राज्यपाल जिष्णु देव वर्मा व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘मंथन4युवा’च्या पोस्टरचे अनावरण
नागपूर WH NEWS – मंथन4युवा’ या विशेष अभियानाच्या पोस्टरचे अनावरण महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, प्र कुलगुरु डॉ. अखिलेश पेशवे, कुलसचिव डॉ. विजय खंडाळ तसेच ‘मंथन4युवा’ अभियानाचे संयोजक विष्णु चांगदे व रितेश गावंडे उपस्थित होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युवा-केंद्रित, तंत्रज्ञानाभिमुख आणि दूरदर्शी कार्यातून प्रेरणा घेऊन ‘मंथन4युवा’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), नवतंत्रज्ञान, स्टार्टअप संस्कृती, नवोपक्रम, कौशल्य विकास, डिजिटल सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून नव्या पिढीला सक्षम, जबाबदार आणि राष्ट्राभिमानी नागरिक म्हणून घडविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.अभियानांतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच युवकांसाठी ‘Know Your Icon’ स्पर्धा, पेटेंट फेस्ट, विज्ञान प्रदर्शन, ‘विकसित नागपूर’ हॅकाथॉन, स्टार्टअप फेस्ट, चित्रकला, नृत्य, गीतगायन, वक्तृत्व, काव्यवाचन तसेच ऑनलाइन फोटोग्राफी व रील स्पर्धा अशा विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती, नवोपक्रम, उद्योजकता, सर्जनशीलता, नेतृत्वगुण, सांस्कृतिक अभिव्यक्ती, संविधानिक मूल्ये, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रहिताची भावना दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.या कार्यक्रमाला ‘मंथन4युवा’ अभियानाचे संचालन समिती चे डॉ. राजेश गादेवार, डॉ. देवेंद्र भोंगाडे, डॉ.अभय मुद्गल, केतन मोहितकर, डॉ.संजय ढोबळे, डॉ. सोमदत्त करंजीकर, विनय चावला, प्रकाश शुक्ला, निधी बावशे, डॉ. सचिन हजारे, डॉ. प्रदीप बिबटे, विनोद कडू, डॉ. राजेश ढोबळे, डॉ. विजय दातारकर, वैभव बावनकर, डॉ. सुमित सिंह, डॉ. राजेश देवकाते, डॉ. गजानन पोलनवार तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
23 ऑगस्टला भव्य समारोप
‘मंथन4युवा’ अभियानाचा भव्य समारोप रविवार, 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यात हजारो ढोल-ताशा वादकांचे महावादन हे प्रमुख आकर्षण राहणार असून भव्य चित्र प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके, तर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील.नागपूरातील शाळा, महाविद्यालये आणि युवकांनी ‘मंथन4युवा’च्या विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अभियानाचे संयोजक विष्णु चांगदे आणि रितेश गावंडे यांनी केले आहे.
असे आहेत उपक्रम
1-20 ऑगस्ट – फोटोग्राफी व रील मेकिंग स्पर्धा
8 ऑगस्ट – पुस्तक प्रकाशन
8-17 ऑगस्ट – चित्रकला स्पर्धा – प्राथमिक फेरी
12-17 ऑगस्ट – ‘Know Your Icon’ स्पर्धा
14 ऑगस्ट – कवितावाचन स्पर्धा
17 ऑगस्ट –कॉम्पिटेटीव्ह एक्झाम फेस्ट
18 ऑगस्ट – पेटेंट गॅलरी, चित्रकला स्पर्धेची अंतिम फेरी
18 ऑगस्ट – देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा व इलोक्युशन स्पर्धा
17-18 ऑगस्ट – विज्ञान प्रदर्शनी, स्टार्टअप फेस्ट व विकसीत नागपूर हॅकाथॉन
19 ऑगस्ट – नृत्य स्पर्धा व आयडियाथॉनची अंतिम फेरी
20 ऑगस्ट – युथ समिट
23 ऑगस्ट – समारोपीय सोहळा
