आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या
संवाद तरुणांशी या प्रेरणादायी कार्यक्रमाला
नांदगावकर येणार
नांदगाव पेठ दि.9 महाराष्ट्रातील अन्न व औषध विभागातील वाढत्या गैरप्रकाराला लगाम लावणारे कर्तव्यदक्ष आयुक्त व सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्री तुकाराम मुंढे हे शनिवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता
अमरावतीत खादी महिला समितीने आयोजित केलेल्या पोटे टाऊनशिप मधील कार्यक्रमाला येणार असून तरुणाईची संवाद साधणार आहेत. या निमित्ताने नांदगाव पेठ येथे मिळालेला उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद पाहून मी अक्षरशः भारावलो आहे असे मत आयोजन समितीचे सदस्य व सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी व्यक्त केले.
आज त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. रामदास चवरे यांच्यासह जि. प .कनिष्ठ महाविद्यालय , नांदगाव पेठ या ठिकाणी भेट दिली व प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षक यांच्यासह विद्यार्थ्यांची संवाद साधला .
यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे राजन देशमुख उपस्थित होते. श्री
तुकाराम मुंढे यांना प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या शिस्तप्रिय व आक्रमक भूमिकेमुळे ओळखतो. नांदगाव पेठ सारख्या गावात मुंढेसरांची चर्चा आहे .यामुळे एक ऑगस्टला अमरावतीच्या खादी महिला समिती च्या वतीने पोटे कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थी आपल्या पालकांसह येण्यास उत्सूक असल्याचे आशादायी चित्र यावेळी दिसले.
प्रार्थनेच्या वेळी सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसमोर या कार्यक्रमाची विस्तृत माहिती आपल्या खास शैलीत .प्रा काठोळे सरांनी सांगितल्याबद्दल प्राचार्य श्री देवेंद्र ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.डॉ उल्हास घारड
यांनी केले .या प्रेरणादायी
कार्यक्रमाला अध्यापक अध्यापिका व विद्यार्थ्यांची व विद्यार्थिनींची लक्षणीय उपस्थिती लाभली होती.
