अवैध धंदे करणाऱ्यावर कारवाई साठी रस्त्यावर उतरले पोलीस आयुक्त! – पत्रकार विजय खवसे यांच्या प्रश्नानंतरच हालचाल! -विधानसभेत ही गाजला होता नागपूरच्या अवैध धंद्याचा मुद्या!

Follow Us on :

अवैध धंदे करणाऱ्यावर कारवाई साठी रस्त्यावर उतरले पोलीस आयुक्त!
– पत्रकार विजय खवसे यांच्या प्रश्नानंतरच हालचाल!
-विधानसभेत ही गाजला होता नागपूरच्या अवैध धंद्याचा मुद्या!

नागपूर WH NEWS (विजय खवसे ) नागपूर शहरात अमली पदार्थ व अवैध धंद्यांवर अखेर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल स्वतः मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहे. ५ मे रोजी पांढरबोडी व मिठानीम झोपडपट्टी परिसरात अचानक भेट देत त्यांनी थेट पाहणी केली, तर ६ मे रोजी यशोधरा नगरमध्येही मोठा ताफा पोहचत धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे.नागपूर शहरातील अवैध धंद्याच्या याच मुद्द्यावर पत्रकार विजय खवसे यांनी आधीच आवाज उठवला होता. त्यावेळी पोलीस आयुक्त यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्यांनाच टार्गेट करून खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे.

नंतर १७ मार्च २०२६ रोजी हा मुद्दा विधानसभेत आमदार प्रवीण दडके, विकास ठाकरे आणि नितीन राऊत यांनी उपस्थित केला—आणि त्यानंतरच कारवाईचा वेग वाढल्याचे दिसत आहे.
आता प्रश्न असा उपस्थित होतोय—जर पत्रकार विजय खवसे यांचा इशारा वेळेत गंभीरपणे घेतला असता, तर आज इतकी मोठी कारवाई करण्याची वेळ आली असती का? उलट कारवाई उशिरा सुरू झाल्याने पोलीस विभागाच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“उशिरा का होईना, पण सीपींचे डोळे उघडले का?” अशी चर्चा नागपूरमध्ये रंगत आहे.

नागपूर शहरात पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी स्वतः रस्त्यावर उतरून अवैध धंद्यांवर कारवाई सुरू केल्याचे स्वागत होत असले, तरी अनेक भागांत आजही परिस्थिती जैसे थे असल्याचे वास्तव समोर येत आहे.
कपिल नगर, एमआयडीसी, सक्करदरा आणि लकडगंज पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सट्टा-पट्टी आणि जुगार अड्डे अजूनही सुरू असल्याची चर्चा आहे.

या अवैध धंद्यांमुळे विशेषतः युवक आणि कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आर्थिक व सामाजिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, सीपी स्वतः मैदानात उतरल्याने आशा निर्माण झाली आहे, मात्र ही कारवाई सर्व भागांत प्रभावीपणे पोहोचणे गरजेचे आहे. “जर हे अड्डे पूर्णपणे बंद झाले, तर उशिरा का होईना—सीपींचे खऱ्या अर्थाने अभिनंदनच होईल,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए