अभिनेत्री बबिता डोलस यांचा ‘भारत रत्न आयकॉनिक एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ने सन्मान

Follow Us on :

वाडीच्या अभिनेत्री बबिता डोलस यांचा ‘भारत रत्न आयकॉनिक एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ने सन्मान
नागपूर WH NEWS : वाडी धम्मकीर्ती निवासी अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल बाबिता डोलस यांच्या कला क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना ‘भारत रत्न आयकॉनिक एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
Jivran Foundation यांच्या वतीने देण्यात आलेल्या या प्रमाणपत्रात बबिता डोलस यांचा परफॉर्मिंग आर्ट्स आणि सामाजिक सेवेसाठीच्या योगदानाबद्दल गौरव करण्यात आल्याचे नमूद आहे. त्यांच्या कलात्मक कामासोबतच सामाजिक कार्यातील योगदानाचेही प्रमाणपत्रात कौतुक करण्यात आले आहे.


बबिता डोलस यांनी ‘ताजमहल’, ‘गजराज वाडा’, ‘सहारा’ यांसारख्या म्युझिक व्हिडिओंसोबतच ‘रक्षाबंधन’, ‘एक आवाज’ आणि ‘अंगठा’ या शॉर्ट फिल्म्समध्ये काम केले आहे.

विशेष म्हणजे, प्रमाणपत्रावर 5 सप्टेंबर 2026 ही तारीख आणि JF/BRIEA/2025-IN-300 हा क्रमांक नमूद आहे. प्रमाणपत्राच्या तळाशी हा पुरस्कार संबंधित संस्थेने स्वतंत्रपणे सुरू केलेला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नागपूर-मुंबई असा कलाक्षेत्रातील प्रवास असलेल्या बाबिता डोलस यांच्या या सन्मानामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

News By

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए