पंजाबरावांवर कादंबरी,नागरिकांना आवाहन!

Follow Us on :

पंजाबरावांवर कादंबरी,नागरिकांना आवाहन!

अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक भारताचे माजी कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर कादंबरी लिहिण्याचा संकल्प अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने सोडला असून त्यासाठी मराठीतील सुप्रसिद्ध लेखक व ज्यांची दोनशे पुस्तके प्रकाशन व्यवसायात आहेत असे सिद्धहस्त लेखक प्रा. नवनीत देशमुख यांना करारबद्ध केले आहे.

या कादंबरीचे दोन प्रकरणाचे लेखन सुरू झाले असून या कादंबरीचे प्रकाशन 27 डिसेंबरला होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या संपर्कामध्ये बरेच लोक आलेले आहेत. त्यापैकी काही जिवंत आहेत. पण जे उपलब्ध नाही आहेत त्यांच्या वारसांना त्यांनी डॉ. पंजाबरावच्या आठवणी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या बरोबरचे फोटो संग्रहित आहेत. अशा काही आठवणी जर नागरिकांकडे असतील किंवा त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना सांगितलेल्या असतील तर त्या त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्या 9890967003 या क्रमांकावर पाठवून या कादंबरीच्या प्रकल्पाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्याकडे अशा आठवणी असतील तर किंवा छायाचित्र असतील तर लेखक किंवा प्रकाशक स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्या संकलित करतील. या कामी सहकार्य करणाऱ्या संबंधित नागरिकांचा ऋणनिर्देश या कादंबरीमध्ये करण्यात येईल.

नुकतेच या कादंबरीचे लेखक प्रा. नवनीत देशमुख जे वर्धा येथील जानकीदेवी बजाज महिला महाविद्यालयातून मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत ते डॉ
पंजाबराव देशमुख अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कुटुंबातील प्राचार्य अनुप्रिता देशमुख व त्यांचे यजमान यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पापळ गावाला भेट देऊन काही लोकांची कादंबरीच्या संदर्भात चर्चा केली. तसेच भाऊसाहेबांचे घर परिसर याचा अभ्यास केला.
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कार्य कादंबरी रूपाने लोकांसमोर यावे व ते लोकाभिमुख व्हावे यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख अकादमीने हा निर्णय घेतला असून हा कादंबरीचा प्रकल्प लवकरात लवकर समृद्ध व्हावा यासाठी नागरिकांना हे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला अमरावती विदर्भ व महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा संयोजकांनी व्यक्त केली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यावर यापूर्वी प्रा .कल्पना देशमुख यांनी भाऊ ही कादंबरी प्रकाशित केली असून त्या कादंबरीचा संदर्भ तसेच वीर उत्तमराव मोहिते यांनी लिहिलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख जीवन व कार्य तसेच श्री सुदाम सावरकर व प्रा. सूर्यकर यांनी लिहिलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या चरित्राचा उपयोग तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या त्यांच्या नातेवाईकांचे अनुभव या सर्वांचा समावेश कादंबरी रूपाने या कादंबरीत करण्यात येणार आहे. ही कादंबरी प्रदीर्घ स्वरूपाची असणार असून पंजाबराव देशमुख यांच्या सर्वांगांचा सर्वांगीण विचार या कादंबरीतून व्यक्त होणार आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए