आशी नगर झोन कार्यालयावर भाजयुमोचा घेराव; विविध नागरी समस्यांवर तातडीच्या कारवाईची मागणी!

Follow Us on :

नागरी समस्यांवर तातडीच्या कारवाईची मागणी!आशी नगर झोन कार्यालयावर भाजयुमोचा घेराव; विविध
नागपूर,WH NEWS दि. 31 जुलै : आशी नगर झोनमधील विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आशी नगर झोन कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात आले. यावेळी झोनचे सभापती आसिफ शेख यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

हे आंदोलन भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूर शहराध्यक्ष सचिन करारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर महामंत्री रितेश मनोजकुमार पांडे यांच्या नेतृत्वात पार पडले. प्रभाग क्रमांक २, ३, ६ आणि ७ मधील नागरिकांकडून सातत्याने मूलभूत सुविधांबाबत तक्रारी येत असल्याने या प्रश्नांच्या तातडीने निराकरणाची मागणी करण्यात आली.
निवेदनात कमाल चौक मार्केट, वैशाली नगर आणि चाट खांबा चौक परिसरातील अतिक्रमण हटविणे, शाळांच्या परिसरात नियमित स्वच्छता राखणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, सुरळीत पाणीपुरवठा करणे, खेळाच्या मैदानांमध्ये पुरेशी प्रकाशव्यवस्था उभारणे, नाल्यांची नियमित साफसफाई करणे तसेच एकता कॉलनीतील सिमेंट रस्त्यांमुळे घरांमध्ये साचणाऱ्या पाण्याच्या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करणे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने या समस्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा उत्तर नागपूरमध्ये नागरिकांच्या प्रश्नांसाठी तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

या आंदोलनात कोषाध्यक्ष शशांक समुद्रे, शहर समन्वयक जय साजवानी, उत्तर नागपूर मंडळ अध्यक्ष पिंकेश पटले, सुमित साहू, शुभम पाली, महामंत्री सुयश झनझनवार, ऋतिक प्रजापती, गौरव साहू, अतुल कनोजिया, प्रयाग पांडे, साहिल ठाकूर, ऋषभ गौर, वरुण गोतमारे, अमित तिवारी, अनुज समुद्रे, आशिष इंगळे, साहिल गौर, संदेश ठवरे, सार्थक तिवारी यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए