SIR प्रशिक्षण शिबिरात मतदार यादीतील प्रत्येक नावाची पडताळणी करण्याचे आवाहन

Follow Us on :

SIR प्रशिक्षण शिबिरात मतदार यादीतील प्रत्येक नावाची पडताळणी करण्याचे आवाहन
नागपूर कामठी WH NEWS : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार मतदार याद्या सखोल पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम २०२६ अंतर्गत कामठी–मौदा विधानसभा क्षेत्रातील BLA प्रतिनिधींचे प्रशिक्षण शिबिर रनाळा येथील ग्रीन लीफ लॉन येथे उत्साहात पार पडले. बूथस्तरावरील संघटना अधिक सक्षम करण्याबरोबरच पात्र मतदारांचे मतदानाचे हक्क अबाधित राहावेत, यावर या शिबिरात विशेष भर देण्यात आला.


प्रशिक्षण शिबिराचे आयोजन प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे (BLA-1, कामठी–मौदा विधानसभा, माजी सभापती जिल्हा परिषद नागपूर) आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव शकूरजी नागाणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री सुनीलजी केदार, रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमारजी बर्वे, प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे, शकूरजी नागाणी, माजी सभापती दिशाताई चनकापुरे, माजी उपसभापती दिलीपजी वंजारी, पंचायत समिती सदस्य सोनू कुथे, नगरसेवक आशिफ शरमतीया, सातीका खांडेकर, अभिषेक चिमणकर, जुही अन्सारी, आलिया तबस्सुम अमीन रशीद, हसीना बानो फारूक कुरेशी, तमिना प्रवीण साकिब राकिब, सुधीरजी सहाणे, रत्नादीपजी रंगारी, रमेशजी विघे, सरपंच मनोजजी कुथे, दुमदेवजी नाटकर, प्रकाश गजभिये, प्रकाश आगलावे यांच्यासह मोठ्या संख्येने BLA प्रतिनिधी आणि काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना सुनीलजी केदार यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बूथवरील मतदार यादीतील प्रत्येक नावाची काळजीपूर्वक पडताळणी करून पात्र मतदारांचे नाव वगळले जाणार नाही, यासाठी दक्ष राहण्याचे आवाहन केले. बूथस्तरावरील संघटन अधिक सक्षम आणि सक्रिय करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
खासदार श्यामकुमारजी बर्वे यांनी प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा यासाठी घराघरांत जाऊन जनजागृती करण्याचे तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात प्रज्वलाजी तट्टे आणि गौतमजी नितनवरे यांनी SIR प्रक्रियेची सविस्तर माहिती देत BLA प्रतिनिधींना प्रशिक्षण दिले. सध्या सुरू असलेल्या मतदार याद्या सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता असल्याने प्रत्येक बूथवरील प्रतिनिधींनी सतर्क राहून नागरिकांना मार्गदर्शन करावे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी आणि कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, असे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए