नागपूर लायन्स क्लब मेट्रो सिटीतर्फे एसटी सवलत पास वितरण शिबिर संपन्न
नागपूर : लायन्स क्लब मेट्रो सिटीतर्फे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) यांच्या सहकार्याने महिलांसाठी तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ पुरुषांसाठी एसटी सवलत पास वितरण शिबिराचे आयोजन आज नरेंद्र नगर येथील हनुमान मंदिर परिसरात करण्यात आले.
या शिबिरामध्ये १०० महिलांनी आणि ६० ज्येष्ठ पुरुषांनी एसटी सवलत पासचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात आर्थिक सवलतीचा लाभ मिळणार असून उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
कार्यक्रमाला लायन्स क्लब मेट्रो सिटीचे अध्यक्ष लायन दिवाकर पाटणे, लायन प्रदीप पाचपांडे, लायन दिनेश मुनीश्वर, लायन सुरेश इंगोले, लायन भगवान वानखेडे, लायन विनोद रामेडवार, लायन प्रमोद येमसालवार, लायन सुषमा उकंडे, लायन विजय उकंडे, लायन हिरा बोरकर, लायन मंगला बुराडे, लायन रेखा नागपुरे आणि छाया काळंबे उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राजू गजामवार, तुषार ढोंगे आणि तुषार राठोड यांनीही उपस्थित राहून लाभार्थींना मार्गदर्शन केले.
लायन्स क्लब मेट्रो सिटीतर्फे राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे अनेक महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासाठी सवलतीचा लाभ मिळाला.
