नानासाहेब मोखडे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

0
42

नानासाहेब मोखडे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

हिंगोली, दि.८ (प्रतिनिधी) -एका छोट्याश्या गावातून आपल्या कार्याची सुरुवात करून शून्यातून विश्व निर्माण करणारे नाना मोखडे चे नानासाहेब झाले आणि अमरावती जिल्ह्यातीला चांदुर रेल्वे तालुक्या मधील थुगाव चे नाव रोशन करून आज समाज रत्न पुरस्काराने सन्माणीत झाले. त्यांना WH NEWS कडून अनंत शुभेच्छा.

य जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे केंद्रनायक नानासाहेब मोखडे यांच्या शासकीय सेवेसह सामाजिक कार्याची दखल घेऊन समाजरत्न पुरस्कार-२०२५ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण पनवेल येथे एका कार्यक्रमात करण्यात आले.

हिंगोली येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे केंद्रनायक नानासाहेब मोखडे यांनी होमगार्ड यांना शिस्तीचे धडे देत त्यांच्यात अमुलाग्रबद्दल करण्यात आला. या शासकीय कामाव्यतीरिक्त मोखडे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन दैनिक ‘लोकांकीत’ यांच्या ९ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त यंदाचा समाजरत्न पुरस्कार नानासाहेब मोखडे यांना नुकताच जाहीर झाला होता. सदर पुरस्काराचे वितरण शनिवारी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील होमगार्ड, मित्र व परिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.नानासाहेब यांचे थुगांव गावांतही अभिनंदन होत आहे.

———-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here