सत्यधर्म जागवा ! सत्यपाल महाराज
नागपूर : समाज प्रबोधन व स्व. पार्वताबाई सुरकार यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमा निमित्याने प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे प्रबोधननाचा कार्यक्रम मानेवाडा रोडवरील बजरंग नगर, जादूमहाल चौक येथे नगर विकास कृति सामिती च्यावतीने आयोजीत करण्यात आला होता.
प्रबोधनकार सत्यपाल महाराजानी वंदनीय तुकडोजी महाराजांनी दिलेल्या विचारातून भारतीय म्हणुन सत्यधर्माचे पालन करावे. असा संदेश दिला. याप्रसंगी अतिथी म्हणून श्री गुरुदेव सेवामंडळ नागपूर चे अध्यक्ष अशोक यावले, प्रा. राजाभाऊ सातपुते, देवेंद्र दस्तुरे, रमेश सिंगारे, प्रभू अरखेल, डॉ. जुमळे, रामदास टेकाडे, भाईजी मोहोड, पोलीस निरिक्षक, अजनी नितीनकुमार राजकुमार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सौ. सपना सागुले यांनी केले तर संयोजक दिलीप सुरकार यांनी आभार मानले. राष्ट्रवंदनेने कार्क्रमाची सांगता झाली. कार्क्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बंडे, सुरेश जुमडे, निलेश चवरे, मारोती सोनारे, अमित गांजरे, सुधाकर अम्बाडकर, प्रमोद चौधरी यांनी अथक परिश्रम घेतलेत. यावेळी कार्यक्रमाला नगरातील मोठ्या संख्येने नागरिकगण उपस्थित होते.