मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’अंतर्गत बोधगया रेल्वेयात्रेचा शनिवारी नागपुरात शुभारंभ -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती – विशेष रेल्वेगाडी रवाना होणार

Follow Us on :

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’अंतर्गत बोधगया रेल्वेयात्रेचा शनिवारी नागपुरात शुभारंभ

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती

– विशेष रेल्वेगाडी रवाना होणार

नागपूर, दि. १० :मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार येथे घेऊन जाणाऱ्या यात्रेची विशेष रेल्वे शनिवार, दि. ११ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता नागपूर मुख्य रेल्वे स्थानक, सीताबर्डी येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून रवाना होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विशेष रेल्वेला हिरवी झेंडी दाखविण्यात येणार असून, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट, वित्त नियोजन राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल, सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यसभेच्या सदस्य माया चिंतामण इवनाते, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे तसेच रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

राज्य शासनाने राज्यातील सर्व धर्मांतील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ८०० लाभार्थी दि. ११ ते १६ जुलै २०२६ या कालावधीत विशेष रेल्वेने महाबोधी विहार बोधगया (बिहार) येथे जात आहेत.

विधानपरिषदेचे सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, डॉ. परिणय फुके, कृपाल तुमाने, प्रा. संजय भेंडे व डॉ. राजीव पोतदार, विधानसभा सदस्य सर्वश्री डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, मोहन मते, विकास ठाकरे, समीर मेघे, चरणसिंह ठाकूर, डॉ. आशीष देशमुख व संजय मेश्राम हे उपस्थित राहणार आहेत. सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी तसेच समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी व मान्यवर उपस्थित राहतील.

यात्रेसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांनी शनिवार, दि. ११ जुलै रोजी सकाळी ८ वाजता नागपूर मुख्य रेल्वे स्थानक, सीताबर्डी येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए