मोहोड, पोलीस निरिक्षक, अजनी नितीनकुमार राजकुमार उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे संचालन सौ. सपना सागुले यांनी केले तर संयोजक दिलीप सुरकार यांनी आभार मानले. राष्ट्रवंदनेने कार्क्रमाची सांगता झाली. कार्क्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बंडे, सुरेश जुमडे, निलेश चवरे, मारोती सोनारे, अमित गांजरे, सुधाकर अम्बाडकर, प्रमोद चौधरी यांनी अथक परिश्रम घेतलेत. यावेळी कार्यक्रमाला नगरातील मोठ्या संख्येने नागरिकगण उपस्थित होते.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नारा हा प्रश्न मार्गी लागणार ! मुख्यमंत्री

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नारा हा प्रश्न मार्गी लागणार ! मुख्यमंत्री

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नारा हा प्रश्न मार्गी लागणार ! मुख्यमंत्री

    नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नारा नागपुर च्यावतीने उत्तर नागपूरमध्ये पार्क रिझर्व असल्या कारणास बचाव कृती समितीचे अध्यक्ष चंदू पाटिल यांच्या नेतृत्वात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामगिरी येथे भेट घेऊन चर्चा करण्यात आली असता मुख्यमंत्री महोदयांनी म्हंटले की, नारा पार्कचा प्रश्न डॉ. मिलींद माने यांचे माध्यमातून कळलेले आहे.

    मी लवकरच सबंधित विभागाची बैठक बोलावून चर्चा घडवून आणण्यासाठी पालकमंत्री यांच्याशी बोलतो आहे. चंदू पाटिल यांनी आंदोलन स्थळाला भेट देण्या विषयी विनंती केली असता मुख्यमंत्री महोदयांनी पालकमंत्री यांना आंदोलन स्थळाला भेट देण्याकरिता कळविण्यात येईल.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर देत अध्यक्ष चंदू पाटील यांना आश्वासन देत नारा पार्क झालेच पाहिजे आम्ही पालकमंत्र्यांना सांगू आणि प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नारा विकसित करण्यासाठी निवेदन देण्यात आले. उत्तर नागपूर हा मागासवर्गीय मतदार संघ असून नारा पार्कच्या माध्यमातून विकास आणि रोजगारांच्या संधी मिळू शकते. जर नारा पार्क विकसित झाले तर अनेक गोरगरिबांना रोजगार मिळेल असे सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. याप्रसंगी शिष्टमंडळात ॲड. शैलेश नारनवरे, गौतम पाटिल, दिलीप तांदळे, शाशिताई चालखुरे, येमुनाबाई रामटेके, रेखाताई खोब्रागडे, वानिता वालदे, अजय खोब्रागडे, अल्का रक्षित, विजया पाटील इत्यादी सभासदांची उपस्थिती होती.

  • WH NEWS स्टुडिओ का उदघाट्न…!मनाई त्यागमूर्ती रमाई आंबेडकर जयंती….. स्टुडिओ की मान्यवरॊ ने की सराहाना…..!10कलाकारो ने भीम गीत गाये, मंत्र मुग्ध किया.

    WH NEWS स्टुडिओ का उदघाट्न…!मनाई त्यागमूर्ती रमाई आंबेडकर जयंती….. स्टुडिओ की मान्यवरॊ ने की सराहाना…..!10कलाकारो ने भीम गीत गाये, मंत्र मुग्ध किया.

    WH NEWS स्टुडिओ का उदघाट्न, मनाई त्यागमूर्ती रमाई आंबेडकर जयंती!
    – स्टुडिओ की मान्यवरॊ ने की सराहाना
    – 10कलाकारो ने भीम गीत गाये, मंत्र मुग्ध किया.

    वाडी नागपूर – 2018 से डिजिटल मीडिया में कदम रखने वाले NEWS चैनल ने बडा मुकाम हासील किया. मुख्य संपादक विजय खवसे, बुद्धभूषण खवसे के  अथक परिश्रम से आज 5लाख SUBSCRIBE हो रहें हैं. विदर्भ में ही नही पुरे राज्य में अपना नाम उंचा करने वाले WH NEWS की टेगलाईन हैं ‘खबर छुपाते नही, दिखाते हैं ‘सच्ची खबरो को निडरता से दिखाने वाले WH NEWS का
    त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती के अवसर पर माता रमाई के प्रतिमा को माल्यार्पण कर WH News स्टुडिओ का उदघाट्न शुक्रवार को संपन्न हुआ.


    प्रख्यात कवी, राजकीय विश्लेषक ज्ञानेश वाकूडकर, पूर्व नागराध्यक्ष प्रेमनाथ झाडे के हातो स्टुडिओ में फीत काटकर उदघाट्न किया गया. इस मौके पर नगरसेवक नरेंद्र मेंढे, हर्षल काकडे,आशिष नंदागावली के साथ भीमराव लोणारे,संतोष नरवाडे,मनीष बोरकर,प्रवीण डाखोरे रोशन सोमकुवर, गौतम तिरपूडे, पराग भावसार, आंचल वर्मा,राजेश जंगले, सौरभ पाटील, संघपाल गडलिंग,राजानंद कावळे,गुरुदेव वनदुधे गणेश पाटील, साधना नितनवरे,बंडू आठवले, हरिभाऊ गवई, राजेश सराफी,जनार्धन भगत,गणेश नितनवरे पत्रकार अमित वांद्रे,नावेद आझमी, जिशान भाई,ख्वाजा कबीर,बिंदू उके, विलास माडेकर, गजानन तलमले,शैलेश गडपायले प्रमुखतासे उपस्थित थे.


    इस मौके पर स्टुडिओ को समाजकल्याण उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, वाडी के पीआई राजेश तटकरे, यातायात पीआई मीरासे, पीएसआई विजय धुमाळ, ने भेट देकर स्टुडिओ की सराहना की.


    इस मौके पर सुप्रसिद्ध राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाळे के साथ गायक ललित येडे, लोमेश भारती, सिद्धार्थ कव्वाल, विशाल भास्कर, अमर तागडे, किरण मेश्राम,गायिका ममता घोडेस्वार, पल्लवी नगराळे के साथ 10 कलाकारो ने भीम गीतो का भव्य कार्यक्रम किया. सभी कलाकारोको सिल्ड,पुष्प गुच्छ देकर सम्मानीत किया गया. संचालन पत्रकार संघपाल गडलिंग ने किया, आभार सौरभ पाटील ने माना.

  • एचडीएफसी बँक परिवर्तनने सुधारले महाराष्ट्रातील 65.28 लाखांहून अधिक लोकांचे जीवनमान ग्रामीण विकास, शिक्षणाचा प्रसार, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार वृद्धीवर सर्वाधिक प्रभाव

    एचडीएफसी बँक परिवर्तनने सुधारले महाराष्ट्रातील 65.28 लाखांहून अधिक लोकांचे जीवनमान ग्रामीण विकास, शिक्षणाचा प्रसार, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार वृद्धीवर सर्वाधिक प्रभाव

    एचडीएफसी बँक परिवर्तनने सुधारले महाराष्ट्रातील 65.28 लाखांहून अधिक लोकांचे जीवनमान
    ग्रामीण विकास, शिक्षणाचा प्रसार, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार वृद्धीवर सर्वाधिक प्रभाव
    नागपुर, –  सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम(सीएसआर) असलेल्या ‘परिवर्तन’अंतर्गत महाराष्ट्रातील 65.2. लाखांहून अधिक तर संपूर्ण भारतात 10.113 कोटीहून अधिक लोकांचे जीवनमान सुधारले आहे. महाराष्ट्रातील 36 पैकी 31 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे सुरु आहे.


    बँकेने समग्र सामाजिक कार्यासाठी परिवर्तन अंतर्गत सहा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. ते खालीलप्रमाणे :
    1. ग्रामीण विकास
    2. शिक्षणाचा प्रसार
    3. कौशल्य प्रशिक्षण आणि उपजीविका विकास
    4. आरोग्य आणि स्वच्छता
    5. आर्थिक साक्षरता आणि समावेशन
    6. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन
    महाराष्ट्रात,6 प्रमुख क्षेत्रांपैकी ग्रामीण विकास, शिक्षणाचा प्रचार, कौशल्य प्रशिक्षण आणि उपजीविका विकास या क्षेत्रांवर सर्वाधिक प्रभाव पडला असून, याचा फायदा अनुक्रमे 49685+ शेतकरी, 1 लाख+ विद्यार्थी, 74470+ महिला उद्योजकांना झाला आहे.

    बँकेने औरंगाबाद, बीड, चंद्रपूर, हिंगोली, जालना, मुंबई, नागपूर, नांदेड, उस्मानाबाद, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये विकास कार्यक्रम राबविला आहे. भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, लातूर, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, सातारा, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वांगीण ग्रामीण विकास उपक्रमांच्या माध्यमातून काम केले आहे.

    प्रमुख मदत :
    दुष्काळासाठी ग्रामीण मदत
    महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात कमी पाऊस आणि कमी होत असलेली भूजल पातळी हे एक मोठे संकट आहे,जे हवामान बदलामुळे आणखी गंभीर झाले आहे. यावर उपाय म्हणून, परिवर्तनने अनेक जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन (एनआरएम) कार्यक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये भूजल जपण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कालवे, मातीचे धरणे आणि चेक डॅम यासारखे 1460 हून अधिक माती आणि जलसंधारण प्रकल्प उभारण्यात आले.
    परिवर्तनने आपल्या अंमलबजावणी भागीदारांसोबत मिळून माती आणि पाणी संरक्षण, सरकारी योजना आणि सेवा, पाणी व्यवस्थापन पद्धती, आणि पाणी नियोजन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर जागरूकता करणारी सत्रे आयोजित केली. याशिवाय, बँकेने ग्रामस्थांना दूषित पाण्यामुळे होणारे रोग आणि त्यांच्या प्रतिबंधक उपायांबद्दल शिक्षित केले, कारण अनेक गावकरी टाक्यांमधून पुरवठा होणाऱ्या पाण्यावर अवलंबून राहत होते.

    12 गावांमध्ये समग्र ग्रामीण विकास कार्यक्रम
    एचडीएफसी बँक परिवर्तन, कोहेझन फाउंडेशन ट्रस्टच्या सहकार्याने तुळजापूर तालुक्यातील 12 गावांमध्ये समग्र ग्रामीण विकास कार्यक्रम राबवत आहे, ज्याचा लाभ 4000 कुटुंबांमधील 18000 हून अधिक लोकांना होतो आहे. या उपक्रमात पुढील गोष्टींचा समावेश आहे:
    * सौर उर्जा आधारित रस्त्यावरील दिव्यांची स्थापना
    * जैविक पद्धतीने विविध पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन
    * जलसंधारण आणि सिंचन प्रणालीचे पुनरुज्जीवन
    * ओस्मानाबादी बकऱ्या आणि परसबागेतील कुक्कुटपालन प्रकल्पांची उभारणी
    हा कार्यक्रमाअंतर्गत 14 चेक डॅम्सचे बांधकाम,प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी देणे आणि तुळजाई महिला बकरी आणि कोंबडी उत्पादक सहकारी सोसायटीला मदत देणे याचा देखील समावेश आहे जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, महिलांचे सक्षमीकरण होईल आणि गावाचा सर्वांगीण विकास होईल.
    “एचडीएफसी बँक देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि आम्ही सेवा देणाऱ्या समुदायांचे जीवन सकारात्मकरित्या बदलविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. एचडीएफसी बँक परिवर्तनद्वारे, आम्ही महत्त्वाच्या समस्या सोडवण्यावर आणि शाश्वत विकासासाठी उपक्रमांना पाठिंबा देण्यावर लक्ष केंद्रित करतो,” असे एचडीएफसी बँकच्या सीएसआर विभागाच्या प्रमुख नुसरत पठाण यांनी सांगितले.
    “आम्ही राज्यभरातील सर्वसमावेशक आणि सहज उपलब्धता असलेल्या बँकिंग सेवांची एक व्यापक श्रेणी प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. एक सामाजिकदृष्ट्या जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून, एचडीएफसी बँक व्यक्तींच्या आणि कुटुंबांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी आपली भूमिका बजावण्यावर लक्ष केंद्रित करते. आम्ही समुदायांना समृद्ध होण्यासाठी आवश्यक असलेली संसाधने, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यास कटिबद्ध आहोत,” असे एचडीएफसी बँकचे, महाराष्ट्र प्रदेशाचे बँकिंग प्रमुख तरुण चौधरी यांनी सांगितले.

    एचडीएफसी बँक मार्च 2023 आर्थिक वर्षासाठी सामाजिक उत्तरदायित्वा अंतर्गत खर्च करणाऱ्या देशातील प्रमुख बँकांपैकी एक होती. 31 मार्च 2024 पर्यंत, बँकेने देशभरातील सामाजिक उपक्रमांवर 945.31 कोटी खर्च केले. एचडीएफसी बँक परिवर्तनाने सप्टेंबर 2024 पर्यंत देशभरातील 10.113 कोटींहून अधिक लोकांचे जीवन सकारात्मकरीत्या प्रभावित केले आहे.

  • बेंडोजी महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा महासागर  बेंडोजी महाराजांच्या जयघोषाने दूमदूमली घुईखेड नगरी  महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून १५२ दिंड्या दाखल

    बेंडोजी महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा महासागर बेंडोजी महाराजांच्या जयघोषाने दूमदूमली घुईखेड नगरी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून १५२ दिंड्या दाखल

    बेंडोजी महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा महासागर

    बेंडोजी महाराजांच्या जयघोषाने दूमदूमली घुईखेड नगरी

    महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून १५२ दिंड्या दाखल

    चांदूर रेल्वे – (राजेश सराफी )

    महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या असंख्य भाविकांनी बुधवारी (ता. ५) १३ व्या शतकातील श्री संत बेंडोजी महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. बुधवारी मोठ्या उत्साहात काल्याचे किर्तन व भव्यदिव्य दहिहांडी महोत्सव झाला. यामध्ये भाविक मोठ्या उत्साहात सामिल झाले होते. श्री संत बेंडोजी महाराजाच्या ऐतिहासीक पालखी सोहळयात संपूर्ण महाराष्ट्रातील १५२ दिंड्या सामील झाल्या. लेझीम, बँड, भजने व हरिनामाच्या गजराने संपूर्ण घुईखेड नगरी भक्तीमय झाली होती. सहभागी झालेल्या दिंड्यांतून ईश्वरचिठ्ठीने काढलेल्या सायंकाळच्या महाआरतीचा मान रूख्मिनी महिला भजन मंडळ, वाई यांना मिळाला. त्यांचा साळीचोळीने सत्कार करण्यात आला.

    चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील श्री संत बेंडोजी महाराजाच्या संजीवन समाधी महोत्सवाला ३० जानेवारीपासून प्रारंभ झाला. संगीतमय देवी भागवत कथा प्रवक्ता ह.भ.प. संगिताताई करंजीकर ह्या होत्या. ४ फेब्रुवारीपर्यंत देवी भागवत कथा दररोज सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ वाजतापर्यंत झाली. ५ फेब्रुवारी बुधवारी दुपारी १२ ते २ च्या दरम्यान ह.भ.प. उमेश महाराज जाधव (आळंदीकर) यांचे काल्याचे किर्तन होऊन ह.भ.प. गणेश महाराज व रुपमसिंग सूर्यवंशी यांच्या हस्ते कालावाटप करण्यात आले. श्री संत बेंडोजी महाराजांची भव्य सामुहिक आरतीने बुधवारी कार्यक्रमांची सुरूवात झाली. दुपारी २ वाजता बेंडोजी महाराजांच्या भव्य दिव्य पालखी सोहळ्याला सुरूवात झाली. यामध्ये घुईखेड येथील बेंडोजी बाबा विद्यालयाच्या दिंडीसह महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील आलेल्या महिला व पुरूषांच्या १५२ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. लेझीम, बँड, भजन व हरिनामाच्या जयघोषात ऐतिहासीक पालखी व दिंड्या संस्थानच्या शेतामध्ये पोहचल्या. परंपरेनूसार शंभर वर्षांहून अधिकच्या चिंचीच्या झाडाजवळ दहिहांडीचा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. तर सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला.

    तळेगाव दशासरचे ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यानंतर यात्रा महोत्सवाला सुरूवात झाली आहे. यात्रेत खेळणीचे दुकान व लोकपयोगी विविध साहित्यांची दुकाने सजली होती. यात्रेकरू संसारपयोगी साहित्य खरेदी करतांना दिसले. तर ९ फेब्रुवारीला होमहवन, कळस स्थापना व गोत आंबिल महाप्रसादाचे आयोजन सुध्दा करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, विश्वस्त प्रविण घुईखेडकर व इतर विश्वस्त, समस्त गावकरी, भाविक भक्त परिश्रम घेत आहे.

    आजपासून शंकरपटाचा थरार

    श्री बेंडोजी बाबा संस्थान व गावकरी मंडळी घुईखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जंगी शंकरपटाचे आज ६ व ७ फेब्रुवारी रोजी घुईखेड गावातील बेंडोजी बाबा एम.सी.व्ही.सी. महाविद्यालयाच्या मागील मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या शंकरपटाला विशेष उपस्थिती म्हणून श्री. बेंडोजी बाबा संस्थानचे विश्वस्त प्रविण घुईखेडकर, मिलिंद घुईखेडकर, अरविंद चनेकार, अ.भा. ग्रामिण पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, अनिल गायकवाड व इतरांची उपस्थिती राहणार आहे. तरी या भव्य शंकरपटाचा नागरिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री संत बेंडोजी बाबा संस्थान व गावकरी मंडळी, घुईखेड यांच्या वतीने करण्यात आले आहे. या शंकरपटात दोन गटांत एकुण दोन लाख रुपयांच्या जवळपास बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

  • नवतंत्रज्ञान जाणून घेण्याच्या विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेला नविण्यपूर्ण उपक्रमाची जोड आवश्यक – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

    नवतंत्रज्ञान जाणून घेण्याच्या विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेला नविण्यपूर्ण उपक्रमाची जोड आवश्यक – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

    नवतंत्रज्ञान जाणून घेण्याच्या विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेला नविण्यपूर्ण उपक्रमाची जोड आवश्यक
    – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

    नागपूर,दि.5 : शिक्षक हा शिक्षण विभागाचा मानबिंदू तर विद्यार्थी हे दैवत आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील पटसंख्या वाढविण्यासह त्यांच्या मनात शिक्षणाविषयी अधिक गोडी निर्माण व्हावी यासाठी शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे. बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे मुलांची आकलन क्षमता व नवतंत्रज्ञान जाणून घेण्याच्या उत्सुकतेला शिक्षकांनी नविण्यपूर्ण उपक्रमाची जोड द्यावी, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

    सिव्हील लाईन्स येथील सेंट उर्सूला गर्ल्स हायस्कूल येथे नागपूर विभागातील उपक्रमशिल शिक्षक या विषयावर विभागातील सर्व शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व प्रयोगशिल शिक्षक यांच्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामन वंजारी, शिक्षण उपसंचालक दिपेंद्र लोखंडे उपस्थित होते.

    परिपूर्ण शिक्षणाची प्रक्रिया ही सामुहिक कृतीशी निगडीत आहे. सर्व विषय शिक्षकांच्या सांघीक भावनेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर दूरदृष्टी ठेऊन मुलभूत विकासाचा संकल्प केला आहे. विविध आव्हानांवर मात करीत ग्रामीण, दुर्गम भागातील शिक्षकांनी दिलेले योगदान हे मोलाचे आहे. अशा सकारात्मक योगदानातून नागपूर शिक्षण विभागाचा अपूर्व ठसा निर्माण झाल्याचे गौरोद्गार शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी काढले.

    अनेक जिल्ह्यातील शाळेत विविध समस्या आहेत त्या दूर करण्याचा शासनातर्फे प्रयत्न करण्यात येईल. उत्तम शिक्षणासाठी अनुभवाच्या आधारावर शिक्षकांनी केलेले कष्ट वाया जाणार नाही याची मला खात्री आहे. शिक्षकांना मानसन्मान कसा मिळेल याकडे शिक्षण विभागाचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

    चर्चासत्रात नागपूर विभागातील 70 तालुक्याचे शिक्षक सहभागी झाले होते. दुर्गम, आदिवासी बहुल भागात केलेल्या कार्याचा प्रयोगशिल शिक्षकांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. प्रत्येक जिल्हृयातील दोन आदर्श शिक्षकांनी आपले सादरीकरण सादर केले. यात एक पाऊल गुणवत्तेकडे, भौतिक सुविधा, लोकसहभागातून शालेय शिक्षणास प्रोत्साहन, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, माझी जिव्हाळयाची शाळा, सुरक्षित व सुयोग्य तंत्रज्ञान, विज्ञानाची जिज्ञासा, रात्र शाळा, 365 दिवस शाळा, वाढदिवस पालकांचा उपक्रम, विद्यार्थ्यांना बचतीची सवय, दत्तक शाळा, लोकसहभागातून शाळेचे सौदर्यीकरण अशाविविध उपक्रमांचा सहभाग होता. माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी आभार मानले.

  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक बोधगया येथे रवाना

    मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक बोधगया येथे रवाना

    मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक बोधगया येथे रवाना

    नागपूर,दि. ५ : महाराष्ट्र शासनाच्या  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नागपूर येथून बोधगया येथे २३६ नागरिक आज विशेष रेल्वेने रवाना झाले.

    आज रात्री नागपूर येथील मुख्य रेल्वे स्टेशन येथून ही रेल्वे रवाना होणार झाली. खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार आशीष देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी रेल्वेला हिरवी झेंडी दाखविली.

    रवाना होण्यापूर्वी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी दूरध्वनीवरून प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेचा लाभ घेता यावा यासाठी शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे.  या योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत नागपूर येथून हे ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले आहेत.

     

  • परिषदेतील विचारमंथनाला अनुसरून आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक आरोग्य धोरण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    परिषदेतील विचारमंथनाला अनुसरून आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक आरोग्य धोरण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    परिषदेतील विचारमंथनाला अनुसरून आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक आरोग्य धोरण करू
    – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    ▪️एम्स येथील आदिवासींच्या आरोग्यावर जागतिक परिषदेचा समारोप

    ▪️पारंपारिक आदिवासी उपचार व आधुनिक वैद्यकाचा एकात्मिक उपयोजन महत्वपूर्ण

    ▪️सेवाभावी संस्थांच्या सहयोगातून गडचिरोली जिल्हा होणार मलेरिया मुक्त

    ▪️आदिवासी समाजातील निसर्गपूरक उपचाराला आधुनिकतेची जोड मिळावी

    नागपूर, दि. :- एम्स येथील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत आदिवासींच्या आरोग्याबाबत झालेले तज्ज्ञांचे विचारमंथन अधिक मोलाचे आहे. याबाबत आता पुढचे पाऊल म्हणून परिषदेतील उपस्थित झालेले प्रश्न, त्याची असलेली उत्तरे, तज्ञांच्या सूचना याला अधोरेखित करून आरोग्य विद्यापीठ, एम्सच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनातर्फे सर्वसमावेशक असे आरोग्यधोरण केले जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ’एम्स’ नागपूर येथे आयोजित आदिवासी आरोग्य परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), ’एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, परिषदेचे संयोजक डॉ. संजीव चौधरी, विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ उपस्थित होते.

    या आरोग्य धोरणात आदिवासींच्या आरोग्य विषयक मुलभूत प्रश्नांवर निश्चित उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी कुलगुरूंना केल्या. हे धोरण केवळ महाराष्ट्रीय स्तरापुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय व वैश्विक स्तरावर उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याला महाराष्ट्र शासनातर्फे सर्वातोपरी सहकार्य केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

    हजारो वर्षांपासून आदिवासी समाज आपल्या उपजत ज्ञानावर स्वतःचे अस्तित्व टिकून आहे. काळाच्या प्रवाहात अनेक स्थित्यंतरे झाली मात्र आदिवासी संस्कृती टिकून राहिली. यातील मूल्य, विविध भागातील पारंपारिक आदिवासी उपचार आणि आधुनिक वैद्यकाचा एकत्रित विचार करुन त्याचे उपयोजन केल्यास आदिवासींच्या आरोग्यविषयक मुलभुत सुविधांवर उत्तरे प्राप्त होऊ शकतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    आजही आदिवासी क्षेत्रात कुपोषण, सिकलसेल आणि मलेरिया यासारखे मुलभूत प्रश्न आहेत. यावर राज्यशासन व केंद्रशासनातर्फे अनेक विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. अनेक योजनांना यशदेखील प्राप्त होत आहे. सिकलसेल आजार निर्मूलनासाठी
    पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू यात असे आवाहन त्यांनी केले.

    या परिषदेसाठी निवडलेले स्थळ व ठिकाण याबद्दल त्यांनी संयोजकांना धन्यवाद दिले. आदिवासी गोंड राजा बख्त बुलंद शाह हे या शहराचे संस्थापक होते. इथे आदिवासी संस्कृतीच्या पाऊलखुणा आहेत असे त्यांनी सांगितले.

    बिलगेट्स फाउंडेशन, सनफार्मा, आयसीएमआरए यांच्या सहयोगातून आदिवासी गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करू असे त्यांनी सांगितले.

    आदिवासींच्या आरोग्य समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी MUHS FIST-25 परिषद महत्वपूर्ण आहे. या परिषदेच्या माध्यमातून एकत्रित झालेला डेटा धोरण निश्चितीसाठी महत्वपूर्ण आहे विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले.

    ’एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि ’एम्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासींच्या आरोग्य समस्यांसाठी सुरु करण्यात आलेली परिषद नक्कीच जागतिक स्तरावर नावलौकिक करणार आहे. ’एम्स’ तर्फे विविध योजना कार्यान्वीत करण्यात आल्या आहे त्याचा सकारात्मक परिणाम मुर्त रुपात दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

    आदिवासी भागातील लोकांच्या आरोग्य समस्यांसाठी MUHS FIST-25 च्या यासाठी आरोग्य विद्यापीठाने व ’एम्स’ ने केलेल सहकार्य महत्वपूर्ण आहे. आदिवासींच्या आरोग्य समस्या सोडविण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी आदर्श निर्माण झाला आहे. जेणेकरुन सामाजिक काम करण्याची नवीन टीम तयार होईल असे परिषदेचे आयोजक सचिव डॉ. संजीव चौधरी यांनी सांगितले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एम्स परिसरात उभारण्यात आलेल्या ट्रायबल व्हिलेज येथे भेट देवून पाहणी केली.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दर्शन दक्षिणदास यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार MUHS FIST-25 चे संयोजन समितीचे सदस्य संदीप राठोड यांनी केले.
    00000

  • एक विलक्षण योगायोग!मृत्यूनंतर काय होते? आत्मा अस्तित्वात आहे का? पुनर्जन्म खरोखरच होतो का? –  देवनाथ गंडाते

    एक विलक्षण योगायोग!मृत्यूनंतर काय होते? आत्मा अस्तित्वात आहे का? पुनर्जन्म खरोखरच होतो का? – देवनाथ गंडाते

    एक विलक्षण योगायोग!मृत्यूनंतर काय होते? आत्मा अस्तित्वात आहे का? पुनर्जन्म खरोखरच होतो का? हे प्रश्न मानवाच्या मनात अनादी काळापासून रुंजी घालत आले आहेत. काही याला धार्मिक श्रद्धा मानतात, काही विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहतात, तर काही याला दैवी चमत्कार मानतात. अशाच एका अनोख्या घटनेने संपूर्ण गावात, सोशल मीडियावर आणि जनमानसात नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील पिंपळगाव मारुती येथे २९ जानेवारी रोजी विजय मारुती धवने यांच्या मातोश्री, अनुसया मारुती धवने यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मातृवियोगाच्या दु:खात संपूर्ण कुटुंब आणि गावकऱ्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. सारा परिसर अश्रूंनी ओथंबून गेला होता. परंतु याच वेळी, एका अद्भुत घटनेने सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या.

    अनुसया यांचे पार्थिव त्यांच्या घरातून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे नेण्यापूर्वी, अचानक एक वानर घराच्या अंगणात आला. त्याने शांतपणे पार्थिवाजवळ जाऊन त्याच्याकडे एकटक पाहिले. काही क्षण तो स्थिर उभा राहिला आणि अचानक, त्याने मृतदेहासमोर नतमस्तक होत नमस्कार केला!

    कौतुक, आश्चर्य आणि श्रद्धेच्या भावनेने भरलेलं हे दृश्य बघताच गावकरी स्तब्ध झाले. हे वानर नेहमी गावात वावरणारे नव्हते, तरीही ते तिथे आले कसे? केवळ नमस्कार करूनच थांबले नाही, तर तिरडीकडे स्वतःहून ते पुढे सरकत मृतदेहाच्या चेहऱ्यावरील पदर हलक्याच हाताने बाजूला केला. जणू काही तो तिला शेवटचा निरोप देत होता! एवढ्यावरच थांबला नाही, तर वानराने अनुसया यांच्या डोळ्यावरील चष्माही अलगद बाजूला केला.

    गावकऱ्यांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी ही घटना पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. अंत्यसंस्काराची विधी सुरू असताना, वानर तिथेच बसून होते. कुणी त्याला हाकलले नाही, ना त्याने कुणाला त्रास दिला. अगदी अंतिमसंस्कार आटोपल्यानंतरही तो गावकऱ्यांसोबत स्मशानभूमीतून परतला! इतकेच नाही, तर नंतर जेव्हा अनुसया यांच्या अस्थी आणण्यासाठी कुटुंबीय गेले, तेव्हाही तो वानर उपस्थित होता.

    या घटनेनंतर गावात चर्चा सुरू झाली. काहींनी याला केवळ एक योगायोग मानले, तर काहींनी दैवी चमत्कार म्हणून पाहिले. विशेष म्हणजे, अनुसया यांचे पती ‘मारुती’ यांचे २० वर्षांपूर्वी निधन झाले होते! आणि आता, त्यांच्या अंत्यसंस्काराला ‘वानर’ स्वरूपात कोणीतरी उपस्थित होते.

    गावकरी हळहळले, नातेवाईक भारावले, आणि या घटनेने श्रद्धा आणि विज्ञान यामध्ये एक वेगळीच भावना निर्माण केली.

    सोशल मीडियाच्या युगात हा क्षण कोणाच्याही नजरेतून सुटला नाही. उपस्थितांनी कॅमेऱ्यात हे दृश्य कैद केले, आणि पाहता पाहता तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. कोणी याला हनुमानजींची कृपा मानली, कोणी पुनर्जन्माचा पुरावा समजले, तर काहींनी केवळ एक अजब योगायोग म्हणून स्वीकारले.

    मृत्यू एक सत्य आहे, पण त्यानंतर काय होते, हे अजूनही एक गूढच आहे. पुनर्जन्माच्या कथा, चमत्काराच्या गोष्टी किंवा अदृश्य शक्तींची अनुभूती या सर्व गोष्टी श्रद्धेचा भाग आहेत. परंतु, पिंपळगावातील या घटनेने नक्कीच अनेकांना अंतर्मुख केले.

    कदाचित ही केवळ एक विलक्षण योगायोगाची गोष्ट असेल, पण कधीकधी अशा प्रसंगांमधूनच श्रद्धा अधिक दृढ होते. आणि माणसाला वाटते जिव्हाळ्याच्या नात्यांचे बंध हे शरीरापुरते मर्यादित नसतात, ते आत्म्याच्या अदृश्य बंधनांनी जोडलेले असतात.

    – देवनाथ गंडाते, वरिष्ठ पत्रकार 

    गावकऱ्यांनी दिलेली माहिती, समाज माध्यमात आलेली माहिती आणि टीव्ही चॅनल्सने दिलेल्या बातम्या या आधारावर मी माझे मत व्यक्त केलेले आहे. त्यातून कोणाच्याही भावना दुखावणे हा माझा उद्देश नाही.)

    साभार -देवनाथ गंडाते,फेसबुक 

  • देशहित में उल्लेखनीय कार्यों से गणतंत्र समृद्ध हो रहा है ‘जय हो’ सम्मान समारोह में देशभक्ति गीतों की प्रस्तुति

    देशहित में उल्लेखनीय कार्यों से गणतंत्र समृद्ध हो रहा है ‘जय हो’ सम्मान समारोह में देशभक्ति गीतों की प्रस्तुति

    देशहित में उल्लेखनीय कार्यों से गणतंत्र समृद्ध हो रहा है
    ‘जय हो’ सम्मान समारोह में देशभक्ति गीतों की प्रस्तुति
    नागपुर- देशहित में उल्लेखनीय कार्य करनेवालों का हमेशा सम्मान होना चाहिए। यह लोग हमारे बीच के ही फलते-फुलते हैं। ऐसे लोग अपनी सोच व मेहनत के बूते पर देश व जनहित के कार्य में लगे रहते है। जनसेवा हो, स्वास्थ्य सेवा हो या देश सेवा हो, सभी क्षेत्र का अपना महत्व है। इन महानुभावों के कारण ही गणतंत्र सुखी व समृद्ध हो रहा है। ऐसे लोगों के कार्य से हम गौरवान्वित होते है।

    इसलिए एेसे लोगों को सम्मानित करना हमारी जिम्मेदारी है। इससे पूरे समाज को व नई पीढ़ी को प्रेरणा मिलती है। ऐसा उपस्थित मान्यवरों ने कहा। स्वर अलंकार व संगीत सरिता परिवार की तरफ से गणतंत्र दिवस पर कसार भवन, धारस्कर रोड, इतवारी में ‘जय हो’ सम्मान समारोह आयोजित किया गया।

    सत्कार व देशभक्ति गीतों की प्रस्तुति
    कार्यक्रम में अतिथि के रुप में विविध क्षेत्रों के मान्यवर उपस्थित थे। समारोह में सहायक पुलिस उपनिरीक्षक रमाकांत बाविस्कर, सेवानिवृत्त पुलिस उपनिरीक्षक सुभाष बुरडे, है हय वंशीय क्षत्रिय कसार समाज के उपाध्यक्ष देवेंद्र बंबडवार, सचिव सुनील लखेटे, योग नृत्य प्रशिक्षक राजकुमार गौर, समाजसेवी योगेश खंडवानी, अशोक धापोडकर, सेवानिवृत्त अतिरिक्त पुलिस उपअधीक्षक राजेंद्र नागरे आदि को शॉल व स्मृतिचिह़न व मानपत्र देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम का संयोजन अरविंद कोसारकर ने किया।

    संचालन आरजे तेजल ने व तकनीकी सह्योग विनोद अग्रवाल ने किया। कार्यक्रम के दौरान शहर के कलाकार डॉ. पुष्पलता नंदनवार, शीतल दहीकर, निखिल गजभिये, वासुदेव मौंदेकर, शैलेश तापस, राजेश महाजन, राजेश धकाते, जयंतीलाल शर्मा, मिलिंद मून, अविनाश लोखंडे, मनोज तिवारी, सत्यजीत नायक, पियूष शिंदे, शैेलेश कुर्वे, संजय चरडे, मनीष सुशीबिने आदि ने देशभक्ति गीतों की प्रस्तुतियां दी। कार्यक्रम में बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे।