आम . देवराव होळींच्या उपस्थितीत गडचिरोली पं .स ची आमसभा वादळी…. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावण्यांचा आयोजक आणि राजकारण्यांना विसर?
– मुकुंदराव उंदिरवाडे यांनी लक्षात आणून दिली चुक.
गडचिरोली / चक्रधर मेश्राम
गडचिरोली पंचायत समितीची वार्षीक आमसभा आमदार डॉ . देवराव होळी यांच्या अध्यक्षते खाली पार पडली . सदर सभेला आमदार होळी, बिडिओ साळवे ‘ माजी सभापती मारोतराव ईचोळकर, माजी उपसभापती विलास दशमुखे, माजी नगरसेवक प्रमोद पिपरे तसेच विविध खाते प्रमुख, कर्मचारी , बहुसंख्य नागरिक उपस्थित होते .आमदार होळी यांचे आगमन होताच पुलखल च्या महिलांनी ग्रामसेवक फुलझेले यांना हटवा या मागणी साठी आमदारांना घेराव घातला.
तेव्हा आमदार महाशयाने मुख्य कार्यपालन अधिकारी. जि . प . गडचिरोली यांना तातडीने फोन करून प्रकरण तात्पुरते शांत केले . सभेला लोकशाही – संविधान या विषयावर चर्चा सुरु असतांना सभेच्या ठिकाणी संत गाडगेबाबा , संत तुकडोजी महाराज या दोनच महापुरुषाचे फोटो लावण्यात आले होते . व संविधानाची चर्चा सुरु होती .
त्यावर अंपग ( दिव्यांग ) नागरिक मुकुंदराव उंदिरवाडे यांनी सभेतील माईक हिसकावून ठणकावून सांगीतले की ‘ आपण संविधान लोकशाहीच्या चर्चा करणारे अधिकारी या खुर्च्यांवर बसण्याचा अधिकार व आरक्षण ज्या महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला दिले त्या संविधान कर्त्याचा फोटोच आमसभेत नाही यावर वादंग माजले आयोजकाला लोकशाहीचा विसर पडला हि गंभीर बाब आहे याचे आश्चर्य वाटतो .
नाईलाजाने आमसभा बंद पाडण्यात आली तेव्हा सर्वानी सर्व प्रथम मसाला भाताचा आस्वांद घेतला. तेव्हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा फोटो लावून त्यांना प्रतिमेला हार घालुन आमसभेला पुन्हा सुरुवात करण्यात आली . पुन्हा ग्रामपंचायत पुलखल चे अनु . जातीचे ग्रामसेवक फुलझेले यांची बदली करा असे पुलखल वासीयांनी तक्रार केली असता आमदारानी त्या ग्राम सेवकांस सात दिवसाचे आत पुलखल ग्रा. प . मधुन हाकला असा आदेश बिडिओला देताच पुलखल चे सरपंच व सदस्यांनी . तुम्ही कोण होता बदली करणारे ‘ पहिले ग्रामसेवकाचा दोष दाखवा असे म्हटले तेव्हा पुलखल चे नागरिक व ग्रा. प . सरपंच , सदस्य हमरीतुमरीवर येवून शाब्दिक बाचाबाची झाली. आणि आमसभेत गोंधळ निर्माण झाला. डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आमसभेत न लावणार्या आयोजकावर कारवाई करण्याची मागणी मुकुंदराव उंदिरवाडे (दिव्यांग ) यांनी केली .
सदर घटनेचा निषेध केला. तर रिपब्लिकन पार्टी चे जिल्हा अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी सुध्दा सदर घटनेचा निषेध करून सदर घटनेची तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे केली . दिव्यांग मुकुंदराव उंदिरवाडे यांनी जिल्हा परिषद मुख्य गेट समोरील हटविण्यात आलेला डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोबाबत सिईओ , जि . प . गडचिरोली याचेकडे तक्रार करून डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा पुन्हा त्याच ठिकाणी लावण्यास सिईओ ना भाग पाडले होते . उंदिरवाडे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले हे विशेष .